आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education Article, National Law University

Divya Education: नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्‍या एमबीए आणि एमएस कोर्सेससाठी प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, जोधपूरच्या एमबीए आणि मास्टर ऑफ सायन्स कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी 31 मेपर्यंत अर्ज करू शकतात. एमबीए (विमा) अभ्यासक्रमात मॅट स्कोअरच्या आधारे प्रवेश मिळवू शकतात. मास्टर ऑफ सायन्समध्ये (विमा) पात्रता परीक्षेच्या आधारे हा प्रवेश मिळेल. एमबीए अभ्यासक्रम दोन वर्षांचा आहे आणि एमएस अभ्यासक्रम एक वर्षाचा आहे.


पात्रता
एमबीए : 55 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर. विद्यार्थ्याला 10+2 च्या परीक्षेत किमान 55 टक्के गुण मिळालेले असावेत.
एमएस : 55 टक्के गुणांसह बीई किंवा बीटेकची पदवी. सोबतच 10+2च्या परीक्षेत 55 टक्के गुण संपादन केलेले असावेत.
शुल्क आणि शिष्यवृत्ती
एनएलयू, जोधपूरमध्ये दोन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रतिसत्र 55 हजार रुपये शुल्क आहे. इतर खर्च मिळून विद्यार्थ्यांना वार्षिक सुमारे 1 लाख 25 हजार रुपये द्यावे लागतील. नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगळुरूमध्ये पदव्युत्तर पदवीचा कोर्स प्रतिसत्र 40 हजार रुपये शुल्क आहे.
निकाल : 10 जून 2014
एम्सच्या पीजी कोर्सेस प्रवेशासाठी 11 आणि 18 मे रोजी परीक्षा

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थी त्यासाठी 31 मार्चपर्यंत अर्ज करू शकतो. सर्व कोर्सेसमध्ये प्रवेश परीक्षेच्या आधारे होईल. एमडी, एमएस आणि एमसीएच अभ्यासक्रमासाठी 11 मे रोजी, डीएम आणि मास्टर ऑफ हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशनसाठी (एमएचए) 18 मे रोजी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी 13 जुलै रोजी परीक्षा होईल.
पात्रता
एमडी, एमएस, एमसीएच : 55 टक्के गुणांसह एमबीबीएसची पदवी. त्याशिवाय 30 जुलै 2014 पासून पहिल्या वर्षासाठी अनिवार्य प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे. एससी/एसटी विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के गुण गरजेचे.
एमएचए - 55 टक्के गुणांसह एमबीबीएसची पदवी आणि एखाद्या रुग्णालयात तीन वर्षांचा कामाचा अनुभव किंवा पाच वर्षांपर्यंत जनरल प्रॅक्टिस केल्याचा अनुभव
शुल्क व वेतन
एम्समध्ये एमडी, एमएस आणि एमसीएच कोर्सचे वार्षिक अध्ययन शुल्क सुमारे 700 रुपये आहे. त्याशिवाय एमडी/ एमएससाठी निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांपर्यंत ज्युनियर रेसिडेंट/ डिमॉन्स्ट्रेटर म्हणून निश्चित वेतन आणि भत्ते दर महिन्याला दिले जाईल. बनारस हिंदू विद्यापीठात एमडी/ एमएस अभ्यासक्रमाचे वार्षिक शुल्क 16 हजार रुपये असेल.
निकाल : 15 मे 2014
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा