आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education : Common Entrance Test For The Hotel Mangement

दिव्य एज्युकेशन : हॉटेल मॅनेजमेंटच्या पदवी कोर्समध्ये प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा, 1.5 लाख विद्यार्थी परीक्षा देणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (एनसीएचएमसीटी) बॅचलर ऑफ सायन्स अ‍ॅँड हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन कोर्समध्ये प्रवेशासाठी 26 एप्रिल 2014 रोजी सामायिक प्रवेश परीक्षा होईल. त्यासाठी विद्यार्थी 7 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. हा तीन वर्षांचा कोर्स आहे. या माध्यमातून त्यांना केंद्र आणि राज्य सरकार तसेच एनसीएचएमसीटीच्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश मिळेल. दरवर्षी जवळपास दीड लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात.
पात्रता
कोणत्याही विद्याशाखेची 10+2 परीक्षा उत्तीर्ण असावे. यासोबत 10+2 मध्ये इंग्रजी हा विषय असावा. दरवर्षी बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा : 1 जुलै 2014 रोजी 22 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
शुल्क
इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, लखनऊमध्ये बीएस्सी इन हॉस्पिटॅलिटी अ‍ॅँड हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन कोर्सचे वार्षिक शुल्क 75 हजार रुपये आहे. याव्यतिरिक्त वार्षिक 29 हजार रुपये होस्टेल फीस असेल. एसआरएम युनिव्हर्सिटीमध्ये या कोर्सचे वार्षिक शुल्क जवळपास 1 लाख 20 हजार रुपये आहे.
परीक्षा पद्धती
तीन तासांच्या परीक्षेमध्ये 200 बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. यामध्ये न्यूमेरिकल अ‍ॅबिलिटी, लॉजिकल रिझनिंग आणि जनरल नॉलेजचे 30-30, इंग्रजी भाषेचे 60 आणि अ‍ॅप्टिट्यूड फॉर सर्व्हिस सेक्टरचे 50 प्रश्न असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण कापले जातील. प्रवेश परीक्षेच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
ज्ञान
जगातील सर्वात मोठ्या 5 हॉटेल चेन्स
देशाच्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा व्यवसाय 723 अब्ज रुपयांचा आहे. येथे प्रत्येक दहापैकी एक नोकरी हॉस्पिटॅलिटीशी संबंधित आहे. परदेशी हॉटेल चेन्सही भारतात येत आहे. जगातील टॉप हॉटेल चेन्सबाबतची माहिती जाणून घेऊयात...
इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल ग्रुप
विल्यम बॉस यांनी याची सुरुवात केली होती. विविध देशांतील रिसॉर्ट्समध्ये जवळपास 6 लाख 74 हजार खोल्या उपलब्ध आहेत. या ग्रुपची हॉटेल्स क्राऊन प्लाझा, हॉटेल इंडिगो, हॉलिडे इन, कॅँडलवूड सुइट्स यासारख्या ब्रॅँड नावाने ओळखली जातात.
सुरुवात कधी 1777
100 पेक्षा जास्त देशांमध्ये
4600 हॉटेल रिसॉटर्स
हिल्टन वर्ल्डवाइड
सुरुवात कधी
1919
90 पेक्षा जास्त देशांमध्ये
3900 हॉटेल्स.
कोनराड एन. हिल्टन यांनी टेक्सॉसमध्ये हिल्टन हॉटेल्स कॉर्पोरेशनच्या नावाने त्याची सुरुवात केली. सर्व हॉटेल्समध्ये साधारण 6 लाख 50 हजारपेक्षा जास्त खोल्या उपलब्ध आहेत. ग्रुपचे वार्षिक उत्पन्न 45 अब्ज रुपयांहून जास्त आहे.
मॅरियट इंटरनॅशनल
सुरुवात कधी
1927
74 देशांमध्ये 3700 पेक्षा जास्त हॉटेल्स.
अमेरिकेतील मेरीलॅँडमध्ये याचे मुख्यालय आहे. वेगवेगळ्या ब्रॅँडने प्रसिद्ध. मॅरियट ग्रुप दारिद्र्य निर्मूलन, कम्युनिटी वर्कफोर्स डेव्हलपमेंट आणि मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काम करते.
विंडहॅम हॉटेल ग्रुप
सुरुवात कधी
1981
66 देशांमध्ये 7400 पेक्षा जास्त हॉटेल्स
ट्रॅमेल क्रोव्ह यांनी अमेरिकेतील डलासमध्ये पहिले हॉटेल सुरू केले तेव्हा याचे नाव विंडहॅम हॉटेल कॉर्पोरेशन होते. यानंतर त्यांनी ग्लोबल हयातचे दोन ब्रॅँड्स- मायक्रोटेक इन्स अ‍ॅँड सुइट्स आणि हाऊथार्न सुइट्सचे अधिग्रहण केले.
एकॉर
सुरुवात कधी
1967
92 देशांमध्ये 3600 पेक्षा जास्त हॉटेल्स
फ्रान्समध्ये एकॉर हॉटेल चेन्सची सुरुवात झाली. या हॉटेलमध्ये काम करणा-या कर्मचा-यांची संख्या दीड लाखाहून जास्त आहे. सोफीटेल, नोवोटेल, ऑल सीझन्स, आयबिस, फॉर्म्युला वन आदी त्याचे ब्रॅँड आहेत.
हरियाणात न्यूक्लियर युनिव्हर्सिटी सुरू होणार
हरियाणात लवकरच न्यूक्लियर युनिव्हर्सिटी सुरू होणार आहे. मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांनी शनिवारी याची घोषणा केली. 2200 कोटी रुपये गुंतवणुकीतून तयार होणा-या या विद्यापीठाचे भूमिपूजन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते 3 जानेवारी रोजी होईल.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com