आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education : Fellow Program In Mangement At IIM

Divya Education:प्रवेश सूचना - आयआयएमच्या फेलो प्रोग्रॅम इन मॅनेजमेंटमध्ये प्रवेश, सहा शाखांत स्पेशलायझेशन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील अव्वल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आयआयएमच्या फेलो प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट (एफपीएम) आणि एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम इन मॅनेजमेंटमध्ये(ईपीएम) प्रवेशासाठी विद्यार्थी आता अर्ज करू शकतात. आयआयएम-इंदूर, कोझिकोड, रांची, रायपूर, बंगळुरू, शिलॉँग, लखनऊ, अहमदाबाद आणि रोहतकमध्ये या कोर्सेससाठी अर्ज करू शकतात. आयआयएम, इंदूर आणि रायपूरमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकता.
पात्रता
एफपीएम आणि ईपीएम कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी संस्थांसाठीची पात्रता वेगवेगळी आहे. आयआयएम इंदूरच्या एफपीएम कोर्समध्ये प्रवेशासाठी मास्टर्स डिग्रीमध्ये 55 टक्के गुण आवश्यक आहेत. ईपीएम कोर्सेससाठी कंपनीत काम करत असाल आणि ज्यांना सात वर्षांचा व्यावसायिक अनुभव असेल ते उमेदवारही अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया
एफपीएम : दहावी, बारावी आणि पदवीच्या गुणपत्रकाच्या आधारे छाननी.
- लेखी परीक्षेतून चाळणी - वैयक्तिक मुलाखत
ईपीएम : कॅटच्या आधारे शॉर्टलिस्टिंग. ज्या विद्यार्थ्यांनी कॅट परीक्षा दिली नाही. मात्र, जीआरई, गेट, जीमॅट किंवा यूजीसी अथवा सीएसआयआरच्या नेटसाठी पात्र असणारे ते यासाठी पात्र. छाननीनंतर वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
शुल्क
ईपीएम कोर्सेसचे शुल्क संस्थांनुसार वेगवेगळे आहे. आयआयएम लखनऊमध्ये या कोर्सची फीस 5 लाख 50 हजार रुपये आहे. एफपीएम कोर्सेससाठी विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाईल. आयआयएम-रांचीमध्ये सुरुवातीचे दोन वर्षे 30 हजार रुपये प्रति महिना आणि पुढील दोन वर्षे 35 हजार रुपये प्रति महिना दिले जाईल.
स्पेशलायझेशन
एफपीएम : इकॉनॉमिक्स, फायनान्स अँड अकाउंटिंग, इन्फर्मेशन सिस्टिम्स, मार्केटिंग मॅनेजमेंट, ऑपरेशन्स मॅनेजमेंट अ‍ॅँड क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स, ऑर्गनायझेशन बिहेवियर अ‍ॅँड एचआर, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, कम्युनिकेशन्स.
ईपीएम : बिझनेस एन्व्हायर्नमेंट, फायनान्स अ‍ॅँड अकाउंटिंग, एचआर मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, ऑपरेशन्स मॅनेजमेंट आणि जनरल मॅनेजमेंट
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेशासाठी परीक्षा, जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांचा सहभाग
देशातील 14 नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या अंडरग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये प्रवेश प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. दोन्ही कोर्सेससाठी कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट (क्लॅट-2014) 11 मे रोजी होईल. या वेळी गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने त्याचे आयोजन केले आहे. क्लॅटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बंगळुरू, हैदराबाद, भोपाळ, कोलकाता, जोधपूर, रायपूर, लखनऊ, पतियाळा, पाटणा, कोची, कटक, गुवाहाटी आणि गांधीनगरच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळेल.
पात्रता
यूजी कोर्ससाठी
45 टक्के गुणांसह 10+2 उत्तीर्ण. एससी/एसटीसाठी 40 टक्के गुण आवश्यक.
वयोमर्यादा : 1 जुलै 2014 रोजी 20 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
पीजी कोर्ससाठी
55 टक्के गुणांसह एलएलबी किंवा बॅचलर ऑफ लॉची पदवी. एससी/एसटी विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के गुण आवश्यक.
शुल्क
प्रत्येक विद्यापीठाची वेगवेगळी फीस आहे. राजीव गांधी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, पतियाळामध्ये यूजी कोर्सचे वार्षिक शुल्क 1 लाख 80 हजार रुपये आणि गांधीनगरमध्ये 1 लाख 60 हजार रुपये आहे. हैदराबादच्या नाल्सार युनिव्हर्सिटी ऑफ लॉमध्ये पीजी कोर्सची ट्युशन फीस 65 हजार रुपये आणि पटियालामध्ये 46 हजार रुपये आहे.
परीक्षा पद्धती
यूजी कोर्स : दोन तासांच्या परीक्षेत 200 प्रश्न विचारले जातील. त्यात इंग्लिश, तार्किकतेवर आधारित 40-40, सामान्य ज्ञान आणि कायदाविषयक प्रवेश चाचणीचे 50-50 आणि गणिताचे 20 प्रश्न असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरावर 0.25 गुण कापले जातील.
पीजी कोर्स : दोन तासांच्या परीक्षेत 50 बहुपर्यायी प्रश्न एलएलबीच्या पातळीवर असतील. त्याशिवाय 25-25 गुणांचे चार विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जातील. घटनात्मक कायदा, ज्युरिसप्रुडेंससंबंधी ते असतील.
समानतेसाठीही बनले कायदे
महिलांना मतदान करण्याचा हक्क मिळाला
1869 मध्ये ब्रिटनच्या महिलांना मतदान करण्याचा हक्क मिळाला; परंतु केवळ काही स्थानिक निवडणुकीत. विवाहित असलेल्या आणि वय 30 वर्षे असलेल्या महिलांना हा हक्क 1919 मध्ये मिळाला होता. सर्व महिलांना हा हक्क 1929 मध्ये मिळाला. न्यूझीलंड त्या सर्व देशांपैकी एक होता. न्यूझीलंडने सर्वात पहिल्यांदा महिलांना मतदान करण्याचा हक्क दिला.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com