आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divya Education: आयआयएमची प्रवेश सूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयआयएम, रांचीच्या फेलो आणि पीजी डिप्लोमा कोर्सेसमध्ये प्रवेश, कॅट स्कोअरच्या आधारावर मिळेल प्रवेश
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रांचीच्या फेलो प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट (एफपीएम) तसेच पीजी डिप्लोमा इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट (पीजीडीएचआरएम) कोर्समध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी आता अर्ज करू शकतात. पीजीडीएचआरएमसाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 5 फेब्रुवारी आणि एफपीएमसाठी 15 फेब्रुवारी 2014 आहे. एफपीएम चार वर्षांचा तर पीजीडीएचआरएम दोन वर्षांचा कोर्स आहे. दोन्ही कोर्सेसमध्ये कॅट स्कोअरच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
पात्रता
एफपीएम
60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी, किंवा बीई/बीटेक/बीफार्माची पदवी अथवा 55 टक्के गुणांसह सीए/सीएस/आयसीडब्ल्यूएचा कोर्स केलेला असावा.
पीजीडीएचआरएम
50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतून पदवी. एससी/
एसटीसाठी 45 टक्के गुण आवश्यक. या वर्षी शेवटच्या वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया
एफपीएम कोर्समध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कॅट, जीमॅट, गेट किंवा यूजीसी नेट परीक्षा स्कोअरच्या आधारावर मुलाखतीसाठी उमेदवारांना निवडले जाईल. संस्था या परीक्षांसाठी किमान पर्सेंटाइल स्कोअर ठरवते. पीजीडीएचआरएममध्ये प्रवेश कॅट स्कोअर, लेखी चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे होईल. प्रवेशात 20 टक्के महत्त्व कॅट स्कोअरला, 35 टक्के मुलाखतीला, 20 टक्के लेखी परीक्षा आणि 25 टक्के महत्त्व प्रोफाइलला (अकॅडमिक बॅकग्राउंड, अनुभव आदी) दिले जाईल.
शुल्क आणि विद्यावेतन
पीजीडीएचआरएम कोर्सचे शुल्क जवळपास 5 लाख रुपये वार्षिक आहे. झेव्हियर लेबर रिसर्च इन्स्टिट्यूट,जमशेदपूरमध्ये या कोर्सचे वार्षिक शुल्क जवळपास 8 लाख रुपये आहे. फेलो प्रोग्रॅमच्या विद्यार्थ्यांना पहिल्या दोन वर्षांपर्यंत प्रत्येक तीन महिन्याला 30 हजार रुपये आणि पुढील दोन वर्षे दर महिन्यास 35 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. याव्यतिरिक्त 25 हजार रुपये वार्षिक कंटिंजन्सी ग्रॅँट आणि 2 लाख रुपये पेपर प्रेझेंटेशनसाठी दिले जातील.
नॉलेज
राइट बंधूंच्या आधी 100 वर्षे जॉर्ज केली यांना विमान बनवण्याचे तंत्र माहीत होते
ऑलिव्हर आणि विलबर राइट यांनी जगातील पहिले यशस्वी विमान 1903 मध्ये तयार केले होते. मात्र त्याआधी 100 वर्षांपूर्वी इंग्लंडचे अभियंता जॉर्ज केली यांनी विमानाचे डिझाइन तयार केले होते. सन 1799 मध्ये केली यांनी आधुनिक विमानाचा आराखडा तयार केला होता. ते एक फिक्स्ड-विंग फ्लाइंग मशीनप्रमाणे होते. त्यामध्ये लिफ्ट, प्रोपल्शन आणि नियंत्रणासाठी वेगवेगळ्या सिस्टिम्स होत्या. त्यांनी पहिले ग्लायडरही डिझाइन केले होते. यामधून माणूस उडू शकत होता. 1804 मध्ये स्वत: केली यांनी यातून उड्डाण केले होते. उड्डाणासाठी आवश्यक एरोडायनामिक फॅक्टर्स-बेट, लिफ्ट, ड्रॅग आणि थ्रस्ट ओळखण्याचे श्रेय त्यांनाच जाते. माणूस खरेच हवेत उडू शकतो यावर लोकांचा विश्वास बसत नसल्याने तेव्हा त्यांच्या कामाची जास्त दखल घेण्यात आली नाही. रॉयल एरोनॉटिकल सोसायटी लायब्ररी, लंडनच्या दस्तऐवजानुसार केली लहानपणापासूनच आकाशात उड्डाण करण्याचे स्वप्न पाहत होते. त्याचप्रमाणे त्यांनी 1792 मध्ये विमानाचे पहिले मॉडेलही तयार केले होते. त्यामुळे त्यांना फादर ऑफ एरोडायनामिक्स संबोधले जाते.
कंपन्या अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना जास्त पॅकेज देत आहेत
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि अन्य प्रमुख बिझनेस स्कूल्सच्या प्लेसमेंटमध्ये मंदीचा परिणाम दिसत असला तरी खासगी कंपन्या अव्वल महाविद्यालयातील अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना नोकरी देण्यात मागे नाहीत. एवढेच नव्हे, त्यांना मिळणारे पॅकेज आयआयएमच्या सरासरी पॅकेजपेक्षा जास्त आहे. देशातील नामांकित संस्थांपैकी एक श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना या वर्षी सर्वाधिक 12 ते 14.7 लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले. सर्वात जास्त 14.7 लाख रुपये वार्षिक पॅकेज सेंट स्टीफन्स कॉलेजच्या विद्यार्थ्याला मिळाले. हे नव्या आयआयएम संस्थांच्या सरासरी पॅकेजपेक्षा जास्त आहे. सन 2013 मध्ये इंदूर आणि कोझिकोड आयआयएमच्या विद्यार्थ्यांचे सरासरी पॅकेज जवळपास 12 लाख रुपये वार्षिक होते. प्लेसमेंटसाठी येणाºया कंपन्यांमध्ये मॅकेन्झी अँड कंपनी, सिटीबँक, डॉएच्च बँक, गुगल, अमेरिकन एक्स्प्रेस आदींचा समावेश आहे. कंपन्या मॅथ्स आणि इकॉनॉमिक्स बॅकग्राउंडच्या विद्यार्थ्यांना नोकरी देण्यात जास्त रस दाखवतात.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com