आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य एज्यूकेशन्स: जेयू प्रवेश परीक्षा - 2013

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेरच्या जिवाजी विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 15 जून ते 14 जुलैपर्यंत प्रवेश परीक्षा होईल. यासाठी विद्यार्थी 5 जूनपर्यंत (लेट फीससह 10 जूनपर्यंत) अर्ज करू शकतील.

स्पर्धा
> 5 कोर्सेस
> 50 हजार अर्जदार (अंदाजे)
> कालावधी : 1 ते 5 वर्षांपर्यंतचे कोर्सेस

पात्रता:
एमबीए : पदवीमध्ये 50 टक्के गुण आवश्यक. याबरोबर एमबीए ई-कॉर्मस, एमबीए बिझनेस इकॉनॉमिक्स, एमबीए केमिकल सेल्स आणि मार्केटिंग मॅनेजमेंटसाठी संबंधित विषयातील पदवी.

एमएस्सी : बायोकेमिस्ट्री / बायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी/ बॉटनी/ एन्व्हॉयर्नमेंटल सायन्स/ मायक्रोबायोलॉजी/ झूलॉजी/ फार्मसी/ मेडिसिन किंवा इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये 50 टक्के गुणांसह पदवी.

पदवी अभ्यासक्रम : 12 वीमध्ये 50 टक्के गुण

शारीरिक शिक्षण : पदवी परीक्षेला किमान 40 टक्के गुण

एम.फिल. : प्रत्येक कोर्ससाठी संबंधित विषयात पदवीमध्ये 50 टक्के गुण

निकाल : जून-जुलै 2013

शुल्क :
सर्व कोर्सेससाठी वेगवेगळे शुल्क. एमएस्सी कोर्सेससाठी प्रति सेमिस्टर 8 ते 25 हजार रुपये. एमबीए कोर्सेससाठी 18 ते 23 हजार रु. प्रति सेमिस्टर. पदवी कोर्सेससाठी 13 ते 37 हजार रुपये प्रति सेमिस्टर. फिजिकल एज्युकेशनसाठी 2400 रु. ते 6 हजार रु. प्रति सेमिस्टर. पंजाब विद्यापीठात पदवी कोर्सेसचे शुल्क 8 हजार ते 15 हजार रुपयांपर्यंत आहे.

अभ्यासक्रम आणि जागा
एमबीए : टुरिझम अँडमिनिस्ट्रेशन (46), बिझनेस इकॉनॉमिक्स (34), फायनान्शियल अँडमिनिस्ट्रेशन (72),एचआरडी (72), हॉस्पिटल अँडमिनिस्ट्रेशन (30), ई-कॉर्मस (43)

एमएस्सी :इंडस्ट्रियल केमिस्ट्री (45), बायोमेडिकल टेक्नॉलॉजी (21),बायोटेक्नॉलॉजी (45),फूड टेक्नॉलॉजी (53),मायक्रोबायोलॉजी (45), मॉलिक्युलर अँड ह्यूमन जेनेटिक्स (71),

पदवी अभ्यासक्रम : हॉटेल मॅनेजमेंट (70), टुरिझम मॅनेजमेंट (28), बीबीए (60),बीसीए (60), बीएएलएलबी (70)


ज्ञान: सहा वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर मिळत होती पदवी
ग्रीस, चीन, आफ्रिका आणि भारतामध्ये उच्च् शिक्षणाची सुरुवात झाली, परंतु पदव्युत्तर पदवीची सुरुवात मध्ययुगात युरोपीय विद्यापीठांमध्ये झाली. या ठिकाणी सहा वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर पदवी दिली जात होती आणि 12 वर्षांनंतर डॉक्टरेटची पदवी मिळत असे. पहिल्या सहा वर्षांत न्यूमेरिकल अँबिलिटी, जॉमेट्री, अँस्ट्रोनॉमी, म्युझिक थिअरी, ग्रामर आणि लॉजिक शिकवले जात होते. सर्व विषयांच्या लॉजिकवर सर्वाधिक भर दिला जात होता. यानंतर बॅचलर ऑफ आर्टची पदवी दिली जात होती. विद्यार्थी विधी, मेडिसिन किंवा थिऑलॉजीपैकी एका विषयाची निवड करू शकत होते. मध्ययुगात थिऑलॉजी हा सर्वाधिक प्रतिष्ठित विषय मानला जात होता.

रंजक: पत्नीसाठी बनवला बॅंड-एड
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीमध्ये अर्ल डिक्शन कॉटन बायर पदावर कार्यरत होते. त्यांच्या हाऊसवाइफ पत्नीला किचनमध्ये काम करताना बहुतेक वेळा हाताला चटके बसत असत. त्या वेळी अस्तित्वात असलेल्या बॅँडेजमध्ये कापसावर चिकटपट्टी चिकटवली जात होती. मात्र ते टिकाऊ नव्हते. डिक्शन यांनी 1921 मध्ये सजिर्कल टेपच्या मधोमध कापूस चिकटवून तयार केलेला बॅँड-एड लावण्यासाठी दुसर्‍याची मदत घेण्याची आवश्यकता भासली नाही. कंपनीला आपली कल्पना सांगितल्यानंतर बॅँड-एडच्या उत्पादनाचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीस माणसांनी बनवलेल्या बॅँड-एडला जास्त लोकप्रियता मिळाली नव्हती. 1924 मध्ये जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने बॅँड-एड तयार करणारे मशीन तयार केले. तर स्टरलाइज्ड बॅँड-एडची विक्री 1939 पासून सुरू झाली.

इंटरेस्टिंग कोट

Good judgement comes from experience and experience comes from poor judgement.
- Anonymous

चांगले निर्णय अनुभवातून घेतले जातात आणि अनुभव कचखाऊ निर्णयातून मिळतो.


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
8082005060 या क्रमांकावर किंवा मेल करा
education@dainikbhaskargroup.com