आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education: Mangment Law Releated Question Answers

दिव्य एज्युकेशन : व्यवस्थापन- विधी क्षेत्रासंबंधी प्रश्नोत्तरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य एज्युकेशनला ई-मेल व एसएमएसने वाचकांकडून सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. आज वाचा व्यवस्थापन व विधी क्षेत्राशी संबंधित प्रश्नांची उत्तरे-


० सहकार व्यवस्थापन अभ्यासक्रम करणा-या संस्था व नोकरीच्या संधीबद्दल सांगा.
दिल्लीच्या नॅशनल कौन्सिल फॉर को-ऑपरेटिव्ह ट्रेनिंग, देहराडूनचे इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, आयआयएम-अहमदाबादसारख्या काही मोठ्या संस्थांमध्ये को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट अभ्यासक्रम शिकवला जातो. अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना सहकार, सरकारी, खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते. प्रशिक्षणार्थीच्या रूपाने सुरुवातीला 10 हजार रुपये प्रतिमहिना मिळू शकतो. संस्थेनुसार पगार कमी-अधिक होऊ शकतो.
० मी 12 वीचा विद्यार्थी आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात विधी सल्लागाराच्या रूपाने करिअर करू इच्छितो. त्यासाठी काय प्रक्रिया आवश्यक आहे ?
विधी सल्लागार होण्यासाठी वकील किंवा अ‍ॅटोर्नी एवढीच शैक्षणिक गुणवत्ता अपेक्षित आहे. विधिपूर्व पदवी आवश्यक असते व विधी संस्थेत परीक्षेद्वारे प्रवेश घ्यावा लागतो. हा सात वर्षांचा कालावधी असतो. काही विधी सल्लागार विधी महाविद्यालयानंतर पदव्युत्तर पदवी संपादन करणे पसंत करतात. त्यासाठी संवाद, समेट घडवणे, न्याय कौशल्याची गरज असते.
० कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रम कोठे करता येईल व नोकरीच्या संधी कोठे मिळेल ?
हैदराबादच्या नॅशनल अकादमी ऑफ अ‍ॅग्रीकल्चर रिसर्च मॅनेजमेंट, आयआयएमचे सेंटर फॉर मॅनेजमेंट इन अ‍ॅग्रीकल्चर, म्हैसूरचे अ‍ॅग्रीकल्चर अँड फूड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सारख्या काही महाविद्यालयीन व्यवस्थापन अभ्यासक्रम चालवले जातात. अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्याला अन्न प्रक्रिया कंपनीत फिल्ड अंडररायटिंग मॅनेजर, सीड प्रॉडक्ट मॅनेजर व क्रॉप कन्सल्टंट पदावर नोकरी मिळू शकते.
० मी बीबीए फायनान्स करतोय. मला मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये एमबीए करता येईल ?
तुम्ही बीबीए केल्यानंतर एमबीएमध्ये स्पेशलायझेशन बदलू शकता. बीबीए फायनान्स केल्यानंतर एमबीए मार्केटिंग करता येऊ शकते. मात्र, आकडेमोड व विश्लेषण कौशल्य चांगले असावे. वित्त व संवाद कौशल्येदेखील चांगली असली पाहिजेत तरच मार्केटिंगमधील स्पेशलायझेशनचा फायदा होऊ शकतो.
० दूरशिक्षणाद्वारे एलएलबी कोठे करता येऊ शकेल ? तो नियमित कोर्सपेक्षा दुय्यम मानला जाईल ?
दूरशिक्षणाच्या माध्यमातून एलएलबीसाठी नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी बंगळुरू विद्यापीठ, कुरूक्षेत्र विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया सेंटर फॉर डिस्टन्स अँड ओपन लर्निंग दिल्ली या संस्थांमध्ये प्रवेश घेता येऊ शकेल. अभ्यासक्रमाचे महत्त्व नियमित कोर्सपेक्षा कमी नसते, परंतु प्लेसमेंट पॅकेज अधिक चांगला असतो.


दिव्य एज्युकेशन तज्ज्ञ समिती
डॉ. पायल उपाध्याय,
शिक्षणतज्ज्ञ, उदयपूर.
पवन लालपुरिया,
करिअर समुपदेशक, कोटा.


रंजक
संस्थेच्या नजरेतून व्यवस्थापन
प्रत्येक कार्यालयात कर्मचा-यांच्या स्वत: च्या काही अडचणी असतात. कंपन्यादेखील त्यांच्याकडे आपल्या दृष्टिकोनातून पाहतात व त्यादृष्टीने प्रश्नांवर आपल्यापरीने तोडगा शोधतात. व्यवस्थापन व मनुष्यबळ विभागाशी (एचआर) संबंधित या काही समस्या व त्यांची मिश्कील उकल-
1. पगारवाढ : जर तुम्ही प्राडा शूज वापरत आहात व गुचीची बॅग तुमच्याकडे असेल तर तुमची आर्थिक क्षमता चांगली आहे. त्यामुळे पगारवाढ गरजेची नाही. जर तुम्ही फाटलेली बॅग बाळगली व जुनेच बूट घातलेले असतील तर तुम्हाला आर्थिक व्यवस्थापन जमलेले नाही. ते शिकून घ्या. पगारवाढीचा विचार नंतर होईल. जर तुम्ही चांगल्या प्रकारे तयार असाल तर तुमचे जीवन चांगले चालले आहे. मग पगारवाढ घेऊन काय करणार आहात ?
2. सुटी : आजारी पडल्यानंतर आम्ही डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शनला गृहीत धरणार नाहीत. मेडिकल सर्टिफिकेटही ग्राह्य धरले जाणार नाही. जर तुम्ही डॉक्टरांकडे चालत जाऊ शकत होता, तर मग कार्यालयातही येऊ शकत होता. प्रत्येक कर्मचा-याला वैयक्तिक सुटी मिळेल. रविवारी व शनिवारी.
3. लंच ब्रेक : कृश असणा-या कर्मचा-यांना तीस मिनिटे दिली जातील. त्यामुळे ते आपली प्रकृती सुधारू शकतील. अधिक काम करू शकतील. लठ्ठ कर्मचा-यांना केवळ पाच मिनिटे मिळतील. तंदुरुस्तांना पंधरा मिनिटे मिळतील व त्यांनी पहिल्यासारखेच काम करत राहावे.
4. ई-मेल्स : तुम्हाला रोज अनेक ई-मेल येतील. ऑफिशियल ई-मेलला उत्तर जरूर द्यावा लागेल. परंतु जंक, स्पॅम मेल न वाचताच डिलिट करू शकता. त्यात वेळेचा अपव्यय नको, तो वेळ कार्यालयीन कामासाठी वापरता येईल.


इंटरेस्टिंग कोट
“A leader is best when people barely know he exists, when his work is done, his aim fulfilled, they will say: we did it ourselves.” —Lao Tzu.
ज्याचे अस्तित्व सोबतच्या लोकांमध्ये मिसळून जाते. तोच चांगला नेता असतो. त्याने एखादे काम केल्यानंतर हे काम आम्ही केले, असे लोकांनी म्हणायला हवे.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 यावर
किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com