आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य एज्युकेशन: मॅट नमुना प्रश्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेले दोन दिवस आपण मॅनेजमेंट अ‍ॅप्टिट्यूड टेस्टचे दोन सेक्शन्स पाहिले.लॉजिकल रीझनिंग-अ‍ॅबिलिटी आणि इंडियन अ‍ॅण्ड ग्लोबल एन्व्हॉयरमेंटशी संबंधित प्रश्न त्यात होते.आज मॅट परीक्षेचा तिसरा भाग क्वांटिटेटिव्ह अ‍ॅबिलिटी संबंधित काही प्रश्न.
क्वांटिटेटिव्ह अॅब‍िलिटी
1. Two small circular parks of diameters 16m, 12m are to be replaced by a bigger circular park. What would be the radius of this new park, if it has to occupy the same space as the two small parks ?
a. 15m b. 10m
c. 20m d. 25m
2. An investor earns 3% returns on 1/4th of his capital, 5% on 2/3rd and 11% on the remainder. What is the average rate of return he earns on his total capital?
a. 10% b. 5%
c. 5.5% d. 10.5%
3. The number of two digit numbers exactly divisible by 3 is
a. 33 b. 32
c. 31 d. 30
4. How many litres of water flows out of a pipe of cross section 5 cm in 1 minute, if the speed of water in the pipe is 20 cm/sec?
a. 2 litres b. 5 litres
c. 6 litres d. 9 litres
5. Two trains, 130m and 110m long, are going in the same direction. The faster train takes one minute to pass the other completely. If they are moving in the opposite directions, they pass each other completely in 3 seconds. Find the speed of each train.
a. 38 m/s, 36 m/s b. 42 m/s, 38 m/s
c. 36 m/s, 42 m/s d. None of these
6. A cricket club has 15 members, of whom only 5 can bowl. If the names of 15 members are put into a box and 11 drawn at random, then the chance of obtaining an eleven containing atleast 3 bowlers is
a. 7/13 b. 6/13
c. 11/15 d. 12/13
7. A pole m meter high stands on a building 250m high. To an observer at a height of 300m the building and the pole subtend equal angles. The distance of the observer from the top of the pole will be
a. 25m b. 50m
c. 25√3m d. 25√6m
8. If an 'anglet' is defined as 1 per cent of 1 degree, then how many anglets are there in a circle?
a. 0.36 b. 3.6
c. 360 d. 36000
Answer Key : 1 (b), 2 (b), 3 (d), 4 (c), 5 (b), 6 (a), 7 (c), 8 (d)
ज्ञान
वृद्धत्व का येते ?
20 वर्षांनंतर आपले वय झाल्याची लक्षणे दिसू लागतात. वयाच्या तिशीनंतर आपले केस पांढरे होण्याची प्रक्रिया सुरु होऊ लागते. पण के स पांढरे का होतात? शरीरावर सुरकुत्या का पडतात अथवा आपला विसराळूपणा का वाढतो, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया...
विसराळूपणा
न्यूरॉन (मेंदूकडे संदेश पाठवणा-या पेशी) वयापरत्वे एक-दुस-यापासून दूर जाऊ लागतात. त्या पेशी एकमेकींना योग्य प्रकारे संदेश देण्यात अपयशी ठरतात. त्यामुळे विसराळूपणा वाढत जातो.
पांढरे केस
केसांचेही बालपण, तरुणपण आणि वृद्धत्व असते. मेलानिन पदार्थामुळे केसांना काळा रंग प्राप्त होतो. बालपणी या पदार्थाचे शरीरातील प्रमाण अधिक असते. वय वाढते तसे मेलानिनचे प्रमाण कमी होत जाते. तसतसे केसांचा रंगही उडण्यास सुरुवात होते. पुरुषांमध्ये वयाच्या तिशीतच केस पांढरे होण्याची प्रक्रिया सुरू होते तर महिलांमध्ये 35 वयानंतर केस पांढरे होतात.
सुरकुत्या
मुलांच्या त्वचेत खूप आर्द्रता असते.हळूहळू ही आर्द्रता कमी होत जाते. त्यामुळे त्वचा कोरडी आणि ढिली पडते.कोलेजन या पदार्थामुळे त्वचा तजेलदार राहते व त्याला आर्द्रता मिळण्यासही मदत होते. अमेरिकेत सन 2007 मध्ये 75 हजारपेक्षा अधिक लोकांनी सुरकुत्या मिटवण्यासाठी कोलेजन इंजेक्शन घेतले होते.
वाढते वय
शरीरातील पेशी ठरावीक काळानंतर नष्ट होतात. त्याजागी नवीन पेशी येत असतात. परंतु वय वाढते तसे आपल्या शरीरास नवीन पेशी त्याच वेगात उत्पन्न करणे शक्य होत नाही. म्हणजे आधीच्या पेशी नष्ट होत जातात, परंतु नवीन पेशी लवकर जन्मास येत नाहीत त्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात.
बुटके पणा
वयानुसार हाडेही ठिसूळ होत जातात.हाडांमध्ये असणारी तैलपणा कमी होत जातो. त्यामुळे मणक्यातील हाडांमधील जागा घटत जाते. त्यामुळे बुटकेपणा येतो.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com