आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education : MBA Course Admission In Nalsar University Of Law

दिव्य एज्युकेशन : नाल्सार युनिव्हर्सिटी ऑफ लॉच्या एमबीए कोर्समध्ये प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबादच्या नाल्सार युनिव्हर्सिटी ऑफ लॉच्या सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीजच्या एमबीए कोर्समध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया 12 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. दोन वर्षांच्या या कोर्समध्ये एकूण 60 जागा असून विद्यार्थी 20 फेब्रुवारी 2014 पर्यंत अर्ज करू शकतील. अर्जदार विद्यार्थ्यांना कॅट 2013, जीमॅट किंवा जीआरआय स्कोअरच्या आधारे ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी निवडले जाईल. अंतिम गुणवत्ता यादी याच आधारे बनविली जाईल. या माध्यमातून विद्यार्थी कोर्ट मॅनेजमेंट, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि फायनान्शियल सर्व्हिसेस अ‍ॅँड कॅपिटल मार्केट्समध्ये स्पेशलायझेशन प्राप्त करू शकतात.
पात्रता
कोणत्याही शाखेमध्ये 50 टक्के गुणांसह पदवी. शेवटच्या वर्षातील विद्यार्थीही अर्ज करू शकतील.
वयोमर्यादा : सामान्य वर्गात शिकणाºया विद्यार्थ्यांसाठी 30 वर्षे, एससी/ एसटीसाठी 32 वर्षे.
प्रवेश शुल्क
* नाल्सार युनिव्हर्सिटीमध्ये एमबीए कोर्सचे एकूण वार्षिक शुल्क जवळपास 4 लाख रुपये आहे. यामध्ये राहण्याचा व खाण्याच्या खर्चाचा समावेश आहे.
* पुण्याच्या सिम्बायोसिसमध्ये वार्षिक ट्युशन फीस 4 लाख रुपये आहे. ईरमा, आणंदमध्ये एमबीएची एकूण फीस जवळपास 4 लाख 20 हजार रुपये आहे.
लॉबरोबर मॅनेजमेंटची पदवी
एमबीए कोर्समध्ये लॉ आणि मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम एकाचवेळी शिकता येऊ शकणारी नाल्सार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ देशातील एकमेव संस्था आहे. कॉर्पोरेट प्रकरणांमध्ये कायदेशीर बाजू समजून घेण्याच्या दृष्टीने कोर्स तयार करण्यात आला आहे.
निकाल :15 एप्रिल 2014
2030 पर्यंत आपण जगातील सर्वात
मोठे ग्लोबल टॅलेंट होणार, जगात प्रत्येक चार पदवीधारकांमध्ये एक भारतीय
ज्ञान
प्रत्येक स्क्रीन रेटिना डिस्प्ले असत नाही
अ‍ॅपलने मंगळवारी आपला नवा ‘आयपॅड मिनी विथ रेटिना डिस्प्ले’ बाजारात लॉँच केला. हा तुम्ही अ‍ॅपलच्या ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी करू शकता. असे असले तरी, भारतात तो 29 नोव्हेंबर रोजी बाजारात येण्याची शक्यता आहे. रेटिना डिस्प्ले हे त्याचे वैशिट्य आहे. रेटिना डिस्प्ले आणि स्क्रिनच्या क्लियर डिस्प्लेशी संबंधित अन्य शब्द...
अ‍ॅपल कंपनीच्या समोर रेटिना डिस्प्ले शब्द सर्वात आधी आला. त्यांनी याचा वापर 2010 मध्ये आयफोन- 4 शी जोडला. आयपॅडमध्ये लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेचा वापर केला आहे, म्हणजे एलसीडी. ते द्रवरूप असत नाही, त्याचे क्रिस्टल्स स्वत:च्या प्रकाशातून मार्गक्रमण करतात. कोणते छायाचित्र जवळून पाहिले, तर त्याचा एक-एक रंग वेगवेगळा दिसू लागतो. याला ‘पिक्सलेशन’ किंवा सामान्य भाषेत ‘छायाचित्र फाटणे’संबोधले जाते. ‘रेटिना डिस्प्ले’च्या साहाय्याने स्क्रीन एवढे स्पष्ट दिसते की ठराविक अंतरावरून छायाचित्र पाहिल्यास चित्र स्वच्छ व रंग एकमेकांत मिसळले दिसतात.
झूम केल्यामुळे छायाचित्र फाटू लागते
प्रत्येक छायाचित्र छोट्या-छोट्या रंगांच्या वर्गांतून बनते. याला पिक्सल म्हटले जाते. ज्या वेळी चित्राच्या एखाद्या भागाला मोठ्या आकारात दाखवले जाते किंवा त्याला जास्त झूम करून पाहिले जाते तेव्हा त्याचे पिक्सल वेगवेगळे आणि चित्र अस्पष्ट दिसू लागते. मात्र, ज्या छायाचित्रांचे रिझॉल्यूशन जास्त असते, ते फाटलेले दिसत नाही.
डोळ्यातील पडद्यासारखा रेटिना डिस्प्ले
आपण जेव्हा काही पाहतो तेव्हा आपल्या डोळ्यातील पडदा सर्व रंगांना एकाचवेळी पाहतो. वेगवेगळ्या रंगांच्या पिक्सलला पाहत नाही. डोळ्यांना स्वच्छ दिसू शकणारे रेटिना डिस्प्ले टेक्निक याच आधारावर बनले आहे. प्रत्येक छायाचित्र रेटिना डिस्प्ले असू शकत नाही.ज्या छायाचित्रात कमित कमी 163 पिक्सल असतात, त्यास रेटिना डिस्प्ले मानले जाते.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com