आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divya Education: एमबीए प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयआयटी खरगपूर आणि दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश
खरगपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मास्टर ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या(डीटीयू) स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या पूर्णवेळ एमबीएमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी अर्ज करू शकतात. आयआयटीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी आहे. डीटीयूमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल. दोन्ही संस्थांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कॅट-2013 च्या स्कोअरच्या आधारे वैयक्तिक मुलाखत व ग्रुप डिस्कशनसाठी निवडले जाईल.
पात्रता
आयआयटी, खरगपूर
60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग/ टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा सायन्स/ कॉमर्स/ह्युमॅनिटीज स्ट्रीममध्ये पोस्टग्रॅज्युएशनची पदवी.
डीटीयू, दिल्ली
60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेमध्ये बीई/बीटेकची पदवी किंवा फिजिकल, केमिकल, मॅथॅमेटिकल सायन्सेसमध्ये पदव्युत्तर पदवी. अर्थशास्त्र किंवा वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थी अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया
आयआयटी खरगपूरमध्ये ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी निवड करण्याआधी अर्जाचे मूल्यांकन होते. यामध्ये विद्यार्थ्यांचा कामाचा अनुभव आणि शैक्षणिक पार्श्वभूमीला महत्त्व दिले जाते. संस्था कमीत कमी पर्सेंटाइल स्कोअर निश्चित करू शकते. डीटीयूमध्ये कॅट स्कोअरबरोबर पात्रता परीक्षेमध्ये परफॉर्मन्सला महत्त्व असते.
शुल्क
डीटीयूमध्ये एमबीए कोर्सचे शुल्क जवळपास 65 हजार रुपये वार्षिक आहे. यामध्ये निवास व खाण्याच्या खर्चाचा समावेश नाही. आयआयटी खरगपूरमध्ये एमबीएची (एचआरएम) वार्षिक फीस जवळपास 3 लाख रुपये आहे. मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अहमदाबादमध्ये एमबीए कोर्सचे वार्षिक शुल्क 50 हजार रुपये आहे. यामध्ये वसतिगृहाच्या खर्चाचा समावेश आहे.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com