आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divya Education: नवीन व्यवस्थापन अभ्यासक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यवस्थापन अभ्यासक्रमात स्पेशलाइज्ड कोर्सची क्रेझ वाढू लागली, चांगले पॅकेज; परंतु स्पर्धाही खूप
मार्केटिंग, एचआर, फायनान्ससारख्या व्यवस्थापनांचे पारंपरिक प्रवाह अजूनही विद्यार्थ्यांचे आवडते आहेत; परंतु सध्याचा काळ स्पेशलायझेशनचा आहे. डिजिटल कम्युनिकेशन, अ‍ॅग्री-बिझनेस आणि इन्फर्मेशन मॅनेजमेंटसारख्या नवीन शाखांत विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होते. करिअरच्या सुरुवातीलाच आपले आवडीचे क्षेत्र निवडीची संधी त्यात असते. आंत्रप्रिन्योरशिप व्यवस्थापनात विद्यार्थ्यांना केवळ रोजगारच नव्हे, तर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक उपक्रमांसाठी तयार करून देणारे ठरते. आघाडीच्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कडक स्पर्धेचा मुकाबला करावा लागेल.
इन्फर्मेशन मॅनेजमेंट
शुल्क : 2.5 लाख रुपये वार्षिक, कालावधी : 2 वर्षे
जागतिक बाजारपेठेत उद्योगाने स्थिर आणि नफ्यात राहण्यासाठी संशोधन आणि विश्लेषणाला महत्त्व आले आहे. नासकॉमच्या एका अहवालानुसार आगामी दोन वर्षांत मार्केट रिसर्च / अ‍ॅनालिस्टची 10 लाखांहून अधिक जागी नियुक्त्या होतील. इन्फर्मेशन मॅनेजमेंट कोर्समध्ये विद्यार्थ्यांना इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इन्फर्मेशन सिस्टिम्सच्या वापराविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी माहिती आणि उद्योग क्षेत्रात त्याचा गरजेनुसार वापर करू शकतात.
इन्स्टिट्यूट : एनआयएएम
सेंटर फॉर अ‍ॅनालिटिक्स अँड रिसर्च एक्सलन्स, फरिदाबाद.
सुरुवातीचे पॅकेज : 2-4 लाख वार्षिक. नोकरीची संधी तंत्रज्ञान, दूरसंचार, फायनान्स, फार्मा, एफएमसीजी, आयटी, बीपीओ.
अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट
शुल्क : 8 लाख रुपये वार्षिक
कालावधी : दोन वर्षे
रोजगार आणि जीडीपीमधील भागीदारीचा विचार केल्यास कृषी हे देशातील सर्वात मोठे क्षेत्र आहे. चांगले व्यवस्थापन आणि बिझनेस स्किल्सच्या मदतीने या क्षेत्राची क्षमता कितीतरी पटीने वाढवता येऊ शकते. कृषीचा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना या बिझनेस मॅनेजमेंटचा फायदा होऊ शकतो. यात व्यावसायिक कौशल्ये शिकवली जातात. त्यामुळे नवीन संधीचा शोध असणा-यांना त्याचा उपयोग होतो.
नॉलेज अँड टेक्नॉलॉजी
शुल्क : 50 हजार वार्षिक
कालावधी : दोन वर्षे.
व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचे हे संमिर्श असे रूप आहे. सध्याच्या काळात उद्योग आणि अर्थव्यवस्थेने जागतिक स्वरूप धारण केले आहे. तंत्रज्ञानाच्या अभावी व्यवस्थापनाचा अभ्यास करणे म्हणजे बिझनेस सेन्स नसताना तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासारखेच होईल. ज्ञान आणि तंत्रज्ञान व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम इंजिनिअरिंग पदवीची गरज लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आलेला आहे.
संस्था : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद. सुरुवातीचे पॅकेज
2-4 लाख वार्षिक नोकरीची संधी कृषी, फूड प्रोसेसिंग, मार्केटिंग, डेअरिज.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com