आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश सूचना : इंटरनॅशनल स्कूल ऑफ इन्फर्मेशन मॅनेजमेंट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल स्कूल ऑफ इन्फर्मेशन मॅनेजमेंटच्या एमटेक अभ्यासक्रमाला प्रवेश
म्हैसूरच्या इंटरनॅशनल स्कूल ऑफ इन्फर्मेशन मॅनेजमेंटच्या मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी 1 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतील. कॅट, मॅट, गेट पदव्युत्तर प्रवेश परीक्षा किंवा विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर येथे प्रवेश मिळतील.
पात्रता
संबंधित शाखेत, बीई, बीटेक किंवा कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी. याशिवाय कॅट, मॅट, गेट किंवा पीजीसीईटीचे वैध गुण किंवा विद्यापीठाच्या प्रवेश पूर्व परीक्षेत सहभाग घेतलेला असावा.
शुल्क
इंटरनॅशल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन मॅनेजमेंटच्या एमटेकचे प्र्रति सेमिस्टर शुल्क 40 हजार रुपये आहे. जेएनटीयू, अनंतपूर येथे एमटेकचे शुल्क 35 हजार प्रति सेमिस्टर आहे.
लखनऊ विद्यापीठात कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या मास्टर कोर्सला प्रवेश
लखनऊ विद्यापीठाच्या एमसीए अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना 12 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील. प्रवेशपूर्व परीक्षेच्या आधारावर येथे प्रवेश देण्यात येतील.
पात्रता
50 टक्के गुणांसह बीई, बीटेक किंवा बीसीए आवश्यक किंवा कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन किंवा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये बीएस्सी. याशिवाय 10+2 मध्ये गणित विषय.
शुल्क
लखनऊ विद्यापीठात एमसीएचे प्रति सेमिस्टर शुल्क 54 हजार रुपये आहे. एनआयटी संस्थांत एमसीएचे शुल्क 40 ते 50 हजार रुपये. भारती विद्यापीठ पुणे येथे 50 हजार रुपये शुल्क आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी डिप्लोमा कोर्सला प्रवेश
कालिकत येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये डॉट नेट टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 8 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील. पात्रता परीक्षेच्या आधारावर येथे प्रवेश मिळेल.
पात्रता
कोणत्याही शाखेत बीई, बीटेक किंवा एमएसी किंवा बीसीए, एमसीए किंवा कोणत्याही शाखेत पदवी. याशिवाय कॉम्प्युटर प्रोग्रामिंग भाषेची माहिती आवश्यक.
शुल्क
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इर्न्फोमेशन टेक्नॉलॉजीमध्ये डॉट नेट टेक्नॉलॉजीसच्या डिप्लोमा कोर्सचे एकूण शुल्क 10 हजार रुपये आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लॉँट हेल्थ मॅनेजमेंटच्या डिप्लोमा कोर्सला प्रवेश
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लॉँट मॅनेजमेंट, हैदराबाद येथे लाइफ सायन्सेस आणि अ‍ॅग्रीकल्चरच्या डिप्लोमा कोर्सेंना प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 31 जानेवारी, 2015 पर्यंत अर्ज करता येतील. पात्रता परीक्षेच्या आधारावर येथे प्रवेश देण्यात येतील.
पात्रता
अ‍ॅग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, लाइफ सायन्स, रुरल डव्हलमेंट अ‍ॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंटमध्ये पदवी आवश्यक.
शुल्क
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅट हेल्थ मॅनेजमेंटमध्ये सर्व डिप्लोमा कोर्सेसचे एकूण शुल्क 25 हजार रुपये एवढे आहे.
वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडच्या शिकाऊ उमेदवारीला प्रवेश
वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेड येथे ग्रॅज्युव्हेट/ टेक्निशियनच्या शिकाऊ उमेदवारीसाठी विद्यार्थ्यांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील. पात्रता परीक्षेच्या आधारावर येथे प्रवेश मिळतील.
पात्रता
ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेटिंस प्रोग्रामसाठी मायनिंग किंवा माइन सर्व्हेइंगमध्ये बीटेक. टेक्निशियन अ‍ॅप्रेटिंस प्रोग्रामसाठी संबंधित शाखेत डिप्लोमा आवश्यक.
शुल्क आणि शिष्यवृत्ती
या दोन्ही प्रोग्रामसाठी विद्यार्थ्यांना शुल्क नाही. ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटशिपसाठी विद्यार्थ्यांना दरमहा 3560 रुपये शिष्यवृत्ती मिळेल. टेक्निशियनसाठी 2530 रुपये शिष्यवृत्ती मिळेल.

कॉमन काउन्सेलिंग, लॅटरल प्रवेशाची शक्यता आयआयटी आणि एनआयटी शोधणार
आयआयटी आणि एनआयटी संस्थांत जागा रिक्त राहत असल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने पुढील वर्षी सरकारला कॉमन काउन्सेलिंग स्थापन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. यासोबतच न्यायालयाने म्हटले की,सरकार यूजी कोर्सच्या दुसर्‍या वर्षात एनआयटी व इतर इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश देण्याबाबची शक्यता पडताळून पाहावी. आरक्षित जागांवर खुल्या जागांचे प्रवेश देता येतील का, याबाबतही न्यायालयाने सरकारकडून उत्तर मागितले आहे. या सर्व मुद्द्यांवर सरकारला 30 नोव्हेंबरपर्यत आपला अहवाल न्यायालयात सादर करावा लागेल. आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्रवेशासाठी कॉमन कॉन्सिलिंगचा प्रस्ताव गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र, आयआयटी संस्थेच्या धोरणामुळे यावर अजूनपर्यंत काहीही निर्णय होऊ शकला नाही.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com