आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • DU MBA Course : Delhi Univesity's MIB MHROD Course Entrance

डीयू- एमबीए कोर्स: दिल्ली विद्यापीठाच्या एमआयबी / एमएचआरओडी कोर्सेसमध्ये प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली विद्यापीठाच्या मास्टर इन इंटरनॅशनल बिझनेस(एमआयबी) आणि मास्टर इन ह्यूमन रिसोर्स अ‍ॅँड ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट(एमएचआरओडी) कोर्सच्या प्रवेशासाठी विद्यार्थी 7 ऑक्टोबरपासून अर्ज करू शकतात. अर्जाची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर आहे. आयआयएमसाठी होणा-या कॉमन अ‍ॅडमिशन टेस्टच्या(कॅट) आधारावर प्रवेश होईल.

दोन्ही अभ्यासक्रमांसाठी 73 जागा असून कोर्सची मुदत दोन वर्षे आहे.
पात्रता
कोणत्याही शाखेच्या परीक्षेत किमान 50 टक्के तर कॅटमध्ये किमान 80 टक्के गुण आवश्यक.
निवड पद्धती
कोर्समध्ये तीन स्तरावर प्रवेश मिळेल. सुरुवातीस कॅट पर्सेंटाइलच्या आधारावर विद्यार्थ्यांची चाळणी होईल. यानंतर ग्रुप डिस्कशन व त्यानंतर निवडलेल्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
शुल्क
दोन्ही कोर्सचे वार्षिक शुल्क 9 हजार रुपये . प्रवेश, परीक्षा आणि नोंदणी शुल्क 6,996 रुपये आहे. दिल्लीच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडची ट्यूशन फिस वार्षिक 6 लाख 37 हजार रुपये असून अन्य खर्च 50 हजार रुपये आहे.
मार्केटिंगच्या विद्यार्थ्याना सर्वाधिक नोक-या, बीटेक फ्रेशर्सना सर्वात जास्त ऑफर
मास्टर ऑफ इंटरनॅशनल बिझनेसच्या विद्यार्थ्यांना मार्केटिंगमध्ये सर्वाधिक नोक-या मिळत आहेत. गेल्यावर्षी 37 टक्के विद्यार्थ्यांना या क्षेत्रात टॉप कंपन्यांनी नोक-या दिल्या. त्याचप्रमाणे मास्टर ऑफ ह्यूमन रिसोर्स अ‍ॅँड ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंटच्या विद्यार्थ्यांना लर्निंग व डेव्हलपमेंट विभागात ऑफर मिळत आहेत. समर प्लेसमेंटमध्ये केवळ वर्षभराचा अनुभव असलेले किंवा बीटेक फ्रेशर्सना कंपन्यांन्यांनी प्रथम प्राधान्य दिले. विशेष म्हणजे नुकतीच पदवी मिळवलेले हे विद्यार्थी एमबीए करत होते. ओगिल्वी अ‍ॅँड मॅथर, डाबर, डॉ. रेड्डीसारख्या मोठ्या कंपन्यांनी घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी 47 टक्के फ्रेशर्स होते.
न्यूज
हेरगिरीत करिअरसाठी विद्यापीठात अभ्यासक्रम
हेरगिरी शिकण्यासाठी आता विद्यार्थी अभ्यासक्रम करू शकतील. सुरक्षा आणि हेरगिरी संस्थांना व्यावसायिक मिळवून देण्यासाठी सरकारने देशातील 10 विद्यापीठांमध्ये सेक्युरिटी स्ट्रॅटजी स्टडी विभाग सुरू करण्याची योजना आखली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने अध्यक्ष वेद प्रकाश यांच्या म्हणण्यानुसार काही विद्यापीठांत हा अभ्यासक्रम पुढील वर्षीपासून व दहाही विद्यापीठात सुरू होण्यासाठी आणखी चार वर्षे लागतील. पदवी व पदव्यूत्तर स्तरावर हा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अभ्यासक्रमासाठी जागा व शुल्क निश्चिती अद्याप बाकी आहे.
टीव्ही शो
स्ट्रॅटजीज शिकण्याचीही संधी
काही दिवसांपूर्वी आयआयएम अहमदाबादमध्ये चित्रपट उद्योग व्यवस्थापन शिकवण्यासाठी अभ्यासक्रम सुरू झाला होता. त्याची लोकप्रियता पाहून संस्थेने टीव्ही रिअ‍ॅलिटी शोवर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यात विद्यार्थ्यांना रिअ‍ॅलिटी शो व डेली सोपच्या योजनेविषयी शिकवले जाईल. टीव्ही उद्योग सुमारे 14 भाषांत आपले कार्यक्रम प्रसारित करू लागले आहे. त्यामुळेच अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी प्रादेशिक भाषेत देखील तेथे सहजपणे व्यवस्थापन करू शकतील. हा इलेक्टिव्ह कोर्स पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रम व्यवस्थापनातील दुस-या वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकवला जाईल.
अचिव्हमेंट
आयआयएम-अहमदाबादचा माजी विद्यार्थी 90 देशांतील पेप्सिकोचा सीईओ
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादचे माजी विद्यार्थी संजीव चढ्ढा यांना आशिया, मध्य-पूर्व व आफ्रिकेतील देशांचे पेप्सिकोच्या सीईओपदी नियुक्त करण्यात आले आहे. चढ्ढा गेल्या 23 वर्षांपासून पेप्सिकोशी जोडलेले आहेत. आता ते 90 देशांतील पेप्सिकोच्या ग्लोबल फूड ऑपरेशन्सची देखरेख करतील. करिअरची सुरूवात त्यांनी ब्रूकबाँडपासून केली होती. भारतासाठी चढ्ढा यांची नियुक्ती अतिशय महत्वपूर्ण आहे. पेप्सिकोच्या ग्लोबल सीईओ इंदिरा नुई देखील आयआयएम कोलकात्याच्या माजी विद्यार्थी आहेत.
आयआयटी-चेन्नईचे तीन विद्यार्थ्यांना 92 लाखांचे पॅकेज
आयआयटी-चेन्नईमध्ये प्लेसमेंटसाठी कंपन्यांनी अजून सुरूवातही केली नाही, तोच येथील तीन विद्यार्थ्यांना आघाडीच्या आयटी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली. कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी गुरू प्रकाश, संतोष कुमार, कविन कार्तिक यांना गुगलने 92 लाख रुपयांचे पॅकेज दिले आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा बंगळुरू येथे तीन महिन्यांची इंटर्नशिप केली. त्यानंतर मुलाखतीमधून अंतिम निवड झाली.


शब्द - लफ्ज - - word
> खिन्नता- दिलगिरी- - word
> रसन - - word - दोर
> Torment - अजाब - कष्‍ट


प्रश्न आणि सूचनेसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा ई-मेल करा
Torment
education@dainikbhaskargroup.com