आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अगोदर कामाचा अनुभव घ्‍या, नंतर एमबीएचा विचार करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅनेजमेंटच्या क्षेत्रात करिअर करण्‍याची इच्छा आहे.पहिल्यांदा कोणत्याही मॅनेजमेंट संस्थांमध्‍ये प्रवेशापूर्वी व्यवस्थापनाशी संबंधित संस्थांमध्‍ये नोकरीचा अनुभव घ्‍यायचा प्रयत्न करा. या दरम्यान योग्य पध्‍दतीने वेळेचे नियोजन करुन तुम्ही एमबीए एन्ट्रास परीक्षेची चांगल्या पध्‍दतीने तयारी करु शकता.याच्याशी संबंधित कॅट, मॅट यासारख्‍या प्रवेश परीक्षा असतात. त्यासाठी तुम्हाला खूप वेळ द्यावे लागेल. शैक्षणिक पात्रतेनंतर तुम्हाला तयारीसाठी वेळ मिळते आणि नोकरीचाही अनुभव मिळतो.
प्रवेशाच्या वेळी मॅनेजमेंट संस्था अशाच विद्यार्थ्‍यांना प्राधान्य देतात. यामुळे वर्तमान स्थितीत पदवीनंतर लगेच एमबीएकडे वळू नका. कोणत्याही प्रतिष्ठित संस्थांमध्‍ये सध्‍या कामाचा अनुभवही खूप महत्त्वाचा मानला जातो. नव्या विद्यार्थ्‍यांजवळ नोकरीचा अनुभव नसतो. मग प्लेसमेंटच्या वेळी कंपन्याही कामाचा अनुभव असलेल्या विद्यार्थ्‍यांना प्राधान्य देतात. यामुळे मॅनेजमेंट संस्थांची निवड आणि अर्ज भरण्‍यापूर्वी बाजारातील अनुभव अवश्‍य घ्‍या. हाच नवा करिअर ट्रेण्‍ड आहे.