आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divya Education: एनसीएचएमसीटी प्रवेश सूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशभरातील ६० हॉटेल मॅनेजमेंट संस्थांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी ६ एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीद्वारा २५ एप्रिल रोजी आयोजित जेईई-२०१५ च्या माध्यमातून प्रवेश दिला जाईल. यात २१ केंद्र आणि १६ राज्य सरकारद्वारा संचालित संस्था असून १४ खासगी आहेत. ९ फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूट्सच्या डिप्लोमा अभ्यासक्रमालाही या आधारेच प्रवेश दिला जाईल.

स्पर्धा
जागा- 7482
अर्जदार- 1 लाख (सुमारे )
कालावधी- 3 वर्षे
पात्रता- कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण. यंदा बारावीला असलेले विद्यार्थीसुद्धा अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय १ जुलै २०१५ रोजी २२ वर्षांपेक्षा कमी नसावे.
शुल्क- सरकारी संस्थांमध्ये प्रथम वर्षासाठी ६४ हजार रुपये शुल्क भरावे लागतील. एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये प्रथम वर्षाला ६८ हजार रुपये शुल्क असेल.

एनएलयू, दिल्ली- दिल्लीच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या पदव्युत्तर आणि पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ७ एप्रिलपर्यंत अर्ज करता येईल. संस्थेद्वारा आयोजित पूर्वपरीक्षेच्या (एआयएलईटी) माध्यमातून यास प्रवेश दिला जाईल.

कंपीटिशन
जागा- 105
अर्जदार- 15 हजार (सुमारे )

कालावधी- 5-1 वर्षे

पात्रता- बीए एलएलबीसाठी ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण. एलएलएमसाठी ५५ टक्के गुणांसह कायद्याची पदवी असणे आवश्यक आहे.

शुल्क- पदवी अभ्यासक्रमासाठी वार्षिक ८५ हजार रुपये तर पदव्युत्तरसाठी ६५ हजार रुपये शुल्क आहे. बंगळुरूत यासाठी अनुक्रमे ८० हजार आणि ३० हजार रुपये वार्षिक शुल्क आकारले जाते.

एनआयटी, वारंगल- वारंगलच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी २ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात. कॅट किंवा मॅटमधील गुण, समूहचर्चा व मुलाखतीच्या आधारे प्रवेश दिला जाईल.

पात्रता- ६० टक्के गुणांसह इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमधील पदवी. सोबतच कॅट किंवा मॅटचा व्हॅलिड स्कोअर आवश्यक आहे.

शुल्क- एमबीएसाठी प्रत्येक सत्राला ३५ हजार रुपये ट्यूशन फी आहे. कालिकतच्या एनआयटीमध्ये प्रत्येक सत्राला १७ हजार ५०० रुपये शुल्क आकारले जाते.
आयएसएम, धनबाद
धनबादच्या इंडियन स्कूल ऑफ माइन्सच्या एक्झिक्युटिव्ह एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी ७ मेपर्यंत अर्ज करू शकतात. संस्थेद्वारा आयोजित पूर्वपरीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे यास प्रवेश दिला जाईल.

स्पर्धा
जागा- 50

अर्जदार - 8 हजार (सुमारे )
कालावधी - 2 वर्षे
पात्रता
५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. सरकारी किंवा खासगी क्षेत्रात किमान एक वर्षाच्या कामाचा अनुभव आवश्यक आहे.

शुल्क
एक्झिक्युटिव्ह एमबीएचे एकूण शुल्क २.९० लाख रुपये आहे. उदयपूरच्या आयआयएमच्या पीजीपीएक्ससाठी ५.५० लाख रुपये शुल्क आकारले जाते.

मणिपाल विद्यापीठ
मणिपाल विद्यापीठाच्या एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी ३० मेपर्यंत अर्ज करू शकतात. संस्थेद्वारा आयोजित ऑनलाइन पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून यास प्रवेश दिला जाईल.

पात्रता
५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. कॅट, जॅट, मॅट, सीमॅट िकंवा जीमॅट या परिक्षेत व्हॅलीड स्कोअर आवश्यक.
शुल्क
मणिपाल विद्यापीठाच्या एमबीएसाठी एकूण ५ लाख ६० हजार रुपये शुल्क आहे. ख्राइस्ट विद्यापीठात यासाठी सुमारे ८ लाख रुपये शुल्क घेतले जाते.