आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • IBST 2013 : Manegament And P.hd Course Entrace Examination

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयबीएसएटी - 2013: मॅनेजमेंट व पीएचडी कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन बिझनेस स्कूलच्या(आयबीएस) दोन वर्षांच्या व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी आणि पीएचडी कोर्समध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी 15 जुलैपासून 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. प्रवेश परीक्षा(आयबीएसएटी) 16 डिसेंबरपासून 7 जानेवारीपर्यंत होईल. या माध्यमातून विद्यार्थी हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, गुडगाव, कोलकाता, पुणे, डेहराडून आणि जयपूर येथील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येईल. यामध्ये दरवर्षी 50 हजार विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील.


पात्रता
दोन वर्षांचा मॅनेजमेंट प्रोग्राम : पदवीमध्ये 50 टक्के गुण आवश्यक. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला नाही, त्यांनी टीओईएफएल/ एनईएलटी / आयईएलटीएसचा स्कोअर 31 मेपर्यंत देणे आवश्यक आहे.
पीएचडी प्रोग्राम : पदवीमध्ये 50 टक्के गुण आवश्यक. पीजी मॅनेजमेंटमध्ये 60 टक्के गुण आवश्यक.


निकाल : 20 जानेवारी 2014


शुल्क : दोन वर्षांच्या एमबीए कोर्सचे शुल्क वार्षिक 6 लाख रुपये तर 4 वर्षांच्या पीएचडी कोर्सचे शुल्क वार्षिक 1.30 लाख रुपये आहे. मणिपाल विद्यापीठामध्ये एमबीएचे एकूण शुल्क 6 लाख रुपये आहे. पुणे येथील सिम्बॉयोसिस संस्थेत एमबीएची वार्षिक फी सुमारे 5 लाख रुपये आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ गुवाहाटीमध्ये पीएचडीचे प्रतिसेमिस्टर शुल्क सुमारे 17 हजार रुपये आहे.


परीक्षा पद्धती
दोन तासांच्या पेपरमध्ये चार विभाग असतील. यातील एकूण 125 बहुपर्यायी प्रश्नात 50 व्हर्बल अ‍ॅबिलिटी, 25 रीडिंग कॉम्प्रिहेंशन, 25 क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड आणि 25 डाटा सफिशिएंसी व इंटरप्रिटेशनशी संबंधित असतील. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नाही.


निवड प्रक्रिया
विद्यार्थी आयबीएसएटीशिवाय जीमॅट व कॅटच्या स्कोअरचा वापर प्रवेशासाठी करू शकतील. प्राथमिक स्तरावर निवडलेल्या विद्यार्थ्यांना हैदराबाद येथे अंतिम निवड प्रक्रियेसाठी बोलावले जाईल. यामध्ये ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत होईल. अ‍ॅकॅडमिक रेकॉर्ड, ग्रुप डिस्कशन व मुलाखतीतील एकत्रित गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाईल.


दोन वर्षांचा स्कोअरची ग्राह्य
आयबीएसमध्ये प्रवेश घेण्यासाठी 2010 व त्यानंतरचा कॅट स्कोअर ग्राह्य धरला जाईल. जे विद्यार्थी जीमॅट किंवा कॅट स्कोअर सादर करतील त्यांनी आयबीएसटी-2013 देण्याची गरज नाही. डेहराडून आणि जयपूरच्या आयसीएफएआय विद्यापीठ आणि आयबीएसच्या सर्व कॅम्पस एमबीए प्रोग्रामसाठी कॅट आणि जीमॅट स्कोअर कार्ड स्वीकारतील.


नोक-या
आयबीएसमध्ये गेल्यावर्षी 90 टक्के प्लेसमेंट ऑन कॅम्पस आणि 10 टक्के ऑफ कॅम्पस झाले. राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्तरावरील कंपन्यांनी मॅनेजमेंट ट्रेनीच्या पदावरील विद्यार्थ्यांना वार्षिक 10.4 लाख रुपयांपर्यंत पॅकेज दिले आहे. आंतरराष्‍ट्रीय स्तरावर वार्षिक 24 लाख रुपये सर्वाधिक पॅकेज राहिले. डी.ई. शॉ, महिंद्रा सत्यम, आयसीआयसीआय बॅँक, विप्रो टेक्नॉलॉजी आणि स्मार्ट बॅँक यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी सर्वाधिक नोक-या दिल्या.


रंजक
विचारपूर्वक निर्णय घ्या
एक सेल्समन व क्लर्क आपल्या व्यवस्थापकासोबत लंचला जात होते. रस्त्यात एक दिवा पडलेला होता. दिवा घासल्यानंतर त्यातून एक राक्षस बाहेर पडला. राक्षसाने तिघांना वर मागण्यास सांगितले. सेल्समन आपल्या कामावर नाराज होता, त्यामुळे त्याला लगेच काहीतरी नवे पाहिजे होते. सर्वात आधी तो म्हणाला, मला कोणाच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊन स्पीडबोट चालवायची आहे. राक्षसाने वर दिल्यानंतर सेल्समन बेपत्ता झाला. क्लर्कने सेल्समनप्रमाणे विदेशात घर मागितले, नंतर तो पण बेपत्ता झाला. आता वर मागण्याची व्यवस्थापकाची वेळ आली. तो स्वत:बद्दल नव्हे तर आपले काम व्यवस्थित व्हावे याचा विचार करत होता. तो म्हणाला, या दोघांना लंच ब्रेकनंतर पुन्हा कामावर पाठवा.


मॉरल : मिळालेले काम चांगल्या पद्धतीने करा. आपली इच्छा योग्य वेळेत पूर्ण होईल. दुस-यांनी व्यक्त केलेल्या इच्छेची नक्कल करू नये. स्वत:ची स्वप्ने पाहा. त्यासाठी प्रयत्न करा. त्याचबरोबर स्वत:चे काम काळजीपूर्वक पद्धतीने करा.


इंटरेस्‍टींग कोट
“Effective leadership is putting first things first. Effective management is discipline, carrying it out.” -Stephen Covey
प्राधान्य देण्यास प्राप्त गोष्टींनाच प्रभावी नेतृत्व महत्त्व देतात. प्रभावी व्यवस्थापन शिस्त आणि शिस्तीला चालना देणे होय.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com