आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • IGNOU Offers Management, Nursing And Education Courses

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या इग्नूच्या बीएड कोर्सच्या प्रवेश परीक्षेची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ एज्युकेशन (बीएड) कोर्समध्ये प्रवेशासाठी 8 सप्टेंबर रोजी प्रवेश परीक्षा होईल. ही परीक्षा 18 ऑगस्ट रोजी होणार होती, मात्र इग्नूने त्यात बदल करून नवी तारीख जाहीर केली आहे. हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा आहे.

पात्रता
कोणत्याही शाखेची 50 टक्के गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक. त्याबरोबर कोणत्याही शाळेत शिकवण्याचा दोन वर्षांचा अनुभव बंधनकारक.

निकाल : ऑक्टोबर 2013
परीक्षा पद्धती
दोन तासांच्या परीक्षेत 100 प्रश्न असतील. यातील एका भागात जनरल इंग्लिश अ‍ॅँड कॉम्प्रिहेन्शनचे 10, लॉजिकल अ‍ॅँड अ‍ॅनॅलिटिकल रीझनिंगचे 20, एज्युकेशन अ‍ॅँड जनरल अवेअरनेसचे 25 तसेच शिकवण्याबाबत 25 प्रश्न असतील. दुसर्‍या भागात सायन्स, मॅथ्स, सोशल स्टडीज, इंग्लिश किंवा हिंदीमध्ये कोणत्याही एका विषयावर 20 प्रश्न विचारले जातील.

शुल्क : इग्नूमध्ये बीएडचे एकूण शुल्क 20 हजार आहे. अण्णामलाई युनिव्हर्सिटीमध्ये बीएडचे एकूण शुल्क 1 लाख 10 हजार रुपये आहे.

एनएलयू - 2013
दिल्लीच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये पीजी डिप्लोमा कोर्सेसमध्ये प्रवेश
दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये एन्व्हॉयर्नमेंटल मॅनेजमेंट अँड लॉ आणि टुरिझम अँड एन्व्हॉयर्नमेंटल लॉमध्ये पीजी डिप्लोमा कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. तिन्ही कोर्सेस डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाच्या सहकार्याने चालवले जातात. यातील जागा ठरलेल्या नाहीत.

पात्रता : तिन्ही कोर्सेससाठी कोणत्याही शाखेची पदवी. पीजीडी इन टुरिझम अँड एन्व्हॉयर्नमेंटल लॉसाठी दोन वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक.

तिन्ही कोर्सेसचे शुल्क वेगवेगळे
एन्व्हॉयर्नमेंटल लॉ अँड पॉलिसी कोर्सचे एकूण शुल्क 12 हजार 500 रुपये. अर्बन एन्व्हॉयर्नमेंटल मॅनेजमेंट अँड लॉचे शुल्क 10 हजार 500 रुपये तसेच टुरिझम अँड एन्व्हॉयर्नमेंटल लॉच्या पीजी डिप्लोमा कोर्सची फीस 25 हजार रुपये आहे.

पीएचडी करणार्‍यांच्या संख्येत देशात वाढ
देशात संशोधक विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, चीन व अमेरिकेच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. यूजीसीच्या अहवालानुसार, 2008-09 च्या तुलनेत 50 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी संशोधन केले आहे. 2009 मध्ये हा आकडा 10,781 होता. 2012 मध्ये ही संख्या 16,093 पर्यंत पोहोचली. युनेस्को इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिटिक्सच्या अहवालानुसार, शोधनिबंधाची संख्याही वाढली आहे. 2000 मध्ये 26 हजार असलेले शोधनिबंध 2012 मध्ये 44 हजार झाले. अमेरिकेत 2007 मध्ये पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 41 हजार 614 आणि चीनमध्ये 48 हजार 112 होती.

अभियांत्रिकीचे विद्यार्थी कमी होणार
अहमदाबादमधील आयआयएम संस्थेत 2014 च्या बॅचमध्ये अभियांत्रिकी शाखेची पार्श्वभूमी नसलेले सर्वाधिक विद्यार्थी असतील. संस्थेने नॉन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांची संख्या 18 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अभियांत्रिकीची पदवी नसलेले सध्या 4 टक्के विद्यार्थी आहेत. कामाच्या अनुभवापेक्षा फ्रेशर्सना प्राधान्य दिले जाईल. असे असले तरी सर्व बॅचमध्ये केवळ 27 टक्के विद्यार्थी फ्रेश ग्रॅज्युएट्स आहेत. संस्था वेगवेगळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ इच्छित आहे.

जन्मानंतर सहा दिवसांत मेरी झाली राणी
स्कॉटलंडचे राजे किंग जेम्स-5 यांचा डिसेंबर 1942 मध्ये मृत्यू झाला तेव्हा त्यांना एकमेव मेरी स्टुअर्ट अपत्य होते. मेरीचा जन्म 8 डिसेंबर 1542 रोजी झाला होता आणि 14 डिसेंबरला त्यांना राणी घोषित करण्यात आले. त्यांचा लहानपणाचा बराच कालावधी फ्रान्समध्ये गेला. 1559 मध्ये फ्रान्सचे राजे झालेल्या फ्रान्सिस यांच्याशी त्यांचा 1558 मध्ये विवाह झाला. लग्नाच्या दुसर्‍या वर्षी फ्रान्सिस यांचे निधन झाले. यानंतर मेरी स्कॉटलंडला परतली व 1559 मध्ये हेन्री स्टुअर्टशी त्यांचा विवाह झाला. 1567 मध्ये घरातील स्फोटात हेन्रीचा मृत्यू झाला होता. काही महिन्यांनंतर देशातील जनतेच्या विरोधामुळे मेरीला सिंहासन सोडावे लागले. त्यानंतर त्यांचा एक वर्षाचा मुलगा देशाचा राजा झाला.

प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा 9200001174 या क्रमांकावर