आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IIM Course Entrance: IIM Ahmedabad Post Graduate Programe In

आयआयएम कोर्सेसमध्ये प्रवेश: आयआयएम- अहमदाबादच्या पोस्ट ग्रॅज्यूएट प्रोग्रॅम इन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅग्रीबिझनेस मॅनेजमेंटसाठी(जीजीपीएबीएम) विद्यार्थी अर्ज करू शकतात. कॅट स्कोअरच्या आधारावर विद्यार्थ्यांची निवड होईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च 2014 मध्ये ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.


पात्रता
विद्यार्थी कृषीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त असावा. यात त्याला किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक. एससी/ एसटीच्या विद्यार्थ्यांसाठी 45 टक्क्यांची अट. अन्य शाखेत पदव्युत्तर पदवी प्राप्त
किंवा शेवटच्या वर्षांतील विद्यार्थीही अर्ज करू शकतात. निवडीवेळी कॅट स्कोअरला 70 टक्के तर अ‍ॅप्लिकेशन रेटिंगला 30 टक्के महत्त्व दिले जाईल.


शुल्क
पीजीपीएबीएमचे वार्षिक शुल्क 7 लाख 90 हजार रुपये आहे. यामध्ये लॅपटॉप, प्रवास व अन्य खर्चाचा समावेश नाही. संस्था गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते.


अ‍ॅग्रीबिझनेस मॅनेजमेंट कोर्स जगात पहिल्या क्रमांकावर
फ्रान्सच्या एडयूनिव्हर्सल संस्थेने गेल्यावर्षी या पोस्ट ग्रॅज्यूएट कोर्सला पहिला क्रमांक दिला. एडयुनिव्हर्सल दरवर्षी जगभरातील जवळपास 1 हजार संस्थांतील 12 हजार मास्टर डिग्री कोर्सेसमधून सर्वश्रेष्ठ कोर्सेची निवड करते. यामध्ये ऑस्ट्रेलियाची मेलबर्न यूनिव्हर्सिटी, कॅलिफोर्निया यूनिव्हर्सिटी आणि चीनच्या शांघाय जियो टॉन्ग यूनिव्हर्सिटीसारख्या संस्थांतील अभ्यासक्रमांना मागे टाकले आहे. आयआयएम अहमदाबादने 1974 मध्ये कृषी अभ्यासक्रम सुरू केला. दरवर्षी या कोर्ससाठी साधारण 1 लाख 20 हजार विद्यार्थी अर्ज करतात, त्यापैकी केवळ 40 जणांची निवड होते.


आयआयएम-रायपूरच्या एफपीएम कोर्समध्ये प्रवेशासाठी अर्ज
रायपूरच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या फेलो प्रोग्रॅम इन मॅनेजमेंटसाठी(एफपीएम) विद्यार्थी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2014 आहे. दरवर्षी जवळपास 1.5 लाख विद्यार्थी आयआयएमच्या या कोर्ससाठी अर्ज करतात.


पात्रता
कोणत्याही शाखेच्या पदव्युत्तर पदवीमध्ये 55 टक्के गुण आवश्यक. सीए, सीएस किंवा आयसीडब्ल्यूए यासारख्या व्यावसायिक पदवीमध्ये 55 टक्के गुण. बीई किंवा बीटेकच्या पदवीमध्ये 60 टक्के गुण आवश्यक. पदवीच्या शेवटच्या वर्षांत शिकणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात.


निवड प्रक्रिया
विद्यार्थ्यांना आपला सामायिक प्रवेश परीक्षेचा(कॅट) स्कोअर एकत्र करावा लागेल. निवडलेल्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक मुलाखतीसाठी 4 आणि 5 एप्रिल रोजी बोलावले जाईल. 14 जून 2014 ही नोंदणीची अंतिम मुदत आहे. 30 जूनपासून तासिका सुरू होतील.


या विषयांमध्ये स्पेशलायजेशन
* बिझनेस पॉलिसी अ‍ॅँड स्ट्रॅटजी * आयटी अ‍ॅँड सिस्टिम्स
* ओबी अ‍ॅँड एचआरएम
* इकॉनॉमिक्स अ‍ॅँड बिझनेस एन्व्हायरमेंट * फायनान्स अ‍ॅँड * अकाउंटिंग * मार्केटिंग * ऑपरेशन्स


संस्था सर्व खर्च उचलते
आयआयएमच्या पूर्णवेळ संशोधक विद्यार्थ्यांना सर्व अ‍ॅकेडमिक आणि अन्य खर्चासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. पहिल्या आणि दुस-या वर्षामध्ये 30 हजार रुपये प्रतिमहा आणि तिस-या व चौक्या वर्षामध्ये 35 हजार रुपये प्रतिमहा शिष्यवृत्ती दिली जाते. याव्यतिरिक्त 40 हजार रुपये वार्षिक कंटिंजन्सी ग्रॅँट आणि लॅपटॉप खरेदीसाठी 50 हजार रुपये. एखादा विद्यार्थी आंतरराष्‍ट्रीय परिषदेसाठी जात असेल तर संस्था 1.5 लाख रुपयांपर्यंत खर्च उचलते.


निकाल : 10 एप्रिल 2014


वृत्त
शुल्कवाढीआधी आम्हाला विचारा; सरकारचे आयआयएमला निर्देश
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संस्थांनी शुल्कवाढ करण्याआधी मनुष्यबळ विकास मंत्रालयाची परवानगी घ्यावी, असे निर्देश सरकारने दिले आहेत. माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या एप्रिलमध्ये आयआयएम अध्यक्ष आणि संचालकांसोबत झालेल्या बैठकीत मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी हे निर्देश दिले. सध्याच्या रचनेत आयआयएमच्या पोस्ट ग्रॅज्यूएट कोर्सची फिस आयआयएम बोर्ड स्वतंत्ररित्या घेते. यामध्ये केंद्र सरकारची कोणतीच भूमिका नसते. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव बोर्डाचे सदस्य असतात हा भाग वेगळा. मनुष्यबळ विकास मंत्री आयआयटी परिषदेचे अध्यक्ष असतात त्यामुळे आयआयटीसारख्या मोठ्या संस्थांचे शुल्क ठरवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. सरकारचे निर्देश म्हणजे आपल्या कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप असल्याचे आयआयएम संस्थांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आयआयएमचे शुल्क काही पटीत वाढले आहे, परिणामी सरकारला संसदेत विरोधकांच्या टीकेला तोंड द्यावे लागले.


शब्द लफ्ज word
> आढावा - तबसिरा - Review
> पजीराई - मनोरंजन - entertainment
> Splendour - झगमगाट - चमक-दमक


प्रश्न आणि सूचनेसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com