सिध्दार्थ जी. जे. हा एक मोटिव्हेशनल स्पीकर, सर्टिफाइड डॉक्युमेंटरी क्रेडिट स्पेशलिस्ट आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी सिध्दार्थ यांना मित्र म्हणून संबोधले होते. एकदा ते कलाम यांनी प्रोटोकॉल तोडून गर्दीतून त्या मित्राला भेटले.
जन्माच्या काही महिन्यांनंतर सिध्दार्थला सेरेब्रल पाल्सी हा गंभीर आजार जडला. हा असा आजार आहे ज्यात मेंदूच्या एका भागाला अर्धांगवायूचा झटक बसतो. शरीरातील स्नायू दुर्बल होता. व्यक्ती हालचाल करु शकत नाही. सिध्दार्थने या आजाराशी लढता लढता आपल्या प्रवासा अनेक यशाचे शिखर सर केले आहे. आज ते दुस-यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरले आहे.
कदाचित अशी काही नशीबवान लोक असतील ज्यांना डॉ.कलाम यांनी आपले मित्र म्हटले असेल. माजी राष्ट्रपती सिध्दार्थची दृढ इच्छाशक्ती पाहून प्रभावित झाले होते.
(भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा आज म्हणजे 15 ऑक्टोबरला 84 वा वाढदिवस आहे. यानिमित्त divyamarathi.com त्यांच्याशी संबंधित आठवणी ताजे करीत आहे. )
पुढे वाचा.. डॉ. कलाम असे भेटले सिध्दार्थला