आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Management Course In Business Schools, Divya Education

दिव्य Education: बी स्कूल्समध्ये व्यवस्थापन कोर्सेसच्या प्रवेशासाठी मेमध्ये होणार मॅट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरातील 600 पेक्षा जास्त बिझनेस स्कूल्समध्ये मॅनेजमेंट कोर्सेसच्या प्रवेशासाठी मॅनेजमेंट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट मे महिन्यात होईल. त्यासाठी विद्यार्थी 19 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. पेपर बेस्ड चाचणी 4 मे रोजी आणि संगणक आधारित चाचणी 10 मे रोजी होईल. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनकडून मॅट वर्षात चार वेळेस फेब्रुवारी, मे, सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये परीक्षा आयोजित करते.

पात्रता कोणत्याही शाखेची पदवी. या वर्षी शेवटच्या वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात.

परीक्षा पद्धती
अडीच तासांच्या परीक्षेत 200 प्रश्न विचारले जातील. यामध्ये लॅँग्वेज कॉम्प्रिहेन्शन, मॅथमेटिकल स्किल्स, डाटा अ‍ॅनालिसिस, रिझनिंग आणि इंडियन अ‍ॅँड ग्लोबल एनव्हायर्नमेंटचे 40-40 प्रश्न असतील. प्रश्नप्रत्रिका पाच भागात असेल आणि प्रत्येक भागातील प्रश्न सोडवण्यासाठी ठरावीक वेळ असेल.

शुल्क
आइमाचे सदस्य संस्थांमध्ये एमबीए कोर्सचे शुल्क वेगवेगळे आहे. पुण्याच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट कोर्सचे एकूण शुल्क जवळपास 5 लाख रुपये आहे. हैदराबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक एंटरप्रायजेसमध्ये दोन वर्षांच्या कोर्सचे शुल्क 7 लाख रुपये आहे.

निवड प्रक्रिया
मॅट चाळणी परीक्षेप्रमाणे आहे. याचा स्कोअर एका वर्षापर्यंत चालतो. या स्कोअरच्या आधारावर विद्यार्थी वेगवेगळ्या बी-स्कूल्सच्या मॅनेजमेंट कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. प्रत्येक संस्थेमध्ये प्रवेशाच्या वेगवेगळ्या अटी आहेत.

निकाल : मे, 2014

अमृता युनिव्हर्सिटीमध्ये एमटेक कोर्ससाठी प्रवेश
अमृता युनिव्हर्सिटीच्या मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी 5 मेपर्यंत अर्ज करू शकतात. प्रवेश चाचणी 11 मे आणि मुलाखत 12 मे रोजी होईल. याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नॅनो सायन्स अ‍ॅँड टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी आणि मॉलिक्युलर मेडिसिनच्या एमटेक कोर्सेसमध्ये प्रवेश मिळेल. ज्या विद्यार्थ्यांकडे गेटचा व्हॅलिंड स्कोअर आहे, त्यांना प्रवेश परीक्षा देण्याची आवश्यकता नाही.

पात्रता
नॅनो सायन्स अ‍ॅँड टेक्नॉलॉजी : 60 टक्के गुणांसह फिजिक्स, केमिस्ट्री, झुऑलॉजी, बायोकेमिस्ट्री किंवा बायोइन्फॉर्मेटिक्समध्ये एमएस्सी पदवी किंवा बीटेक, बीफार्मसी, एमबीबीएस किंवा बीडीएस पदवी.

नॅनो टेक्नॉलॉजी :
60 टक्के गुणांसह फिजिक्स, केमिस्ट्री किंवा मटेरियल सायन्समध्ये एमएस्सी अथवा इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल किंवा मटेरियल सायन्समध्ये बीटेक पदवी.

मॉलिक्यूलर मेडिसिन :
60 टक्के गुणांसह लाइफ सायन्सेसमध्ये एमएस्सी किंवा बायोटेक्नॉलॉजी अथवा बायोइन्फॉर्मेटिक्समध्ये बीटेक पदवी किंवा एमबीबीएस, बीफार्मसी किंवा बीडीएस झालेले असावे.

शुल्क अमृता विद्यापीठात एमटेकच्या अभ्यासक्रमासाठी वर्षाला एक लाख रुपये शैक्षणिक शुल्क आहे. मणिपाल विद्यापीठात एमटेक अभ्यासक्रमाला वर्षभराचे शुल्क 1 लाख 35 हजार रुपये आहे.

प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा
(education@dainikbhaskargroup.com)