आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमबीए व इंजिनिअर्सच्या तुलनेत कुशल उमेदवार मिळवत आहेत उत्तम पॅकेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तंत्रनिकेतन अथवा व्यावसायिक शिक्षणाला त्याच लोकांचा पर्याय मानला जातो जे उत्तम शैक्षणिक प्रदर्शन सादरीकरण करू शकलेले नाहीत. पण वास्तवात कुशल उमेदवार आता इंजिनिअर्स व एमबीएच्या तुलनेत उत्तम वेतन मिळवत आहेत. स्टाफिंग सोल्युशन्स कंपनी टीमलीज सर्व्हिसेसच्या १२ सेक्टर्सवर केले गेलेले संशोधन हेच सांगते की, व्यावसायिक शिक्षणावर आधारित काही नोकऱ्यांत वेतन इंजिनिअर्सच्या तुलनेत १०-२७ टक्के अधिक आहे. संशोधनानुसार १२ मधून ६ क्षेत्रे-सेक्टर्स - अॅपरल्स, ऑटोमोटिव्ह, बांधकाम, अन्नप्रक्रिया, जेम्स अँड ज्वेलरी व लॉजिस्टिक्समधील काही जॉब प्रोफाइल्समध्ये वेतन एमबीएपेक्षा अधिक आहे. तथापि संशोधनात टॉप स्कूल्सचे एमबीए व इंजिनिअरिंग पदवीधारकांना समाविष्ट केले गेलेले नाही.

का वाढत आहेत पॅकेज
टीमलीजची सहसंस्थापक ऋतुपर्ण चक्रवर्ती हिच्या मतानुसार, वेतनश्रेणीमधील बदलासाठी दोन कारणे जबाबदार आहेत. पहिले कारण मागणी आणि पुरवठ्यामधील वाढते असंतुलन आणि दुसरे कुशल कर्मचाऱ्यांचा तुटवडा. कारण की, अशा नोकऱ्यांसाठीची कार्यशक्ती मनुष्यबळ प्रशिक्षित नाहीये. आणि जो सध्याचा प्रवाह आहे व उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये जे आहेत ते पूर्वीच्या तुलनेत खूपच जास्त अधिक कमावत आहेत.

कोठे आहे मागणी
स्किल इंडिया व मेक इन इंडिया मोहिमांमुळे कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. मेक इन इंडियाच्या अंतर्गत २४ क्षेत्रे ज्यात ऑटोमोबाइल्स, एव्हिएशन, जैवतंत्रज्ञान, केमिकल्स, बांधकाम क्षेत्र, इलेक्ट्रिकल मशिनरी, इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स व मायनिंग समाविष्ट आहे. यात रोजगार निर्मितीच्या उद्दिष्टांकडे पाहता व्यावसायिक कौशल्याची मागणी वेगाने वाढते आहे.
अंदाजानुसार इलेक्ट्रॉनिक्स उद्योगदेखील रोजगार निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका वठवू शकतो. एकीकडे फॉक्सकॉननेच २०२०पर्यंत आपले मॅन्युफॅक्चरिंग हब्जसाठी १० लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. याचप्रमाणे जियाओमी भारतात आपली मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सच्या विस्ताराच्या संधी शोधत आहेत. सॅमसंग, सोनीदेखील या प्रक्रियेमध्ये आहेत.

मागणी अधिक, पुरवठा कमी
साधारणत: एक कोटी भारतीय दरवर्षी मनुष्यबळ क्षेत्रात प्रवेश करतात. पण १० मधून एकाचकडे तसे कौशल्याचे प्रशिक्षण आहे. १५ -२९ वर्षांच्या युवकांद्वारे मिळवलेले वा घेतलेले व्यावसायिक शिक्षण, एकूण संशोधनाच्या फक्त २.८ टक्केच आहे. जेव्हा की कौशल्याची देशात मोठी मागणी आहे. कारण की अधिकतर भारतीय नोकऱ्या कौशल्यावर आधारित आहेत. अशातच करिअरच्या दृष्टीने ही पुन्हा विचार करण्याची वेळ आहे. जिथे शिक्षणास केवळ काही पर्यायांपर्यंतच मर्यादित करून देणे स्वत:च्या क्षमतांवर अंकुश लावण्यासारखेच आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणाला किती वेतन... काय आहे आवश्यकता... उत्तम शिक्षणाचे प्रयत्न
बातम्या आणखी आहेत...