आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MAT September 2013: Manegment Collages Examination

मॅट-सप्टेंबर 2013 : व्यवस्थापन महाविद्यालयांसाठी परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या सप्टेंबरमध्ये होणा-या मॅनेजमेंट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (मॅट) परीक्षेसाठी विद्यार्थी 17 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. मॅटचे पेपरवर आधारित परीक्षा 1 सप्टेंबरला व संगणकावर आधारित परीक्षा 7 सप्टेंबरपासून होईल.


स्पर्धा
183 महाविद्यालये
1 लाख अर्जदार
2 वर्षे कालावधी


पात्रता
कोणत्याही विषयातील पदवीधर. पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थीदेखील परीक्षेसाठी अर्ज करू शकतो. कोणत्याही वयोमर्यादा नाही.


निकाल : सप्टेंबरचा शेवटचा आठवडा


शुल्क : सर्व महाविद्यालयातील शुल्क वेगवेगळे आहे. एमिटी विद्यापीठात एमबीएचे वार्षिक शुल्क सुमारे 2.36 लाख रुपये आहे. इतर छोट्या महाविद्यालयांत वार्षिक अध्ययन शुल्क 2 ते 3 लाख रुपये आहे. सिम्बायोसिसमध्ये एमबीएचे वार्षिक शुल्क सुमारे 4 लाख रुपये आहे.


परीक्षा पद्धत
150 मिनिटांच्या पेपरमध्ये 200 प्रश्न असतील. सर्व प्रश्न बहुपर्यायी प्रकारातील असतील. त्यात भाषा, गणितीय कौशल्ये, सांख्यिकी विश्लेषण, बौद्धिक व तार्किक , भारतीय व जागतिक पर्यावरणविषयक 40-40 प्रश्न असतील.


स्कोअर कार्डची वैधता
बहुतेक व्यवस्थापकीय संस्थांमध्ये मॅटचे स्कोअर कार्ड एक वर्षापर्यंत वैध मानले जाते. अर्थात वर्षभर त्याच स्कोअर कार्डच्या साह्याने विद्यार्थी व्यवस्थापन महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतो. प्रत्येकवेळी मॅटमध्ये सहभागी महाविद्यालयांची संख्या वेगळी असते. फेब्रुवारीमध्ये झालेल्या मॅटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 400 महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता.


परदेशी विद्यापीठातही प्रवेश
मॅटच्या माध्यमातून यंदा अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ सिएटल व स्पेनच्या युनिव्हर्सिटी ऑफ कार्लाेस-3 मॅड्रिड या दोन परदेशी विद्यापीठांत प्रवेश मिळणार आहे. कार्लाेस विद्यापीठात एमबीएचे शुल्क 10 लाख 50 हजार रुपये आहे. तर सिएटल विद्यापीठात एमबीए अभ्यासक्रमाचे शुल्क 19 लाख 61 हजार रुपये आहे.


ज्ञान
स्वत:चे काम स्वत: केल्यानेच प्रगती
एका धोब्याने एक कुत्रे व एक गाढव होते. मालकाचे लक्ष कुत्र्याकडे जास्त नव्हते. त्यामुळे कुत्रे नाराज होते. म्हणूनच एकदा रात्री चोर घरात घुसले तेव्हा कुत्र्याने भुंकायचे नाही, असे ठरवले. म्हणजे आपण मालकाचा सूड घेऊ, असे त्याला वाटे. परंतु गाढव मालकाविषयी प्रामाणिक होते. कुत्र्याचे काम गाढवाने केले व तो जोरजोराने ओरडायला लागला. गाढवाचा आवाज ऐकून चोर पळून गेले. मालक झोपेतून जागा झाला. परंतु झोपमोड झाल्याने मालकाने गाढवाला मारहाण केली.


गाढवास शिकवण मिळाली : स्वत: चेच काम केले पाहिजे, दुस-याचे नव्हे.
आणखी एक दृष्टिकोन : धोबी व्यवस्थापनाचा विद्यार्थी होता. गाढवाच्या ओरडण्यामागे काहीतरी कारण असावे, असा विचार त्याने केला. घराबाहेर पडला आणि थोड्या प्रयत्नाने त्याने चोराला पकडले. गाढवाला प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल अधिक चारा दिला. कुत्र्याचे कामदेखील केले तर अधिक फायदा होईल, असे गाढवाला वाटले. कुत्र्याला वाटले गाढव माझे काम करत आहे, मग फुकटचे तुकडे मोडायला काय हरकत आहे. गाढवाला स्टार परफॉर्मर मानले जाऊ लागले, परंतु त्याला स्वत: चे काम तर करावेच लागले. कुत्र्याच्या कामाने त्याला कामाचा बोझा वाटू लागला. त्रस्त होऊन तो आता नवीन नोकरीच्या शोधात आहे.
पुन्हा गाढवाला धडा : जेवढे भेटत आहे, तेवढेच काम करा.


रंजक
सँडविचदेखील मिळते मॅकडोनाल्ड्सवर
> 1952 मध्ये जगातील पहिल्या मॅकडोनाल्ड्स रेस्तराँमध्ये बर्गरशिवाय मॅक हॅगीज नावाचे सँडविच मिळत होते. आता रेस्तराँच्या कोणत्याही चेनमध्ये सँडविच मिळत नाही.
> आपल्या शरीरात 10 टक्के वजन त्या जीवाणूंचे आहे, जे आपल्या त्वचेवर राहतात.
> पेन्सिल शार्पनरला धार लावण्यासाठी पेन्सिलला अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून अधिक शार्प केले जाऊ शकते.


इंटरेस्टिंग कोट
“Management is efficiency in climbing the ladder of success; leadership is determining whether the ladder is leaning against the right wall.” -Stephen Covey
यशाची शिडी सहजपणे चढण्याचे नाव म्हणजे व्यवस्थापन तर ही शिडी योग्य जागी आहे किंवा नाही, हे नेतृत्वामुळे समजू शकते.


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल कराeducation@dainikbhaskargroup.com