आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरात एमबीए हायरिंग, कुशल उमेदवारांनाच मिळतेय संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीमॅकच्या ताज्या पाहणीनुसार जगभरातील ८४ टक्के कंपन्या यंदाच्या वर्षी आपल्या मनुष्यबळ विकास कार्यक्रमात नवीन एमबीएच्या उमेदवारांना संधी देण्याच्या विचारात आहेत. ९२ टक्के कंपन्यांसह अमेरिका त्यात अव्वल आहे. आशिया-प्रशांत प्रदेशात हा आकडा ७५ टक्के एवढा आहे. त्याबाबत भारतातील बाजारपेठेतही चित्र सकारात्मक दिसू लागले आहे. कंपन्यांकडून उद्योगाच्या प्रगतीबरोबरच व्यवस्थापनातील पदवीधरांची मागणीही वाढेल.

नोकऱ्या नेमक्या कोठे मिळतील ?
मारूति सुझुकी इंडियाची यंदाच्या आर्थिक वर्षाखेरीस सुमारे २, ५०० रिलेशनशिप मॅनेजर्सची नेमणूक करण्याची योजना आहे. त्याशिवाय मोठ्या सरकारी कंपन्या म्हणजे सिटीबँक, केपीएमजी, पीडब्ल्यूसी भारतात एमबीए पदवीधारकांना नोकरीची संधी देण्याची तयारी करत आहे. केपीएमजीने नोकरभरीतमध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ केली आहे. पीडब्ल्यूसी देखील यंदा त्यात १० ते २० टक्क्यांनी वाढ करणार आहे. प्रमुख बिझनेस पदांसाठी स्नॅपडील यंदा १५० एमबीए उमेदवारांना संधी देईल. सोबतच वोडाफोन १३० पदांची भरती करेल. गोदरेज देशील गतवर्षीच्या तुलनेत यंदा एमबीएच्या उमेदवारांच्या भरतीमध्ये १० ते १२ टक्क्यांनी वाढ करेल. त्याशिवाय फ्युचर ग्रुप १०० ते १५० एवढी व्यवस्थापकीय पदे भरण्याची शक्यता आहे.

नोकऱ्या लाखोंमध्ये, मात्र केवळ १० टक्के पात्र
नोकऱ्या वाढत आहेत, ही चांगली बातमी आहे. परंतु लाखो नोकऱ्यांसाठी पात्र आणि कुशल मनुष्यबळाचा मात्र अभाव आहे. ही चिंतेची बाब ठरते. त्याचे आकडे धक्कादायक आहेत. भारतात दरवर्षी मॅनेजमेंटचे तीन लाख पदवीधर उत्तीर्ण होतात, परंतु त्यापैकी ३५,००० उमेदवार नोकरीसाठी पात्र ठरतात.। वेगवेगळ्या पाहणीनुसार बी स्कुलच्या पदवीधरांच्या रोजगाराचे प्रमाण १० ते २१ टक्के आहे.
यंदा आघाडीच्या २२ बी-स्कूलच्या १,०३३ एमबीए पदवीधारकांना दहा कंपन्यांकडून देण्यात आली संधी.

पुढे जाणून घ्‍या, स्पेशलायझेशनबद्दल कल व वेतनाचे पॅकेजविषयी...