आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NAARM 2014: National Academy Of Agriculture Research Mangement Entrance

एनएएआरएम - 2014: नॅशनल अकॅडमी ऑफ अ‍ॅग्रीकल्चर रिसर्च मॅनेजमेंटच्या पीजीडीएम प्रवेश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्चने स्थापन केलेल्या हैदराबादच्या नॅशनल अकॅडमी ऑफ अ‍ॅग्रीकल्चर रिसर्च मॅनेजमेंटच्या (एनएएआरएम) पीजीडीएम (कृषी) कोर्समध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी आता अर्ज करू शकतील. अर्ज प्रक्रिया 18 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. त्यासाठी कॅट किंवा सीमॅटचा व्हॅलिड स्कोअर आवश्यक. दोन वर्षाच्या या कोर्ससाठी 30 जागा आहेत.
पात्रता
अ‍ॅग्रीकल्चर, अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट, अ‍ॅग्रीकल्चरल इंजिनियरिंग, डेअरी टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, हॉर्टिकल्चर किंवा व्हेटर्नरी सायन्स यापैकी कुठलीही पदवी. शेवटच्या वर्षातील विद्यार्थीही अर्ज करू शकतात. मात्र, त्यासाठी त्यांनी 1 जुलै 2014 पूर्वीची पदवी असावी.
निवड प्रक्रिया
अर्ज करणा-या विद्यार्थ्यांची कॅट/सीमॅट स्कोअरच्या आधारे छाननी केली जाईल. त्यानंतर त्यांना गु्रप डिस्कशन व वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. गुणवत्ता यादी तयार करताना त्यांच्या अकॅडमिक गुणांना महत्त्व दिले जाईल.
- कॅट/सीमॅट स्कोअर 40 % - वैयक्तिक मुलाखत 25 % - ग्रुप डिस्कशन 25% - अकॅडमिक रेकॉर्ड 10%
निकाल : मे, 2014(संभाव्य)
शक्कर्क्वंभ्ख्र्
पीजीडीएम कोर्सचे एकूण शुल्क जवळपास 5 लाख 60 हजार रुपये आहे. यामध्ये ट्युशन, राहण्या-खाण्याच्या खर्चाचा समावेश आहे. हैदराबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅग्रीकल्चर एक्स्टेंशन मॅनेजमेंटमध्ये या कोर्सचे शुल्क सुमारे 3 लाख 50 हजार रुपये आहे.
वृत्त
शाळा लष्करातील नोकरीसाठी प्रोत्साहन
लष्करात नोकरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने(सीबीएसई) सर्व शाळांना दिले आहेत. यामध्ये लष्करात करिअर करण्याचे फायदे तसेच आव्हानांची माहिती देण्यात आली आहे. विशेषकरून अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांसाठी हे निर्देश देण्यात आले आहे. शाळांनी नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अ‍ॅँड ट्रेनिंगच्या इंडियन आर्मी : अ ग्लोरियस हेरिटेज या पुस्तकाची त्यासाठी मदत घ्यावी, असे सीबीएसईने म्हटले आहे. तरुणांना शिक्षण घेतानाच लष्करी सेवेकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सीबीएसईच्या या निर्णयाची अंमलबजावणी पुढील वर्षापासून सुरू होईल.
आयआयएमचे विद्यार्थी टीव्ही बिझनेस शिकणार
आयआयएम, अहमदाबादमध्ये विद्यार्थ्यांना आता टीव्ही सोप आणि रिअ‍ॅलिटी शोजच्या व्यवसायासंबंधी शिक्षण दिले जाणार आहे. इन्स्टिट्यूटने या नव्या कोर्सचा आराखडा तयार केला असून अकॅडमिक कौन्सिलची मंजुरी मिळणे बाकी आहे. मंजुरीनंतर हा ऐच्छिक कोर्स पोस्ट ग्रॅज्युएट मॅनेजमेंट प्रोग्रॅमच्या दुस-या वर्षातील विद्यार्थ्यासाठी लागू केला जाईल. कोर्स अभ्यासक्रमात त्यांना टीव्ही प्रोग्रॅमच्या इकॉनॉमिक्स, प्रोडक्शन आणि मार्केटिंगसंदर्भात सविस्तर माहिती दिली जाईल. इन्स्टिट्यूटने याआधी 2008 मध्ये चित्रपट उद्योगावर ऐच्छिक कोर्सची सुरुवात केली होती. याला मिळालेल्या प्रतिसादामुळे नवा कोर्स सुरू होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे.
हेरगिरीच्या भीतीमुळे मणिपाल विद्यापीठाचा एक्स्चेंज प्रोग्रॅम स्थगित
मणिपाल विद्यापीठातील विद्यार्थी आता चीनच्या प्रसिद्ध बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेऊ शकणार नाहीत, तसेच दोन्ही विद्यापीठे फॅकल्टी एकमेकांकडे पाठवू शकणार नाहीत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार, यूजीसीने यावर स्थगिती आणली आहे. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चीन फॅकल्टीच्या नावाखाली भारतात हेर पाठवू शकतो, तसे झाल्यास देशासाठी तो मोठा धोका ठरेल. विद्यापीठाने यावर्षी बीजिंग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीसोबत एक करार केला होता. या अंतर्गत फॅकल्टी व विद्यार्थ्यांच्या देवाणघेवाणीसोबत शैक्षणिक सहल आणि संयुक्त संशोधन प्रकल्पाची योजना होती. गृह मंत्रालयाने मात्र त्याला मंजुरी देण्यास नकार दिला.
लर्निंग
काळानुरूप silly शब्दाचा अर्थ बदलला
सिली(silly) शब्दाचा वापर सध्या मूर्ख, बेफिकीर, बेजबाबदार या अर्थाने केला जातो. मात्र, काही शतकांपूर्वी त्याचा वापर एकदम उलट केला जात असे. प्राचीन इंग्रजीमध्ये त्याचा उपयोग भाग्यवान, नशिबाचा धनी किंवा आनंद या अर्थाने केला जात होता. तेराव्या शतकामध्ये पवित्र स्त्रीसाठी सेली मेडन(silly maiden
) शब्दाचा वापर केला जात होता. यानंतर निरागस (innocent) शब्दासाठी वापर होऊ लागला. सोळावे शतक सुरू होताना त्याला असहाय, दयेस पात्र आदी तसेच अशिक्षित, कमकुवत, कनिष्ठ दर्जाचे लोक या अर्थाने वापर होऊ लागला. यानंतर कमकुवत मेंदू या अर्थाने तो प्रचलित झाला.
शब्द लफ्ज word
> विचाराधीन - दरपेश- under consideration
> टिकाऊ - durable - रासिख
> Apprehension शंका - खदशा
प्रश्न आणि सूचनेसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com