आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर कॉर्नर : ऑनलाइन एमबीए करा, नोकरीत मिळवा प्रमोशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रस्तुत छायाचित्र सादरीकरणासाठी वापरले आहे. - Divya Marathi
प्रस्तुत छायाचित्र सादरीकरणासाठी वापरले आहे.
बहुतेक बी स्कूल आता पारंपरिक एमबीएसह ऑनलाइन एमबीए प्रोग्रॅम्सही उपलब्ध करुन देत आहेत. यास ब्लँडेड लर्निंग एमबीए, ई लर्निंग एमबीए, स्मार्ट एमबीए असेही संबोधले जाते. हा अभ्‍यासक्रम विद्यार्थी, मॅनेजर, एक्झ‍िक्युटिव्ह आणि इतर मिडिल मॅनेजर श्रेणीतील लोकांसाठी तयार केला आहे. विशेषत: नोकरी करणा-यांसाठी ज्यांना नियमित एमबीए अभ्‍यासक्रमासाठी वेळ मिळत नाही.
का आहे गरजेचं?
सौविकला मॅनेजमेंट शिक्षणाचे महत्त्व नेहमी वाटायचे. मात्र बी.कॉम पूर्ण केल्यानंतर त्याला तत्काळ नोकरी सुरु करावी लागली. शेवटी त्याने नोकरी करता-करता ऑनलाइन मॅनेजमेंट शिक्षण देणा-या कंपनीच्या एका सर्टिफिकेट प्रोग्रॅमसाठी(बिझनेस मॅनेजमेंट) प्रवेश घेतला. आयआयएम कलकत्ता द्वारे चालवले जाणारे या प्रोग्रॅममधून सौविकने व्यवस्थापनाशी संबंधित संकल्पना, टूल्स आणि तसेच मॅनेजमेंटमधील अद्ययावत ट्रेंड्सचाही अभ्‍यास केला. आयआयएमच्या प्राध्‍यापकांनी तयार केलेल्या या कोर्सचा त्याला खूप फायदा झाला. या सर्टिफिकेशनसह आता एक चांगली नोकरी मिळवणे हे सौविकसाठी अवघड राहिले नव्हते. लवकरच तो चांगल्या कंपनीत मार्केटिंग कम्युनिकेशन्स प्रमुख म्हणून जॉइन झाला. युवा पदवीधर आणि नोकरी करणा-यांसाठी ऑनलाइन एमबीए प्रोग्रॅम वरदान म्हणून सिध्‍द होईल. यामुळे नोकरीसह मॅनेजमेंट शिक्षण घेणे सोपे होऊ शकते.
पुढील स्लाइड्सवर वाचा फायदे, व्हर्च्युल अध्‍ययनाचे यूएसपी, कॅम्पस लर्निंग आणि ऑनलाइन एमबीएमधील फरक, फ्लेक्झ‍िबिलिटीसह डिग्री, उद्योग भेट, प्रवेशापूर्वी काही गोष्‍टी ध्‍यानात ठेवा...