आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Symbiosis School Of Banking And Finance Addition Alert

सिम्बायोसिस अ‍ॅडमिशन अलर्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकिंग अँड फायनान्स कोर्ससाठी प्रवेश अर्जाची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर

पुण्याच्या सिम्बायोसिस स्कूल ऑफ बँकिंग अंड फायनान्सच्या एमबीए कोर्सच्या प्रवेशासाठी विद्यार्थी अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांची निवड सिम्बायोसिसच्या सर्व विभागांत होणाºया नॅशनल अ‍ॅप्टिट्यूड टेस्टच्या माध्यमातूनच होईल. परीक्षा 15 डिसेंबरला होईल. अभ्यासक्रमासाठी 60 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल.
पात्रता
कोणत्याही विषयात पदवीत 50 टक्क्यांहून अधिक गुण. एससी-एसटीसाठी 45 टक्के गुण गरजेचे. यंदा पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाºया विद्यार्थ्यांनाही परीक्षा देता येऊ शकते.

प्रवेश प्रक्रिया
स्नॅप टेस्टनंतर 16 जानेवारीला विद्यार्थ्यांना खासगी मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात येईल. 7 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीदरम्यान मुलाखत होईल. अंतिम गुणवत्ता यादी 28 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येईल.

शुल्क सिम्बायोसिसच्या बँकिंग अँड फायनान्समध्ये एमबीएचे शुल्क 5 लाख 21 हजार रुपये आहे. एक्सएलआरआय, जमशेदपूरमध्ये पीजीडीएम अभ्यासक्रमासाठी एकूण शुल्क 1 लाख 50 हजार रुपये आहे, तर फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज दिल्ली विद्यापीठात एमबीएसाठी वार्षिक अध्ययन शुल्क सुमारे 10 हजार 800 रुपये आहे.

परीक्षा पद्धती
120 मिनिटांत 180 गुणांचे पेपर असतील. त्यात सामान्य इंग्लिश, संख्यात्मक क्षमता, डेटा विश्लेषण, डेटा सफिशिएन्सी, सामान्यज्ञानाचे 40-40 प्रश्न असतील. त्याशिवाय विश्लेषणात्मक व तार्किक असे 60 प्रश्न असतील. चुकीच्या उत्तरासाठी 25 टक्के मायनस मार्किंग असेल.
आयआयटी खरगपूरमध्ये प्री प्लेसमेंट ऑफर्समध्ये 100 टक्के वाढ
आयआयटी मुंबईमध्ये दांडीयात्रेचे स्मारक तयार होणार
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सन 1930 मध्ये दांडी यात्रा काढण्यात आली होती. त्याची स्मृती म्हणून आयआयटी मुंबईमध्ये 7 नोव्हेंबरपासून स्मारकाचे बांधकाम सुरू होणार आहे. त्याची घोषणा पंतप्रधानांनी 2005 मध्ये केली होती. त्याचे डिझाइन, समन्वय आणि तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी आयआयटीवर सोपवण्यात आली. संस्थेच्या पवई कॅम्पसमध्ये 7 ते 24 नोव्हेंबर व 7 ते 22 डिसेंबरपर्यंत दोन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी जगातील सुमारे 40 कलावंतांची टीम तयार करण्यात आली आहे. स्मारकाचे क्षेत्रफळ 15 एकर क्षेत्रफळात विस्तारलेले असेल. 5 मार्च 1930 ला दांडी यात्रेच्या समारोपानंतर गांधीजी सैफी व्हिला याच घरात उतरले होते.

रंजक विधाने
>प्रत्येक सकाळी मी जगातील सर्वात श्रीमंतांची यादी पाहतो. त्यात माझे नाव नसेल, तर मी पुन्हा आपल्या कामाला लागतो.
-रॉबर्ट ऑर्बन
अमेरिकेचे विनोदी लेखक
>पैशाने आनंद विकत घेता येत नसतो, असे मानणाºयांना खरेदी कोठून करावी हे ठाऊक नसते.
-बो डेरॅक, अभिनेत्री.
>आपली कोणालाच पर्वा नाही, असे वाटत असेल तर उसने पैसे घेऊन लपून बसा.
-अर्ल विल्सन, अमेरिकी पत्रकार.

Rhyme Time
Don't bring camels in the classroom.
Don't bring scorpions to school.
Don't bring rhinos, rats, or reindeer.
Don't bring mice or moose or mule.
Pull your penguin off the playground.
Put your python in a tree.
Place your platypus wherever
you think platypi should be.

Lose your leopard and your lemur.
Leave your llama and your leech.
Take your tiger, toad, and toucan
anywhere but where they teach.

Send your wombat and your weasel
with your wasp and wolverine.
Hide your hedgehog and hyena
where you're sure they won't be seen.

Please get rid of your gorilla.
Please kick out your kangaroo.
No, the teacher didn't mean it
when she called the class a "zoo."
-Kenn Nesbitt
´
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com