आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tata Institute Of Social Science Post Graduation CET Examinition

भास्कर एज्युकेशन: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या पदव्युत्तर प्रवेश परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या पदव्युत्तर पदवी कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा 15 डिसेंबरला होणार आहे. त्यासाठी विद्यार्थी 25 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. या परीक्षेच्या माध्यमातून संस्थेच्या 45 पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकतो.

पात्रता
सर्व अभ्यासक्रमांसाठी पदवीधर आवश्यक. पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थीदेखील अर्ज करू शकतो. हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन व सोशल वर्क इन डिसेबिलीटी स्टडीज अँड अ‍ॅक्शन सारख्या काही अभ्यासक्रमासाठी संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक अनुभवी विद्यार्थ्यांना प्राधान्य.

निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया दोन टप्प्यात होईल. राष्ट्रीय प्रवेश चाचणीच्या आधारे विद्यार्थ्यांना मुलाखतपूर्व चाचणी / समूह चर्चा , वैयक्तिक मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. त्यात 50 टक्के महत्त्व प्रवेश परीक्षा, 20 टक्के समूह चर्चा व 30 टक्के मुलाखतीसाठी दिले जाईल.

निकाल : एप्रिल 2014
वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ
को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंटसाठी प्रवेश

पुण्याच्या वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंटच्या अ‍ॅग्री-बिझनेसमधील पदव्युत्तर पदविकेसाठी विद्यार्थी आता अर्ज करू शकतात. अर्ज कॅट, जॅट, मॅट, सीमॅट व एटीएमएच्या वैध स्कोअरच्या आधारे प्रवेश निश्चित केला जातो. अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे आहे. अर्जाची तारीख 28 फेब्रुवारी आहे.

पात्रता
कोणत्याही शाखेत 50 टक्के गुणांसह पदवी. एससी / एसटी वर्गासाठी 45 टक्के गुण आवश्यक.

निवड प्रक्रिया
पात्रता परीक्षेतील वैध स्कोअरच्या आधारे विद्यार्थ्यांना समूह चर्चा, क्षमता चाचणी, वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. गुणवत्ता यादी त्याच आधारावर तयार केली जाईल.

रिझर्व्ह बँकेचे कार्य
वाढती महागाई आणि घसरत्या रुपयाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाची सुत्रे स्वीकारली. ते 23 वे गव्हर्नर आहेत.ढासळत्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी राजन यांच्याकडून काही ठोस निर्णयांची अपेक्षा केली जात आहे. यासंदर्भात आपण जाणून घेऊ बँकेच्या कार्यपध्दतीविषयी ...
०क्रेडिट कंट्रोलर : बँकेचे व्याजदर,खुल्या बाजारातील काम आणि इतर घडामोडींव्दारे व्यावसायिक बँकांच्या क्रेडीटवर नियंत्रण ठेवण्याचे काम रिझर्व्ह बँक करते.यामुळे किमती आणि एक्सचेंज रेट संतुलित राहण्यास मदत होते.
०एक्सचेंज कंट्रोल : देशाला आवश्यक असलेली परदेशी गंगाजळीचा स्तर कायम ठेवण्यासाठी परदेशी चलनाच्या सर्वच व्यवहारांवर बँकेची निगराणी असते.व्यवहारांवर नियंत्रणही ठेवते.गरज पडल्यास रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करून परदेशी चलनाची खरेदी-विक्री करु शकते.
०मनी सप्लाय कंट्रोलर : बाजारातील चलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी रोख राखीव प्रमाण (सीआरआर) आणि बँक व्याज दर,स्पेशल लिक्विडिटी रेशो (एसएलआर) चा दर कमी-अधिक करू शकते. रोख राखीव प्रमाण म्हणजे प्रत्येक बँकेला रिझर्व्ह बँकेकडे विशिष्ठ रक्कम ठेवावी लागते. याशिवाय सोने,सिक्युरिटीज आणि रोख रक्कमेचा ठराविक हिस्साही ठेवावा लागतो.त्याला एसएलआर म्हणतात.

Words the internet
Reinvented...
1.Friend : Friend was used as a verb as early as the 13th century, but it fell out of the use until recently. The popularity of social networking sites gave the verb 'friend' new meaning. If you add someone to your social network, you are friending that lucky soul. Removing someone from your network can be called unfriending.

2. Like : English speakers have been liking since 9th century and having likes and dislikes since 15th century. But the rise of social media has given the term a new relevance. On various social networks, if you wish to show appreciation for a post, you can like it. It may be called hearting, favoriting or upvoting.

3. Link : Sometimes also called hyperlinks and URLs, links are objects, often text or images, that when clicked, bring you to another location on the web. This term emerged in English in the 15th century, and was used early on to describe loops forming a chain.

4. Surf: When surf first entered English in the 1600s, it referred to waves or the movement of waves. The late 1800s saw a new sense of the word : 'to ride or to be carried on the breaking crest of a wave, esp. using a surfboard.' In 1980s this sense was metaphorically extended to apply to channel surfing on cable television. By the early 90s, this sense was further extended to the internet. However 20 years later, this term lost its hipness and internet users today might opt for a more tongue-in-check expression, such as cyberloafing.

शब्द - लफ्ज - word
> पूर - सैला - flood
> दर्सगाह - विद्यालय - Scool
> Stalwart - निष्ठावान - वफादार

प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com