शिक्षण क्षेत्रात योगदान देण्याची इच्छा असल्यास टीच फॉर इंडिया फेलोशिप
आपल्याला ही संधी देऊ शकते. हा दोनवर्षीय पूर्णवेळ सशुल्क असा आव्हानात्मक फेलोशिप प्रोग्राम आहे.
तसे पाहता टीच फॉर इंडिया एक ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणारी बिगर व्यावसायिक संघटना आहे, जो की टीच फॉर ऑल ग्लोबल मूव्हमेंटचा एक भाग आहे. देशाच्या सात शहरांत मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद आणि बंगळुरूत आपल्या फेलोशिप प्रोग्रामद्वारे टीएफआयसारख्या भारतीय कॉलेज पदवी आणि वर्किंग प्रोफेशनल्सला नियुक्त करतात. ते आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या शाळांत पूर्णवेळ शिक्षकाच्या स्वरूपात दोन वर्षे अध्यापनाचे काम करतात. हे फेलो शिक्षक असमानतेला संपुष्टात आणण्यासाठी काम करतात. टीच फॉर इंडिया फेलोला आपल्या नेतृत्वक्षमतेच्या आधारावर विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण काम करावे लागते व हेे शिक्षक ते करतात.
शिक्षणाआधी प्रशिक्षण
सर्वप्रथम पाच आठवडे स्थानिक प्रशिक्षण प्रोग्रामच्या रूपात या फेलोशिपची सुरुवात होते. यानंतर फेलो करिक्युलम, लेसन प्लॅनिंग, स्टुडंट असेसमेंटसह सफल शिक्षणाची पद्धत शिकतात. प्रत्येक फेलोजवळ प्रोग्राम मॅनेजरच्या रूपात एक मेंटर असतो. जो प्रभावशाली टीचर व लीडर बनवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करत असतो. कार्यक्रमाच्या दुसऱ्या वर्षात फेलोला बी द चेंज नावाचा प्रकल्प करावा लागतो. यात शिक्षकांना नव्या कल्पनांसह शिक्षणात बदल आणण्यासाठी काम करावे लागते.
पात्रता -योग्यता
कोणत्याही विषयात पदवीधर असणे जरुरी आहे. उमेदवार ग्रामीण भागात काम करण्यास इच्छुक हवा. यासह समाजात बदल आणण्याची त्याची भावना एक जिद्द असली पाहिजे.
असा करा अर्ज
टीच फॉर इंडिया फेलोशिपसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. याशिवाय कोणत्याही दुसऱ्या प्रकारे अर्ज प्रक्रियेस मान्यता नाही. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही तसेच कुठलेही लिखित निवेदन वा सीव्ही पाठवावा लागत नाही.
फेलोशिपचा फायदा
टीच फॉर इंडिया फेलोशिपअंतर्गत प्रत्येक महिन्याला त्या प्रशिक्षित शिक्षकास १७,५०० रुपये दिले जातात. आयआयटी, आयआयएम, सेंट स्टीफन्स कॉलेज, सेंट झेवियर्स कॉलेज, प्रेसिडेन्सी कॉलेज, ख्राइस्ट युनिव्हर्सिटीसारख्या प्रतिष्ठित कॉलेजची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसह एक्सेंचर, मॅक्विंजे, महिंद्रा अँड महिंद्रा, आयबीएम, अर्न्स्ट अँड यंगसारख्या कंपन्यांचे व्यावसायिक या फेलोशिपमध्ये सहभाग घेतात. यामुळे आपल्या देशाच्या प्रतिभाशाली उमेदवारांसह काम करण्याची संधी आपल्याला मिळते.
अर्जाची अंतिम तारीख ८ डिसेंबर २०१५ वेबसाइट - डव्ल्यू - www.teachforindia.org