- Marathi News
- Xaviers Extended Test Time For Management Aptitude
ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
MBA : विद्यार्थीभिमुख सुरुवात, CAT नंतर झेव्हियर्सने परीक्षा कालावधीत केली वाढ

कॉमन अॅडमिशन टेस्टचा(कॅट) यावर्षी परीक्षेचा कालावधी 170 मिनिटांवरुन 180 मिनिटे करण्यात आला आहे. दुसरीकडे वेगवेगळ्या मॅनेजमेंट प्रवेश परीक्षांमध्ये बदल होत आहे. या अंतर्गत झेव्हियर्स मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटने नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या आपल्या मॅनेजमेंट एण्ट्रस टेस्टच्या वेळेत 30 मिनिटांनी वाढ केली आहे.
आतापर्यंत प्रवेश परीक्षा 180 मिनिटांच्या म्हणजे तीन तासांचे असायचे. मात्र यावर्षी उमेदवारांना 210 मिनिटांचा वेळ परीक्षेसाठी दिला जाणार आहे. सध्या या वाढलेल्या वेळे संदर्भात पॅटर्नमध्ये कोणत्याही प्रकारच्या बदलांबाबत चर्चा झालेली नाही. उमेदवारांना परीक्षेत 114 बहुपर्याय प्रश्न सोडवायला अतिरिक्त वेळ मिळत आहे. टेस्ट आणखी विद्यार्थी अभिमुख व्हावे यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. टेस्टचे शुल्क मागील वर्षी 1000 रुपये होते. त्यात 500 रुपयांची वाढ केली आहे. या टेस्टसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना 141 मॅनेजमेंट संस्थांमध्ये प्रवेश मिळते. प्रवेश परीक्षा 3 जानेवारी 2016 मध्ये होणार आहे.
पुढे वाचा... निगेटिव्ह मार्किंग नसणार