आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AIIMS Examination 2013 : All India Institute Of Medical Sciences Entrance

एम्स परीक्षा-2013 : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस प्रवेश परीक्षेचे विश्लेषण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1 जूनला झालेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल 1 जुलैला जाहीर करण्यात आला. त्यात 672 जागांसाठी देशभरातून 1.20 लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. जागांपेक्षा चार पट अर्थात 9 हजार 893 विद्यार्थी पात्र ठरले. या परीक्षेतून नवी दिल्ली, भोपाळ, जोधपूर, रायपूर, ऋषीकेश, भुवनेश्वर, पाटणा येथील एम्ससारख्या संस्थेत एमबीबीएससाठी प्रवेश घेऊ शकतील. दिव्य एज्युकेशनने तज्ज्ञांच्या मदतीने या परीक्षेचा अन्वयार्थ, गुणदान पद्धत इत्यादीविषयी चर्चा केली.


जागा वाढल्या, मात्र एम्स दिल्लीला पहिली पसंती
एम्ससारख्या सहा नवीन संस्था तयार झाल्याने जागा वाढल्या आहेत. जास्त जागा असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कठीण स्पर्धेला तोंड देण्याची गरज भासणार नाही, असे मानले जात होते. परंतु स्पर्धात्मक पातळीत फार फरक पडला नाही. कारण एम्स दिल्लीच्या जागा 72 आहेत व हीच विद्यार्थ्यांची पहिली पसंती ठरली. 2012 मध्ये एम्सच्या प्रवेश परीक्षेनंतर पहिल्यांदाच सहा नवीन संस्थाचा निकाल एकाचवेळी जाहीर झाला. यामुळे विद्यार्थी प्रवेशासंबंधी योग्य निर्णय घेऊ शकणार आहेत.


सकारात्मक बदल
दुहेरी भाषा : एम्सने या वेळी विद्यार्थ्यांसाठी हिंदी व इंग्रजी या दोन भाषांतून प्रश्न दिले होते. दर वेळी केवळ हिंदी किंवा इंग्रजीतून प्रश्न असत, परंतु दोन्ही भाषांतून प्रश्न असल्याने विद्यार्थ्यांसाठी ते सोयीचे ठरले.
ब्रॅण्ड संस्था एम्ससारखे कॉलेज : एम्ससारख्या नवीन संस्थांचा तत्काळ तरी काही फायदा होणार नाही. परंतु आगामी पाच वर्षांत सर्व ब्रॅण्ड संस्थांचे रूप एम्स दिल्लीसारखे होईल. भविष्यात जागा रिक्तही राहतील. मात्र, आगामी वर्षांत या संस्थांची मागणी वाढेल.


मुलींची पसंती एम्स यूजी नव्हे, एम्स पीजी
एम्सच्या गुणवत्ता यादीत मुली पिछाडीवर आहेत. तरुणी आजूबाजूच्या महाविद्यालयात एमबीबीएस करून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पोस्टाद्वारे करण्यावर त्यांचा भर असतो, हीच गोष्ट त्यांना पिछाडीवर ठेवण्यास कारणीभूत आहे. मुले मात्र या बाबतीत एम्सला उद्दिष्ट ठरवतात. आजकाल ज्या आजाराचे रुग्ण अधिक असतात, त्याच विषयात सुपर स्पेशलायझेशन करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. हृदयविकार, शस्त्रक्रिया, फॅमिली फिजिशियन, मनोविकार तज्ज्ञ याकडे अधिक कल दिसतो.


समुपदेशनाची प्रक्रिया
10 जुलैला पहिले व 11 जुलैला दुसरी ऑफ लाइन समुपदेशन प्रक्रिया राबवली जाईल. दोन्ही समुपदेशनाच्या सत्रास विद्यार्थ्याला स्वत: हजर राहावे लागणार आहे. पहिल्या फेरीत जागा कमी झाल्यानंतर दुस-या फेरीत खालच्या श्रेणीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार आहे.


दिव्य एज्युकेश तज्ज्ञ पॅनल
वैद्यकीय क्षेत्रात अनेक पर्याय आहेत. आजकाल विद्यार्थी सुरुवातीलाच कोणत्या एका विषयात स्पेशलायझेशन करायचे हे ठरवतात. आतापासूनच असे काही ठरवले जाऊ नये, हेच खरे तर फायद्याचे असेल. बुद्धी खुली राहावी. पदवी झाल्यानंतर चांगला पर्याय निवडता येऊ शकतो.
डॉ. विजय सरदाना, माजी न्यूरॉलॉजी कन्सल्टंट, एम्स, दिल्ली.


कारणे व एनसीईआरटीवर आधारित प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा फायदा होईल. यंदा चार पट विद्यार्थी समुपदेशनात सहभागी होतील, परंतु सहा नवीन एम्समध्ये जागा रिक्त राहू शकतात. कारण विद्यार्थी नीट-स्कोरच्या मदतीने पहिल्यांदा खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा प्रयत्न करतील.

शैलेंद्र माहेश्वरी, अकॅडमिक डायरेक्टर, करिअर पॉइन्ट, कोटा.


ज्ञान
चित्र-विचित्र वैद्यकीय सिद्धांत
वैद्यकीय विश्वात सुरुवातीला काही सिद्धांत असे मांडण्यात आले, ज्यामुळे जगाला बुचकाळ्यात टाकले, परंतु नंतर मात्र त्यातील काही सिद्धांतांची सत्यता पटली..
1. व्हायरसमुळे लठ्ठपणा : लठ्ठपणा केवळ खाण्यामुळेच येतो असे नाही, तर व्हायरसच्या हल्ल्यामुळे देखील येतो, असा सिद्धांत मांडण्यात आला होता. त्याला चीनमध्ये इंफेक्टोबेसिटी नाव देण्यात आले होते. एडी-36 व्हायरस खरोखरच प्राण्यांमध्ये मेद वाढवत असल्याचे नंतर स्पष्ट झाले.
2. दात खराब झाल्यास कर्करोग : दातांना खराब करणारे जंतू हिरड्यांमध्ये तयार होतात. त्यापासून पॅन्क्रियाटिक कर्करोग होतो, असा दावा ब्रिटनच्या डॉक्टरांनी केला आहे.
3.टाइप-3 मधुमेह म्हणजेच स्मृतिभ्रंश : 2005 पासून याविषयी संशोधन केले जात आहे. स्मृतिभ्रंश व इन्सुलीन यांच्यात नेमका कसा संबंध आहे, याचा शोध घेतला जात आहे. टाइप-1 मधुमेहात इन्सुलीन तयार होत नाही. टाइप-2 मध्ये इन्सुलीन गरजेपेक्षा अधिक असते, परंतु अल्झायमर्समध्ये शरीर इन्सुलीन प्रतिकारक बनते. मधुमेह असलेल्यांनाच अल्झायमर्स होऊ शकतो, असे नंतरच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 यावर
किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com