आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AIPMT Results 2015: CBSC Delcares All India Pre Medical Test Results

AIPMT: ऑल इंडिया प्री-मेडिकल टेस्‍टचा निकाल सीबीएससीने केला जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - द सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने(सीबीएससी) आज(सोमवार) ऑल इंडिया प्री-मेडिकल टेस्‍टचा(एआयपीएमटी) वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्‍यासक्रमासाठी घेण्‍यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्‍यांना cbseresults.nic.in/aipmt/aipmt_2015.htm येथे लॉग ऑन करुन आपला रोल नंबर आणि जन्म तारिख टाकून निकाल पाहता येऊ शकतो.
पुनर्परीक्षा 25 जुलै रोजी घेण्‍यात आले होते. 3 मे रोजी झालेली परीक्षा सर्वोच्च न्यायालयाने प्रश्‍न पत्रिका फुटल्याने रद्द केली होती. ती पुन्हा घेण्‍याचे न्यायालयाने सीबीएससीला आदेश दिले होते. परीक्षेसाठी 6 लाख 32 हजार 625 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 4 लाख 22 हजार 859 उमेदवारांनी परीक्षा दिली. देश आणि विदेशातील 50 शहरांत 1 हजार 65 केंद्रांवर परीक्षा घेण्‍यात आली आहे.