आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामणिपाल विद्यापीठाच्या एमबीबीएस, बीटेक आणि बीडीएस कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी विद्यार्थी 27 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. सर्व कोर्सेसमध्ये प्रवेश ऑनलाइन प्रवेश परीक्षेच्या आधारे होईल. प्रवेश परीक्षा 14 एप्रिलपासून 15 मेपर्यंत होईल. एमबीबीएस कोर्स साडेपाच वर्षे, बीडीएस, पाच वर्षे आणि बीटेक चार वर्षे मुदतीचा आहे. एमबीबीएस आणि बीडीएस कोर्समध्ये एका वर्षाच्या इंटर्नशिपचा समावेश आहे.
पात्रता
एमबीबीएस आणि बीडीएस : फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्रजी आणि बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये 50 टक्के गुणांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण असावे.
वयोमर्यादा : अर्जदाराचा जन्म 31 डिसेंबर 1977 नंतर झालेला नसावा.
बीटेक : फिजिक्स, मॅथ्स, इंग्रजी आणि केमिस्ट्री किंवा बायोटेक्नॉलॉजी अथवा बायोलॉजीमध्ये 50 टक्के गुणांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण असावी.
शुल्क
मणिपाल विद्यापीठात एमबीबीएस कोर्सचे वार्षिक शुल्क जवळपास 7 लाख 70 हजार रुपये, बीडीएसचे 4 लाख 60 हजार रुपये आणि बीटेकचे साधारण 2 लाख 50 हजार रुपये आहे. एमजीएम विद्यापीठ नवी मुंबईमध्ये एमबीबीएस कोर्सचे वार्षिक शुल्क जवळपास 8 लाख 50 हजार रुपये आहे. एसआरएम विद्यापीठात बीटेक कोर्सचे वार्षिक शुल्क साधारण 2 लाख रुपये आहे.
निकाल : मे 2014
कॉमेडके यूजीईटी 11 मे रोजी
कन्सोर्टियम ऑफ मेडिकल, इंजिनिअरिंग अँड डेंटल कॉलेजेस ऑफ कर्नाटकच्या (कॉमेडके) अंडरग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी 12 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. 14 मेडिकल, 25 डेंटल आणि जवळपास 150 इंजिनिअरिंग कॉलेज कॉमेडकेचे सदस्य आहेत. या महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस, बीडीएस आणि बीईच्या एकूण जवळपास 20 हजार जागा आहेत. त्यासाठी कॉमेडके यूजी प्रवेश परीक्षा 11 मे रोजी होईल.
पात्रता
एमबीबीएस आणि बीडीएस : फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये 50 टक्के गुणांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण असावी. बारावीत इंग्रजी अनिवार्य विषय असावा.
वयोमर्यादा : 31 डिसेंबर 2014 रोजी 17 वर्षांपेक्षा जास्त.
बीई : फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये 45 टक्के गुणांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण असावी.
शुल्क
कॉमेडकेच्या सदस्य संस्थांतील प्रत्येक कोर्सच्या जागांची संख्या व शुल्क वेगवेगळे आहेत. एम. एस. रमैया मेडिकल कॉलेज, बंगळुरूमध्ये एमबीबीएसचे वार्षिक शुल्क सुमारे 46 हजार आणि बीडीएसचे 35 हजार रुपये आहे. क्राइस्ट युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनिअरिंगचे वार्षिक शुल्क सुमारे दीड लाख रुपये आहे.
निकाल : 4 जून 2014
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.