आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BPMT Syllabus Entrance In Maharashtrian Medical Collages

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रवेश - 2013: महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयात बीपीएमटी अभ्यासक्रमात प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयात बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नोलॉजी अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी येत्या 13-14 ऑगस्टपर्यंत विद्यार्थी अर्ज करु शकतात.यंदा नॅशनल एलिजिबीलीटी कम एन्टरन्स टेस्ट (नीट) परिक्षा दिलेले विद्यार्थीच केवळ या अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात.या सर्व कोर्सेसची कालावधी तीन वर्ष आहे.
स्पर्धा
1097
एकूण जागा
20 हजार
अर्ज (जवळपास)
771 जागा सर्वसाधारण वर्गासाठी, 326 जागा महिलांसाठी
या कोर्सेससाठी प्रवेश मिळेल
लॅबोरेटरी टेक्निशियन, रेडिओग्राफिक टेक्निशियन, रेडिओथेरपी टेक्निशियन, कार्डियोग्राफी टेक्निशियन, न्यूरोलॉजी टेक्निशियन, ब्लड ट्रान्सफ्युजन टेक्निशियन, ऑप्टोमेट्री टेक्निशियन, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, एंडोस्कोपी टेक्निशियन, कम्युनिटी मेडिसिन, फॉरेन्सिक सायन्स आणि परफ्युजनिस्ट
निकाल : 20 ऑगस्ट 2013
निवड प्रक्रिया :
अर्जदारांना त्यांच्या पसंतीच्या केंद्रावर काऊंसिलींगसाठी बोलावण्यात येईल.विद्यार्थ्यांना आपले प्राधान्यक्रम सांगावे लागतील. त्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या प्रोव्हीजनल गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
आरसीबी वायआय अ‍ॅवार्ड-2013
रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीचे तरूण संशोधन पुरस्कारासाठी अर्ज
सरकारच्या जैवतंत्रज्ञान व युनेस्कोचा संयुक्त प्रकल्प असलेले प्रादेशिक जैवतंत्रज्ञान केंद्र, गुडगाव येथील तरूण संशोधन पुरस्कारासाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज केले जाऊ शकतात. निसर्ग विज्ञानाच्या कोणत्याही विषयात पीएच.डी पदवी प्राप्त विद्यार्थी अर्थात ज्यांना जैवतंत्रज्ञानात संशोधन करण्याची इच्छा आहे व ज्यांचे वय 35 वर्षाहून कमी आहे, त्यांना अर्ज करता येईल.
निवड प्रक्रिया : पात्र उमेदवारांची यादी तयार झाल्यानंतर त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. त्यानंतर वेगवेगळ्या विषयातील रिक्त जागा लक्षात घेऊन त्यांची निवड केली जाईल.
तीन वर्षे दर महिन्याला 40 हजार रुपये
आरसीबी यंग इन्व्हेस्टिगेटर अ‍ॅवार्डचा कालावधी तीन वर्षांचा आहे. संशोधन काळात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून महिन्याला 40 हजार रुपये दिली जाईल. त्यानंतर त्याचा कालावधी दोन वर्षांनी वाढवला जाऊ शकतो, परंतु त्यासाठी तज्ज्ञ समितीची शिफारस महत्वाची ठरेल.
बातमी
आयआयटी खडगपूरमध्ये मेडिकलचा अभ्यास
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खडगपूर परदेशी संस्थांच्या मदतीने लवकरच वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी करत आहे. त्यासाठी जॉन हॉपकिन्स विद्यापीठ, बाल्टीमोर व लंडनच्या इम्पिरियल कॉलेजसोबत करार केला जाणार आहे. आयआयटी खडगपूरचा वैद्यकीय अभ्यासक्रम 2016 पर्यंत सुरू होऊ शकतो. त्या अगोदर संस्थेचे कॅम्पसमध्ये 400 खाटांचे रुग्णालय देखील तयार होईल. वैद्यकीय अभ्यासक्रमात अभियांत्रिकीमधील काही विषय समाविष्ट असतील.
ज्ञानोदय एक्सप्रेसमध्ये ब्रिटनचे विद्यार्थी सहभागी
देशाची संस्कृती व परंपरा जाणून घेण्यासाठी दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी दरवर्षी प्रमाणे यंदाही ज्ञानोदय एक्सप्रेस यात्रेवर जाणार आहेत. त्यात विद्यापीठातील 850 विद्यार्थी सहभागी होतील. यंदा यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे संयुक्त राष्ट्राचे 200 विद्यार्थी देखील त्यात सहभागी होणार आहेत. त्यात यंदा मुले-मुली देखील असतील. अर्थात ही यात्रा को-एड ज्ञानोदय एक्सप्रेस सहल असेल. विद्यार्थी या सहलीत अमृतसह, लुधियाना, चंदीगड, कुरूक्षेत्रला जातील व तेथे संस्कृती समजून घेतील.
सीबीएसई विद्यालयांत आता कथा-कथन गट
शालेय विद्यार्थ्यांमध्ये लेखणाविषयी आवड निर्माण व्हावी आणि लेखन शेली सुधारावी या उद्देशाने सीबीएसई कथा क्लबची सुरूवात करणार आहे. त्यात विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारचे साहित्य विषयक सत्रे असतील. त्यात विद्यार्थी कथा-कथनाचे अनेक प्रकारची वर्कशॉपमध्ये सहभागी होऊ शकतील. त्यासाठी विद्यालयांत स्पॉट रायटिंग स्पर्धा होतील. प्रत्येक क्षेत्रात 400 मुले उपान्त्यसाठी निवडले जातील. या विद्यार्थ्यांना डिसेंबरमध्ये होणा-या राष्ट्रीय कथा उत्सव व कथा पुरस्कार समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रादेशिक पातळीवर विद्यार्थ्यांना लेखनासाठी पुरस्कार दिले जातील.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com