आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education : Admission For Medical Fellowship Program And Mangement Research Programe

Divya Education : मेडिकल फेलोशिप प्रोग्रॅम आणि मॅनेजमेंट रिसर्च प्रोग्रॅम्समध्ये प्रवेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेडिकल फेलोशिप प्रोग्रॅम आणि मॅनेजमेंट रिसर्च प्रोग्रॅम्समध्ये प्रवेश, दोन्हीसाठी 50-50 हजार विद्यार्थी अर्ज करणार
नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनिशन्सच्या फेलोशिप एंट्रंन्स परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी मेडिकलच्या अनेक फेलोशिप प्रोग्रॅम्समध्ये प्रवेश घेऊ शकतील. यासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 15 जानेवारी आहे. प्रवेश परीक्षा 2 फेब्रुवारी 2014 रोजी होईल. या फेलोशिप प्रोग्रॅम्समध्ये दरवर्षी 50 हजारांहून जास्त विद्यार्थी अर्ज करतात. हे कोर्सेस दोन वर्षाचे आहेत. आपला विषय चांगल्या पद्धतीने समजावा यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयात संशोधन करण्याची संधी देणे हा या प्रोग्रॅम्सचा मुख्य उद्देश आहे.
पात्रता
पदव्युत्तर पदवी प्राप्त आणि ज्यांचे प्रोव्हिजनल पास सर्टिफिकेट 31 डिसेंबरपूर्वी आले आहेत, असे विद्यार्थी. सर्व उमेदवारांकडे एमबीबीएस शिक्षणाचे परमनंट रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र असावे.
निवड प्रक्रिया
फेलोशिप प्रोग्रॅम्समध्ये गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळेल. या माध्यमातून विद्यार्थ्यांना 17 शाखांमध्ये प्रवेश मिळू शकेल. यामध्ये कार्डिओलॉजी, अनेस्थेशिया, ट्रॉमा केअर, लॅबोरेटरी मेडिसीन, स्पोटर्स मेडिसीन आदींचा समावेश आहे.
निकाल
20 फेब्रुवारी 2014
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या स्टुडंट रिसर्च प्रोग्रॅममध्ये प्रवेश
मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या व्हिजिटिंग स्टुडंट्स रिसर्च प्रोग्रॅममध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी आता अर्ज करू शकतात. हे प्रोग्रॅम 12 मे ते 9 जुलैदरम्यान होईल. रिसर्च प्रोग्रॅम फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्ससाठी असतील. मॅथ्सच्या अर्जासाठी शेवटची तारीख 16 फेब्रुवारी आहे. अन्य विषयांसाठी विद्यार्थ्यांना 21 जानेवारीआधी अर्ज करावा लागेल.
पात्रता
फिजिक्स/ केमिस्ट्री : एमएससी, बीई किंवा बीटेक
बायोलॉजी : एमएससी, बीई किंवा बीटेकचे विद्यार्थी. एम.फार्म, मेडिसीन किंवा इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात.
मॅथ्स : एमए, एमएससी, एमस्टॅट, बीटेकचे विद्यार्थी
कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅँड सिस्टिम सायन्सेस : बीई, बीटेक, एमएससी, एमसीए आणि एमई.
विद्यावेतन
रिसर्च प्रोग्रॅममध्ये विद्यार्थ्यांना टीआयएफआरमध्ये राहणे आवश्यक नाही. मात्र, संशोधनादरम्यान कॅम्पसमध्ये राहण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना येथे संशोधन काळात 7 हजार रुपये दरमहा विद्यावेतन दिले जाईल. याबरोबर घर ते कॅम्पस येण्या-जाण्यासाठी रेल्वे तिकीटही मिळेल.
आयआयटी-जेईईमध्ये कॉमन काउन्सेलिंगवर पुन्हा संशय
आयआयटी आणि एनआयटीमध्ये रिक्त जागा राहू नयेत यासाठी सरकारने त्यांना कॉमन काउन्सेलिंगचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, आयआयटीची भूमिका पाहता याविषयी अद्याप संभ्रम आहे. सरकारने गेल्यावर्षी निर्देश देऊन कॉमन काउन्सेलिंगसाठी सॉफ्टवेअर तयार होते, मात्र आयआयटी अखेरच्या वेळी मागे हटली. कॉमन काउन्सेलिंग झाल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेशासाठी आयआयटी किंवा एनआयटीकडून एकच ऑफर मिळेल आणि रिक्त जागा राहणार नाही. गेल्यावर्षी असे न झाल्याने आयआयटी आणि एनआयटीमध्ये सहाशेहून जास्त जागा रिक्त राहिल्या होत्या.
ज्ञान
जगाला नवीन गोष्टी देणारे संशोधक आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित पैलू
जगात असे काही संशोधक झाले, ज्यांनी आपल्या शोधातून जगाला काहीतरी नवीन देऊन दिशा दिली. परंतु त्यांचे जीवन मात्र खूप वेगळे होते. चला जाणून घेऊया त्यांच्या खासगी जीवनाच्या पैलूबद्दल
1. योशिरो नाकामत्सु, जपान
81 वर्षीय नाकामत्सु यांच्या नावावर 3 हजाराहून अधिक पेटंट आहेत. त्यांनी सीडी, डिव्हीडी, डिजिटल घड्याळ आणि टॅक्सीकॅब मीटरची निर्मिती केली.
विशेष बाब : खाल्लेल्या प्रत्येक पदार्थाबद्दल पूर्ण माहिती ठेवण्याची सवय. उदाहरणार्थ - कॅलरीज, फॅट. त्यांचा उद्देश 144 वर्षे जगण्याचा आहे. दिवसभरात केवळ चार तास झोपतात. सहा तासांहून अधिक वेळ झोपणे खूप वाईट असते. मृत्यूचा अनुभव घेण्यासाठी ते श्वासोच्छ्वास थांबेपर्यंत स्वत:ला बुडवून ठेवतात.
2. विल्यम चेस्टर मायनर, अमेरिका.
ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये प्रत्येक शब्दासाठी एक उदाहरण आणि एक कोटेशन दिले गेले आहे. ही सर्व उदाहरणे आणि कोटेशन मायनर यांनीच दिली आहेत. जेव्हा हा शब्दसंग्रह तयार झाला तेव्हा त्यात केवळ शब्द आणि अर्थ होते. मायनर एक शल्यचिकित्सक होते. त्यांना इंग्रजीबद्दल जिव्हाळा होता. त्यामुळे त्यांनी हे काम केले.
विशेष बाब : मायनर यांनी हे काम वेड्यांच्या रुग्णालयात असताना केले होते. संतापाच्या भरात एका व्यक्तीची हत्या केल्यानंतर त्यांना ही शिक्षा झाली होती. संतापावरील उपचारादरम्यान बहुतेक सर्व वेळ रिकामा असे. म्हणून वेड्यांच्या रुग्णालयात राहूनच सर्व काम पूर्ण केले. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा मात्र होऊ शकली नव्हती.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com