आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education : Admission For The Medical Course

दिव्य एज्युकेशन: मेडिकल कोर्स प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेडिकलच्या पीजी कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी 25 नोव्हेंबरपासून परीक्षा, 50 टक्के कोटा जागांवर प्रवेश
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सची ऑल इंडिया पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एंट्रन्स एक्झामिनेशन(एआयपीजीएमईई) 25 नोव्हेंबरपासून सुरू होत असून ती 6 डिसेंबरपर्यंत चालेल. या माध्यमातून विद्यार्थी देशातील सर्व मेडिकल महाविद्यालयातील एमडी, एमएस आणि डिप्लोमा कोर्सेसच्या 50 टक्के कोटा जागांवर प्रवेश घेऊ शकतील. एमडी/एमएस कोर्स तीन वर्षांचा आहे. डिप्लोमा कोर्स दोन वर्षांचा आहे. जुलै 2013 मध्ये नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट(नीट) रद्द झाल्यानंतर आता देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदवी अभ्यासक्रमात ऑल इंडिया प्री-मेडिकल टेस्ट(एआयपीएमटी) आणि पीजी कोर्सेसमध्ये केवळ एआयपीजीएमईईमधून प्रवेश मिळेल. कोणतेच महाविद्यालय स्वत:ची प्रवेश परीक्षा घेऊ शकणार नाही.
जागा
गेल्यावर्षी 5544 एकूण जागा होत्या. 2014-15 च्या सत्रादरम्यान, जागेत बदल होऊ शकतो. प्रत्येक कॉलेजमध्ये वेगवेगळ्या विषयानुसार जागांची विभागणी होईल.
पात्रता
मेडिकल कौन्सिल ऑफ
इंडियाच्या (एमसीआय) मान्यताप्राप्त मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी. जे विद्यार्थी 31 मार्च 2014 पूर्वी सक्तीची इंटर्नशिप पूर्ण करतील, ते अर्ज करू शकतील.
परीक्षा पद्धती व उत्तीर्ण होण्यासाठी गुण
या वेळी पहिल्यांदाच परीक्षा संगणकावर आधारित असेल. साडेतीन तासांच्या परीक्षेत 300 बहुपर्यायी स्वरूपातील प्रश्न असतील. यादरम्यान कोणताही ब्रेक नसेल. निगेटिव्ह मार्किंग नसेल. उत्तीर्ण होण्यासाठी सामान्य वर्गाच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 50 टक्के आणि एससी-एसटी-ओबीसीसाठी 40 टक्के गुण आवश्यक आहेत.
निकाल : 31 जानेवारी, 2014
हेरिटेज इमारत तंत्राचा
अभ्यास करणार आयआयटी
अनेक वर्षे जुन्या इमारतीला सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार आयआयटीची मदत घेणार आहे. आयआयटी संस्थांना इमारतीमध्ये वापरण्यात आलेल्या तंत्राचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले आहे. या तंत्रांचा आजही वापर करता येऊ शकतो. त्याची शक्यता तपासण्याची जबाबदारीदेखील या संस्थांकडे सोपवण्यात आली आहे. सायन्स अँड हेरिटेज इनिशिएटिव्ह नावाच्या या अभियानासाठी सरकार व आयआयटी यांच्यात एक करार झाला आहे. त्याचे लक्ष्य निर्मितीच्या ऐतिहासिक तंत्राविषयी अधिकाधिक माहिती गोळा करणे, शिक्षण, संशोधन, अभियांत्रिकीमध्ये त्याचा वापर करणे होय.
आंतरराष्ट्रीय युवक संमेलनात शिखा-अभिषेककडे भारताचे प्रतिनिधित्व
सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन, पुण्याची शिखा पाठक आणि आयआयटी, कानपूरचा विद्यार्थी अभिषेक गुप्ता टेलिनॉर इंटरनॅशनल यूथ समिट-2013 येथे भारताचे प्रतिनिधित्व करेल. संमेलन 9 ते 11 डिसेंबरदरम्यान ओस्लो (नॉर्वे) येथील नोबेल पीस सेंटरमध्ये होईल. निवडीसाठी देशात 18 ते 25 वर्षे वयोगटातील तरुणांसाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. माय मोबाइल आयडिया दॅट कॅन ब्रिंग अबाउट पॉझिटिव्ह चेंज या विषयाच्या स्पर्धेसाठी तरुणांनी आपल्या कल्पना पाठवायच्या होत्या. महिलांच्या सुरक्षेसाठी शिखाने एक अ‍ॅप बनवले आहे तर शेतक-यांना त्यांच्या मालास योग्य भाव मिळवून देणारी कल्पना अभिषेकने लढवली. संमेलनात विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. ते सामाजिक-आर्थिक समस्यांवर विचारविनिमय करतील.
Medical Jargons
मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये डॉक्टर अनेकवेळा आपल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये जार्गन्स अर्थात लघुरूपाचा वापर करतात. जाणून घ्या त्याचा अर्थ काय होतो...
Rx : हा लॅटिन शब्द रेसिपीपासून घेण्यात आला आहे. त्याला प्रिस्क्रिप्शन म्हटले जाते. हे आर आणि एक्स नाही, एक प्रतीक आहे.
c/o : सामान्यपणे याला केअर ऑफ अर्थात कोणाच्या तरी संरक्षणात असणे असे म्हटले जाते. कोणाला पत्र पाठवताना याचा वापर केला जातो. मात्र वैद्यकीय संज्ञेमध्ये रुग्णाला असलेल्या समस्यांशी संबंधित वापरले जाणारे हे प्रतीक आहे.
cbc : अर्थात रक्तामध्ये असलेल्या सर्व तत्त्वांची गणती. (कम्प्लिट ब्लड काउंट ) पांढ-या पेशी व हिमोग्लोबिनची पातळीदेखील मोजली जाते.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com