आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divya Education: करिअर इन बायोटेक इंडस्ट्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेगाने विकसित होणा-या क्षेत्रात नोकरीसाठी ज्ञान आणि संशोधनातील रुची गरजेची
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बायोटेक्नॉलॉजी नवीन आहे. परंतु भारताशिवाय संपूर्ण जगात त्याचा वेगाने विस्तार होऊ लागलाय. वातावरण बदलापासून ते ऊर्जा संकट, आरोग्य समस्या, अन्न सुरक्षा क्षेत्रातील समस्यांची उकल यातून करता येऊ शकते. भारतात जैवतंत्रज्ञान उद्योगाचे एकूण मूल्य 265 लाख कोटी रुपयाहून अधिक आहे. गेल्या दहा वर्षांत त्याचा वार्षिक वाढीचा दर 20 टक्क्यांहून अधिक आहे. हा केवळ बायोलॉजी किंवा तंत्रज्ञानापर्यंत मर्यादित नाही. भौतिक, रसायन, जेनेटिक्स, गणित आणि अभियांत्रिकीदेखील जैवतंत्रज्ञानाचा अविभाज्य भाग आहे. ही ज्ञानाधारित अभ्यास शाखा आहे. त्यात चांगल्या नोक-यांची अधिक संधी आहे. परंतु संस्थांमध्ये जागा कमी असल्याने स्पर्धा खूप अधिक आहे. चला जाणून घेऊया जैवतंत्रज्ञान उद्योग आणि त्यात करिअर करणा-यांविषयी....
40 हजार प्रोफेशनल्स दरवर्षी तयार
भारतातील जैवतंत्रज्ञान पाच विभागात दिसून येते. बायोफार्मास्युटिकल्स, बायो सर्व्हिस, बायो अ‍ॅग्रिकल्चर, बायो इंडस्ट्रियल आणि बायो इन्फॉर्मेटिक्स. त्यात 60 टक्क्यांहून अधिक जागेची भागीदारी एकट्या बायोफार्मास्युटिकल्सची आहे. कृषी क्षेत्रात त्याचा वापर, टॅलेंट पूल आणि चांगले संशोधन करणा-या संस्था यांचे अस्तित्व देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणा-या शाखेत दिसून येते. दरवर्षी किमान 40 हजार बायोटेक प्रोफेशनल्स देशांत तयार होतात. परंतु ही संख्या आपल्या गरजेपेक्षा खूपच कमी आहे.
करिअर पर्यायात संशोधनावर भर
बायोटेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमात काम करणा-या विद्यार्थ्यांसाठी मार्केटिंग, फील्ड वर्क, शिक्षण क्षेत्रातील करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. परंतु सर्वाधिक संधी संशोधन उपक्रमासाठी आहेत. देशांत तीनशेहून अधिक प्रयोगशाळा आणि विद्यापीठे आहेत. यातून संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देतात.
प्रशिक्षणार्थी
बीएस्सी किंवा एमएस्सी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून उद्योगात प्रवेश मिळू शकतो.
सुरुवातीचे पॅकेज : 2-3 लाख वार्षिक
फील्ड जॉब
बीएस्सी/ एमएस्सी झालेले विद्यार्थी खासगी संस्थांसाठी काम करू शकतात.
सुरुवातीचे पॅकेज : 2-3 लाख वार्षिक.
अध्यापन
बायोटेक/अप्लाइड लाइफ सायन्समध्ये मास्टर डिग्री करणारे विद्यार्थी अध्यापन क्षेत्रात जाऊ शकतात.
सुरुवातीचे पॅकेज :4-5 लाख वार्षिक.
मॅनेजमेंट
बायोटेक किंवा कृषी व्यवसायात एमबीए झालेल्या विद्यार्थ्यांना विक्री किंवा मार्केटिंगचे काम करता येऊ शकते.
सुरुवातीचे पॅकेज : 3-5 लाख
संशोधक
त्यासाठी पदव्युत्तर पदवी गरजेची असते. परंतु पीएचडी झालेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. पीएच.डी आर अँड डी संस्थेसोबत केलेली असेल तर अधिक योग्य मानली जाते.
सुरुवातीचे पॅकेज : 3-4 लाख वार्षिक
जागा कमी असल्यामुळे चांगल्या संस्थेमध्ये प्रवेश मिळणे पहिले आव्हान
बेसिक सायन्स आणि टेक्नॉलॉजी कोर्सेसच्या तुलनेत बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट्सची संख्या खूप कमी आहे. ज्या संस्थांमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा कोर्स आहे, तिथे जागा खूप कमी आहेत. 2013 मध्ये आयआयटी-रुरकीमध्ये बीटेकमध्ये (बायोटेक) 45 जागा होत्या, केमिकल इंजिनिअरिंगमध्ये 100 पेक्षा जास्त आहेत. नोक-यांमध्ये अशीच स्थिती आहे. फायनान्स किंवा टेक्नॉलॉजीसारख्या पारंपरिक फील्ड्सच्या तुलनेत या क्षेत्रात कंपन्यांची संख्या कमी आहे. प्रत्येक पदासाठी 300-500 उमेदवार अर्ज करतात. मात्र, जास्तीत जास्त उमेदवार उद्योगांच्या गरजांसाठी पात्र ठरत नाहीत.
वेगवेगळ्या स्तरावर प्रवेशाच्या संधी अस्तित्वात
बायोटेक्नॉलॉजीमध्ये करिअर करण्यासाठी पदव्युत्तर पदवी बंधनकारक मानली जाते. यात प्रवेशाची संधी प्रत्येक टप्प्यावर असते. विज्ञान शाखेमध्ये 10+2 करणारे विद्यार्थी बायोटेक्नॉलॉजीमध्ये बीएसस्सी, बीई किंवा बीटेक कोर्स करू शकतात. अव्वल इन्स्टिट्यूट्स यासाठी आपल्या प्रवेश परीक्षा घेतात किंवा जेईईद्वारे प्रवेश देतात. पदव्युत्तर पदवी कोर्समध्ये प्रवेशासाठी बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये पदवी असणे बंधनकारक आहे.
देशात बायोटेक्नॉलॉजीच्या मुख्य संस्था
बायोटेक्नॉलॉजीचा बीटेक/ बीई कोर्स आयआयटी-रुरकी, एनआयटी-दुर्गापूर, पंजाब युनिव्हर्सिटी आणि उस्मानिया विद्यापीठात आहे. आयआयटीमध्ये बीटेक कोर्सचे प्रतिसेमिस्टर शुल्क 90 हजार रुपये आहेत. आयआयटी, दिल्लीमध्ये बायोकेमिकल इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजीमध्ये दोन पदवींचा (बीटेक आणि एमटेक) कोर्स आहे. बीएससी कोर्स राजस्थान युनिव्हर्सिटी-जयपूर, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भारती विद्यापीठ-पुणे आणि एमिटी युनिव्हर्सिटीतून करता येईल. पंजाब विद्यापीठात एमबीएचे (बायोटेक्नॉलॉजी) शुल्क जवळपास 2 लाख रुपये आहे.
फॅक्ट्स अँड फिगर्स
भारतातील बायोटेक उद्योग
265 लाख कोटी रुपये एकूण क्षमता भारताच्या बायोटेक उद्योगाची आहे.
440 लाख कोटी रुपये बायोटेक उद्योग 2020 पर्यंत होईल.
2 टक्के भागीदारी जगातील बायोटेक उद्योगात आपली आहे.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com