आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi: Indian Institute Of Science UG Syllabus

Divya Education: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या यूजी अभ्‍यासक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या यूजी कोर्समध्ये प्रवेश, जवळपास एक लाख विद्यार्थी अर्ज करतील
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरूच्या बॅचलर ऑफ सायन्स कोर्समध्ये प्रवेशाची प्रक्रिया 3 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. विद्यार्थी 30 एप्रिलपर्यंत त्यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना राष्‍ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांच्या स्कोअरच्या आधारे निवडले जाईल. या माध्यमातून त्यांना बायोलॉजी, केमिस्ट्री, मटेरियल्स सायन्स, मॅथ्स, फिजिक्स आणि एनव्हायर्नमेंटल सायन्सच्या अंडरग्रॅज्युएट कोर्समध्ये प्रवेश मिळेल. कोर्सची मुदत चार वर्षे आहे. यामध्ये 120 जागा आहेत, त्यासाठी दरवर्षी जवळपास 1 लाख विद्यार्थी अर्ज करतात.
पात्रता
60 टक्के गुणांसोबत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्ससह बारावी उत्तीर्ण असावे. एससी/एसटीच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ उत्तीर्ण गुण आवश्यक. या वर्षी बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया
विद्यार्थ्यांना बाल शास्त्रज्ञ प्रोत्साहन योजना (केव्हीपीवाय), आयआयटी-जेईई (मेन आणि अ‍ॅडव्हान्स) तसेच नीट (आता एआयपीएमटी) स्कोअरच्या आधारावर प्रवेश दिला जाईल. ज्यांना केव्हीपीवायची फेलोशिप मिळाली आहे, त्यांना विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळेल किंवा आयआयटी-जेईई अथवा नीटमध्ये कमीत कमी 60 टक्के स्कोअर प्राप्त केला असावा.
फीस
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये बॅचलर ऑफ सायन्स कोर्सची वार्षिक ट्यूशन फीस 10 हजार रुपये आहे. यामध्ये निवास व खाण्याच्या खर्चाचा समावेश नाही. याव्यतिरिक्त प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना जवळपास 8 हजार रुपये वेगळे द्यावे लागतील. वनस्थळी विद्यापीठात बीएसस्सी कोर्सची वार्षिक फीस 59 हजार रुपये आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये जवळपास 2 हजार 500 रुपये आहे.
वैकुंठ मेहता मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या पीजी डिप्लोमा कोर्समध्ये प्रवेश
पुण्याच्या वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंटच्या (वामनीकॉम) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अ‍ॅग्री-बिझनेस मॅनेजमेंट कोर्समध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी 15 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात.
पात्रता
50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी. एसएसी/एसटी विद्यार्थ्यांसाठी 45 टक्के गुण आवश्यक.
निवड प्रक्रिया
विद्यार्थ्यांना कॅट, मॅट, जॅट, सीमॅट किंवा एटीएमएच्या व्हॅलिड स्कोअरच्या आधारावर लेखी पात्रता परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी निवडले जाईल. सर्व घटकांच्या एकत्र गुणांवर गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
शुल्क
वामनीकॉममध्ये पीजी डिप्लोमा कोर्सचे वार्षिक शुल्क 1 लाख 50 हजार रुपये आहे. यामध्ये निवास आणि भोजनाच्या खर्च समाविष्ट नाही. बनारस हिंदू विद्यापीठामध्ये एमबीए कोर्सचे वार्षिक शुल्क जवळपास 50 हजार रुपये आहे.
कॅटचा ओढा कमी झाला, या वर्षी आयआयएम संस्थांची फीस वाढणार नाही
सामायिक प्रवेश परीक्षेकडे (कॅट) विद्यार्थ्यांचा कल कमी झाल्यामुळे देशातील आयआयएम संस्था या वर्षी फीस न वाढवण्याची योजना आखत आहेत. आयआयएम, बंगळुरूने यासंदर्भात घोषणा केली. आयआयएम लखनऊने 2013 मध्ये आपल्या मॅनेजमेंट प्रोग्रॅमचे शुल्क 12 लाखांवरून कमी करून 10 लाख 80 हजार रुपये केली होती. या वर्षी त्यात बदल होण्याची शक्यता नाही. या वर्षी फीसमध्ये वाढ होण्याची शक्यता नाही, असे आयआयएम इंदूरच्या अधिका-यांचे म्हणणे आहे. आयआयएम अहमदाबादनेही सध्या याबाबत अंतिम निर्णय घेतला नाही. मात्र, संस्था या वर्षीच्या शुल्क रचनेत बदल करेल. शुल्कवाढ झाली तरी ती नाममात्र असेल. कोलकाता, कोझिकोड आणि उर्वरित आयआयएम संस्थांनी यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. बहुतांश संस्थांनी 2013 मध्ये आपल्या एमबीए प्रोग्रॅम्सची फीस वाढवली होती, त्यामुळे ते या वर्षी वाढ करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. विशेष म्हणजे, 2013 मध्ये कॅटसाठी एकूण 1 लाख 94 हजार 514 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या सात वर्षांमध्ये ही सर्वात कमी संख्या होती. 2013 मध्ये जवळपास 2 लाख 14 हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
बदलत्या अभ्यासक्रम मॉडेलच्या तयारीत टीसीएस
सॉफ्टवेअर क्षेत्रातील मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात बदल
करण्यासाठी मॉडेल तयार करत आहे. कंपनीच्या मॉडेलमध्ये कॉर्पोरेट क्षेत्राच्या गरजांना विशेष स्थान दिले जाईल. या संस्थांमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये त्याचा उपयोग होईल, हा त्याचा मुख्य फायदा असेल. कंपनी गेल्या दीड वर्षापासून यावर काम करत आहे.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com