आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divya Education: करिअर इन फॉरेन्सिक सायन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वापर वाढत आहे, नोकरीसाठी स्पेशलायझेशन आवश्यक
फॉरेन्सिक सायन्स म्हणजे गुन्हेगारी प्रकरणाची उकल होण्यासाठी उपयोगात येणारे शास्त्र. गुन्हेगाराच्या शोधासाठी यामध्ये विज्ञानाची प्रत्येक शाखा भौतिक, रसायन, जीवशास्त्र आणि औषधशास्त्राचा उपयोग होतो. चोरीच्या छोट्याशा घटनेपासून पालकत्वाच्या वादाच्या प्रकरणात न्यायवैद्यक शास्त्राचा (फॉरेन्सिक सायन्स) उपयोग होऊ शकतो. गुन्ह्याव्यतिरिक्त अ‍ॅस्ट्रॉनॉमी, आर्कियॉलॉजी, बायोलॉजी आणि जियोलॉजीमध्येही त्याचा वापर वाढत आहे. त्यामुळे जगभरात करिअरचा चांगला पर्याय म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. या करिअरची माहिती जाणून घेऊ....


आवश्यकता दहा हजारांची, केवळ तीन हजार व्यावसायिक संपूर्ण देशभरात
भारतात फॉरेन्सिक सायन्सच्या प्रशिक्षित व्यावसायिकांची संख्या खूप कमी आहे. नवी दिल्लीच्या इन्स्टिट्यूट आॅफ क्रिमिनॉलॉजी अ‍ॅँड फॉरेन्सिक सायन्स संस्थेनुसार, दरवर्षी जवळपास 500 फॉरेन्सिक सायन्स व्यावसायिक बाहेर पडतात. देशात साधारण तीन हजार व्यावसायिक आहेत. मात्र, यामध्ये कमीत कमी 10 हजारांची आवश्यकता आहे.


पदवी असेल तर वार्षिक 5-6 लाख रुपये पॅकेज मिळते
फॉरेन्सिक सायन्सचा कोर्स करणारे विद्यार्थी क्राइम सीन इन्व्हेस्टिगेटर, पॅथॉलॉजिस्ट, ट्रेस इव्हिडन्स अ‍ॅनालिस्ट आणि फॉरेन्सिक स्पेशलायझेशन तज्ज्ञाच्या रूपात काम करू शकतील. यामध्ये बहुतांश पदांसाठी फॉरेन्सिक सायन्सच्या पदवीसोबत वेगवेगळे स्पेशलायझेशन आवश्यक असते. सरकारी विभागांमध्ये फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्ट, अ‍ॅँथ्रोपोलॉजिस्ट, सेरोलॉजी तज्ज्ञ आणि लिंग्विस्ट्ससारख्या पदांचे सुरुवातीचे पॅकेज 5-6 लाख रुपये वार्षिक असते.


सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी संधी, मेडिकलला सवलत
फॉरेन्सिक सायन्सच्या कोर्समध्ये एक मोठा भाग मेडिकल सायन्स आणि अ‍ॅनालिसिसचा असतो. त्यासाठी मेडिकलच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करणे सोपे आहे. असे असले तरी कला किंवा विज्ञानाच्या कोणत्या शाखेतील पदवी प्राप्त विद्यार्थी फॉरेन्सिक सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेऊ शकतात. कायद्याचे पदवीधारक डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स करून रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग, पोलिसांची क्राइम ब्रँच आणि गुप्तचर संस्थांसाठी काम करू शकतील.


नोकरीच्या जास्त संधी सरकारी विभागांमध्ये, प्रत्येक पदासाठी कमीत कमी 50 अर्जदार
जागा कमी असल्यामुळे फॉरेन्सिक सायन्सच्या कोर्सेसमध्ये प्रवेश मिळणे अवघड असते. इन्स्टिट्यूट आॅफ क्रिमिनॉलॉजी अ‍ॅँड फॉरेन्सिक सायन्समध्ये यासाठी 30 जागा आहेत. त्यासाठी जवळपास 500 विद्यार्थी अर्ज करतात. नोकरीच्या बहुतांश संधी सरकारी विभागांमध्ये आहेत. खासगी क्षेत्रामध्ये गुप्तचर संस्था, गैरसरकारी संस्था आणि पुनर्वसन केंद्रात फॉरेन्सिक सायन्स व्यावसायिकांची नियुक्ती केली जाते. पोलिस आणि गुप्तचर विभागांमध्ये न्यायवैद्यकीय शास्त्रज्ञाच्या प्रत्येक पदासाठी कमीत कमी 50 अर्जदार असतात.


देशात फॉरेन्सिक सायन्सच्या प्रमुख इन्स्टिट्यूट्स
देशातील अनेक संस्थांत फॉरेन्सिक सायन्सचा पोस्ट ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा कोर्स अस्तित्वात आहे. दिल्ली विद्यापीठाच्या पीजी डिप्लोमा इन फॉरेन्सिक सायन्स कोर्सची एकूण फीस 21 हजार 865 रुपये आहे. इन्स्टिट्यूट आॅफ क्रिमिनॉलॉजी अ‍ॅँड फॉरेन्सिक सायन्स, दिल्लीमध्ये एमएस्सी (फॉरेन्सिक सायन्स) कोर्सची वार्षिक फीस जवळपास 28 हजार रुपये आहे. याव्यतिरिक्त सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज, हरिसिंग गौर युनिव्हर्सिटी, सागर आणि अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीमध्येही फॉरेन्सिक सायन्स कोर्स आहे.


नवीन प्लेसमेंट सीझनमध्ये नियुक्त्यांची तयारीमध्ये कंपन्या
नोकरभरतीचा कालावधी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. त्यासाठी कंपन्या बी-स्कूलमधून भरतीच्या तयारीला लागल्या आहेत. त्यात आयआयएम आणि टॉप मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कॉग्निजेंट, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक्नॉलॉजीज, सिटी बँक, केपीएमजीसारख्या कंपन्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 ते 100 टक्के अधिक फ्रेशर्सना नियुक्त करण्याची योजना करत आहेत. केपीएमजीकडून 2013 मध्ये 100 मॅनेजमेंट ग्रॅज्युएट्सला हायर करण्यात आले होते. कंपनीने या वर्षी 200 नियुक्त्या करण्याचा निर्णय घेतला. सिटी बँकेने गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 टक्के अधिक नोकºया देण्याचा निर्णय घेतला आहे. कॉग्निजेंटने गेल्या वर्षी 300 एमबीए पदवीधरांना नोकरीची संधी दिली होती. त्यात 75 आयआयएमचे होते. कंपनीने 2014 मध्ये त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.


आयआयटी, चेन्नईमध्ये होणार कॅन्सर पेशी जैव बँक
केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने सार्वजनिक पातळीवरील कर्करोग पेशीसंबंधी जैव बँक आयआयटी, चेन्नईमध्ये तयार करण्यात येणार आहे. त्याच्या मदतीने कर्करोगाचे निदान, उपचाराच्या पद्धती आणि परिणामांना अधिक चांगल्या पद्धतीने जाणून घेण्यास मदत होईल. सोबतच पर्सनलाइज्ड उपचार आणि प्रतिबंधात्मक पद्धतींना शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बायो बँकमध्ये रुग्णालय, रुग्ण आणि इतर संस्थांमध्ये साठवण्यात आलेल्या कर्करोग पेशी जमा करण्यात आल्या आहेत.


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com