आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • DNB CET 2013 : Medical Diploma PG Course Entrance

डीएनबी-सीईटी 2013 : मेडिकलमध्ये डिप्लोमा पीजी कोर्समध्ये प्रवेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीच्या नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सच्या (एनबीई) डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड- सेंट्रलाइझ्ड एंट्रन्स टेस्टसाठी (डीएनबी-सीईटी) अर्ज मागवले जात आहेत. या माध्यमातून डीएनबी मंडळाच्या स्पेशल व पोस्ट एमबीबीएस सुपरस्पेशालिटी कोर्सेसमध्ये प्रवेश घेता येईल. विद्यार्थी 300 हून जास्त हॉस्पिटलच्या स्पेशालिटी शाखांमध्ये प्रशिक्षण घेऊ शकतील. 4 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख असून 19-26 ऑगस्टपर्यंत परीक्षा होईल.


जागा
25 कोर्स / 305 हॉस्पिटल


पात्रता
एमबीबीएस पदवी प्राप्त किंवा ज्यांच्याकडे तात्पुरते उत्तीर्ण प्रमाणपत्र (प्रोव्हिजनल पास सर्टिफिकेट)विद्यार्थ्यांचे 31 जुलैपूर्वी एक वर्षांचे इंटर्नशिप पूर्ण झाले असावे. अन्य संस्थांत डीएनबी कोर्स सुरू असलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकत नाहीत. आधीचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर या कोर्ससाठी प्रवेश परीक्षा देता येईल.
निकाल : सप्टेंबर 2013
परीक्षा पद्धती
संगणकावर आधारित तीन तासांची परीक्षा असेल. यात बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. इंग्रजी माध्यमातील या परीक्षेत निर्गेटिव्ह मार्केटिंग नाही. परीक्षेत अ‍ॅनॉटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, फार्मेकोलॉजीसह अनेक विषयांचे प्रश्न असतील. संगणकावर परीक्षा असली तरी विद्यार्थी एका प्रश्नावरून दुस-या प्रश्नावर तसेच पुढील प्रश्नावरून आधीचा प्रश्नावर जाऊ शकतो. मात्र, ही इंटरनेट आधारित ऑनलाइन परीक्षा असणार नाही. परीक्षेआधी 15 मिनिटे ट्यूटर टेस्ट दिली जाईल. यातून विद्यार्थ्यांना परीक्षा पद्धती समजेल. उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के, तर एससी-एसटी/ओबीसी वर्गासाठी 40 टक्के गुण आवश्यक असतील.


समान गुण निकष
दोन विद्यार्थ्यांना समान गुण प्राप्त झाल्यास एमबीबीएसमध्ये जास्त गुण घेणा-या विद्यार्थ्याला प्राधान्य दिले जाईल. ज्या विद्यार्थ्याने एका प्रयत्नात एमबीबीएस कोर्स पूर्ण केला असेल त्याला जागा दिली जाईल.


ज्ञान
नवे वैद्यकीय संशोधन
फेक्टोसेकंड कॅटरेक्ट सर्जरी
मोतीबिंदूचा (कॅटरेक्ट) इलाज आतापर्यंत ब्लेड सर्जरीद्वारे केला जातो. यातील 95 टक्के प्रकरणात डोळ्याची दृष्टी सुधारते. मात्र, आता फेक्टोसेकंड लेसिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चिरफाडशिवाय मोतीबिंदूचा इलाज केला जातो. ही शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण आणखी जास्त आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.


न्यूरोमॉड्युलेशन थेरपीद्वारे मायग्रेन ट्रीटमेंट :
अमेरिकी शास्त्रज्ञाने दाताच्या मागे प्रत्यारोपण करू शकणारे नवे यंत्र शोधले आहे. विशेष रुग्ण स्वत: या यंत्रावर नियंत्रण ठेवू शकतो. मायग्रेनशी (अर्धशिशी) संबंधित नस या यंत्राशी जोडलेली असते. डोकेदुखी सुरू झाल्यानंतर गालात लावलेल्या यंत्राचे रिमोट कंट्रोल दाबू शकतील. यामुळे मायग्रेनच्या नसवर दबाव येतो व मायग्रेन नियंत्रणात येतो. स्रोत : क्वीलँड क्लिनिक


रंजक
पाण्याच्या सतत संपर्कामुळे
त्वचेला सुरकुत्या
हाताच्या त्वचेवर तेलकटपणा कायम असतो. सबेशिय ग्रंथीमुळे आपले केस व त्वचा कोरडी होण्यापासून वाचते. या ग्रंथीमुळे त्वचेला तेलकटपणा येतो. मात्र, आपला दीर्घकाळापर्यंत पाण्याशी संबंध आल्यास तेलकट त्वचा नाहीशी होऊन ती कोरडी पडते. यामुळे बोटाच्या त्वचेवर सूज येते. त्वचेचा वरील थर पाणी शोषून घेतो. मात्र, खालची त्वचा ओलसर राहते. यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडण्यास सुरुवात होते.


इंटरेस्टिंग कोट
"Be careful about reading health books. You may die of a misprint."― Mark Twain
हेल्थ बुक वाचताना थोडे सावध असले पाहिजे. चुकीच्या छपाईमुळे तुमचे प्राणही जाऊ शकतात.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 यावर
किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com