आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायपर जेईई - 2013

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चच्या (नायपर) पदव्युत्तर पदवी कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी 7 जुलै रोजी प्रवेश परीक्षा होईल. या माध्यमातून विद्यार्थी मास्टर ऑफ फार्मसी, एमएस (फार्मसी), एमटेक (फार्मसी) आणि एमबीए (फार्मसी)मध्ये प्रवेश घेऊ शकतात.

स्पर्धा
483 जागा (एमएस)
5 हजार अर्जदार
5 कोर्स मुदत 2 वर्षे

निकाल : 12 जुलै, 2013

पात्रता
एमएस फार्मसी : वेगवेगळ्या शाखेसाठी पात्रतेचे निकष वेगवेगळे आहेत. यामध्ये एमएस फार्मास्युटिकलसाठी बी. फार्म पदवी आवश्यक आहे. एमएस रेग्युलेटरी टेक्नॉलॉजीसाठी बी. फार्म / एमबीबीएस/बीव्हीएससी आदी पदवी प्राप्त विद्यार्थी पात्र आहेत.

एमबीए फार्मसी : बी. फार्म, बी.टेक. (केमिकल इंजिनिअरिंग) किंवा एम.एस्सी (केमिकल/लाइफ सायन्सेस) ची पदवी आवश्यक.

पदवी पात्रतेमध्ये किमान 60 टक्के गुण किंवा 10 पॉइंट स्केलवर 6.75 सीजीपीए आवश्यक आहे. आरक्षित वर्गातील विद्यार्थ्यांसाठी नियमानुसार सूट देण्याची तरतूद आहे. याशिवाय व्हॅलिड जीपॅट, गेट किंवा गेट स्कोअर असणे आवश्यक आहे.

परीक्षा पद्धती
सर्व अभ्यासक्रमासाठी एकच परीक्षा होईल. दोन तासांच्या पेपरमध्ये 200 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. बी. फार्म व एम. फार्म स्तरावरील प्रश्न असतील. काही प्रश्न जनरल अँप्टिट्यूडचेही असतील. परीक्षा निगेटिव्ह मार्किंगनुसार होईल. चुकीच्या उत्तरासाठी पाव गुण कापला जाईल.

शुल्क
चारही कोर्सेससाठी शुल्क सारखेच आहे. सामान्य वर्गांतील विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी साधारण 15 हजार रुपये द्यावे लागतील. याव्यतिरिक्त प्रत्येक सेमिस्टरचे शुल्क जवळपास 20 हजार रुपये असेल. दुसरीकडे बिट्स पिलानीमध्ये फार्मसीच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रती सेमिस्टर 80 हजार शुल्क आहे.

वेगवेगळ्या केंद्रावर वेगवेगळे कोर्स

नायपरचे मुख्यालय मोहाली, चंदिगड येथे आहे. याशिवाय अहमदाबाद, हाजीपूर, हैदराबाद, कोलकाता, गुवाहाटी आणि रायबरेलीमध्ये त्याची केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रावर वेगवेगळे कोर्स शिकवले जातात. एमएस (फार्मसी) कोर्स वेगवेगळ्या शाखांसाठी उदाहरणार्थ क्लिनिकल रिसर्च, मेडिसिनल केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी आदी उपलब्ध आहेत. एमबीए फार्मसी, एमटेक, फार्मसी आणि एम. फार्मा कोर्स मोहाली आणि हैदराबादमध्ये उपलब्ध आहेत. प्रवेश परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या कौन्सिलिंगनंतर प्रवेश दिला जाईल. सर्व केंद्रांसाठी विद्यार्थ्यांचे कौन्सिलिंग मोहालीमध्ये होते.

ज्ञान
फार्मास्युटिकल सायन्सेसची पहिली राष्ट्रीय संस्था नायपर

मोहाली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँँड रिसर्च या क्षेत्रात देशातील राष्ट्रीय स्तरावरील पहिली संस्था आहे. याची सुरुवात फार्मास्युटिकल मॅनेजमेंट, शिक्षण व संशोधन केंद्राच्या रूपात झाली होती. केंद्र सरकारने 1998 मध्ये त्यास इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा दिला. संपूर्ण देशात याची सात केंद्रे आहेत. भारताचे राष्ट्रपती या संस्थेचे निमंत्रक असतात. डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकलने बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत 12 हजार 280 कोटी रुपये निधीतून देशभर दहा नवी केंद्रे उघडण्याचा प्रस्ताव आहे. देशाची गरज लक्षात घेऊन नायपरने संशोधनासाठी पाच प्रमुख विषय केंद्रस्थानी ठेवले आहेत. यामध्ये टीबी, मलेरिया, डायबिटिस, इम्युनोमॉड्युलेशन आणि लेश्मोनिएसिस यांचा समावेश आहे.

रंजक
मृत्यूनंतर 75 वर्षांनंतरही शरीर सुरक्षित

दाशी दोरजोव एतिलोव 1911 ते 1917 पर्यंत देशाचे सर्वात वरिष्ठ बौद्ध लामा होते. 1927 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूवेळी ते पद्मासन अवस्थेत योग करत होते. त्यांच्या इच्छेनुसार पार्थिव शरीर सुरक्षित ठेवण्यात आले होते. दाशींच्या मृत्युपत्रानुसार मृत्यूनंतर 75 वर्षांनी शरीर बाहेर काढले तेव्हा त्यांचे शरीर सुरक्षित तर होतेच, शिवाय जीवनाची काही लक्षणेही त्यात दिसून आली. शरीराची हाडे व मांसपेशी, सांधे आणि त्वचेवर कुठलाही परिणाम झाला नव्हता.

नॅशनल आयडिएशन न्यूजरूम