हरियाणाच्या विपुलने ऑल इंडिया प्री-मेडिकल टेस्टमध्ये(एआयपीएमटी) देशात पहिला तर दुस-या क्रमांक राजस्थानची खुशी तिवारीने पटकावला आहे. मध्य प्रदेशचा वरद पुणतांबेकर याने देशात तिसरा क्रमांक मिळवला आहे. विपुल हरियाणाच्या जींदचा रहिवाशी आहे. त्याने 12 वीत 90 टक्के गुण मिळवले होते. आपल्या यशाबाबत विपुल म्हणाला, परीक्षा चांगली गेल्याने मी खूश होतो. परंतु पहिल्या क्रमांकाचा विचार कधीच केला नव्हता. मी आता मौलाना आझाद कॉलेज, नवी दिल्ली येथे प्रवेश घेऊ शकतो, असे त्याने सांगितले. ते एक माझे स्वप्न होते. मी आणि माझ्या कुटूंबासाठी ते पूर्ण झाले.
मुलींमध्ये पहिली आणि देशात दुसरी आलेली खुशी तिवारीने 12 वीत 86.3 टक्के गुण मिळवले होते. मात्र तिने अगोदरच एम्स जोधपूरमध्ये प्रवेश घेतला आहे. आता ती मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे. अॅन्सर की मिळाल्यानंतर तिला अपेक्षा होत, की ती टॉपरमध्ये राहिल. एआयपीएमटीमध्ये भोपाळचा वरद पुणतांबेकरने संपूर्ण देशात तिसरा क्रमांक मिळवला आहे. वरद सध्या एम्स दिल्लीत एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. त्याचा एम्समध्ये ऑल इंडिया रँक 15 व्या क्रमांकावर होता. माझे लक्ष्य एम्स एंट्रन्स क्रॅक करणे हा आहे. यासाठी मी गेल्या 21 वर्षांतील प्रश्नपत्रिका सोडवल्या. तसेच इतर परीक्षांचे एंट्रन्सचे प्रश्नपत्रिका सोडवल्या होत्या, असे वरद सांगतो. त्याचे वडील अजय पुणतांबेकर व्यावसायिक आणि आई क्षमा स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर येथे सहायक प्राध्यापक आहे.