आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएचबीएएस - 2013 : एमफिल कोर्समध्ये प्रवेशासाठी परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेविअर अँड अलाइड सायन्सेसच्या (आयएचबीएएस) क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये एमफिल कोर्समध्ये प्रवेशासाठी 1 सप्टेंबर रोजी परीक्षा होईल. दिल्ली विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ मेडिकल सायन्सेसअंतर्गत या कोर्ससाठी विद्यार्थी 31 जुलैपर्यंत अर्ज करू शकतील.


जागा व मुदत
19 जागा
10 जागा जनरल, 1-1 एससी-एसटी
3 ओबीसी आणि 2-2 जागा एनआरआय


कोर्स मुदत : 2 वर्षे


पात्रता
55 टक्के गुणासह सायकॉलॉजी, अलाइड सायकॉलॉजी, कॉग्निटिव्ह सायन्स, क्लिनिकल सायकॉलॉजी किंवा कौन्सिलिंग सायकॉलॉजीमध्ये एमए किंवा एमएससी पदवी. एससी-एसटी आणि ओबीसीसाठी 50 टक्के गुण आवश्यक.


निकाल : सप्टेंबर 2013


शुल्क : एमफिल कोर्समध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना वार्षिक सुमारे 1300 रुपये शुल्क द्यावे लागेल. याबरोबर सर्व विद्यार्थ्यांना 12 हजार रुपये प्रत्येक महिन्याला विद्यावेतन मिळेल.


परीक्षा पद्धती
दोन तासांच्या परीक्षेत बहुपर्यायी 120 प्रश्न विचारले जातील. पदव्युत्तर पदवी स्तरावरील प्रश्न असतील. यामध्ये जनरल सायकॉलॉजी, हिस्ट्री ऑफ सायकॉलॉजी, सोशल सायकॉलॉजी, स्टॅटिस्टिक्स, रिसर्च मेथडोलॉजी, फिजियोलॉजिकल सायकॉलॉजी, पर्सनॅलिटी अँड डेव्हलपमेंट सायकॉलॉजीमधून 10-10 तसेच क्लिनिकल सायकॉलॉजी व अबनॉर्मल सायकॉलॉजीमधून 20-20 प्रश्न विचारले जातील. चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग नसेल.


निवड प्रक्रिया
परीक्षेचा निकाल त्याच दिवशी जाहीर केला जाईल. यशस्वी विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. लेखी परीक्षा, मुलाखतीतील गुणावरून गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यामध्ये 70 टक्के महत्त्व परीक्षेला, तर 30 टक्के महत्त्व मुलाखतीला दिले जाईल. निवड समितीमार्फत एनआरआय विद्यार्थ्याची निवड होईल.


ज्ञान
मानवाच्या या गुपितांचा उलगडा नाही
@लाज : खोटे बोलल्याची लाज वाटल्यानंतर आपला चेहरा का पडतो, हे चार्ल्स डार्विनने ‘थिअरी ऑफ इव्हॅल्युएशनमध्येही स्पष्ट केलेले नाही. यातून आपल्यातील कमकुवतपणा समोर येत असल्याने काही जण ही गोष्ट चांगली मानतात. मात्र, दैनंदिन आयुष्यात खोटे बोलण्याचा शेवट चांगलाच राहील, असे सांगू शकत नाही.
@हास्य : हसल्यामुळे मूड सुधारण्यास कारणीभूत ठरणारी संप्रेरके सक्रिय होतात. हसण्यासाठी ही बाब पूरक ठरते. मात्र, विनोदापेक्षा हलक्या व द्विअर्थी शब्दामुळे जास्त हसू येत असल्याचे काही वर्षांपूर्वीच्या अहवालात सांगण्यात आल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली.
@ स्वप्न पाहणे : स्वप्न आपल्या अचेतन मनाची इच्छा असते, असे सिग्मंड फ्राइड यांनी म्हटले होते. मात्र, जगभरात यावर कमी विश्वास ठेवला जातो. स्वप्न भावनेच्या जडणघडणीमध्ये मदत करतात, असे त्यांचे म्हणणे आहे. अखेर आपण स्वप्न का पाहतो, हे आजपर्यंत कोणी सांगू शकले नाही.
@ अंधश्रद्धा : विज्ञान किंवा तर्काच्या आधारावर न टिकणारी श्रद्धा अंधश्रद्धेत मोडते. अंधश्रद्धा आपल्या आयुष्याचा भाग असतात. त्यामुळे त्यांना काढूनही टाकता येत नाही. अंधश्रद्धा कशी निर्माण होते ? आपण त्यांच्यावर का विश्वास ठेवतो ? याचे उत्तर अद्याप मिळाले नाही.


रंजक
एकत्र राहणारे लोक एकसारखे दिसतात
@ जे लोक दीर्घकाळापर्यंत एकमेकांसोबत राहतात ते एकसारखे दिसू लागतात. सारखा आहार व जीवनशैली हे त्यामागचे कारण आहे.
@ एकटे जेवण्याच्या तुलनेत दुसºयांसोबत भोजन घेताना आपण 35 टक्के जास्त जेवतो.
@ एखादी वस्तू प्राप्त करण्याचा जेवढा आनंद होतो, त्यापेक्षा दुप्पट दु:ख ती वस्तू गमावल्यानंतर होते.


इंटरेस्टिंग कोट
“The quality of moral behavior varies in inverse ratio to the number of human beings involved.'' -Aldous Huxley
कमी लोकांत चारित्र्यवान राहणाºया व्यक्तीचे मोठ्या समुदायात गेल्यानंतर नैतिक मूल्य घसरते..- अल्दोस हक्सली
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा.
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल करा.
education@dainikbhaskargroup.com