आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MP PMT 2013: MP Medical, Dental Veternary College Entrance Examination

एमपी पीएमटी-2013: एमपी मेडिकल, डेंटल-व्हेटरिनरी कॉलेजसाठी प्रवेश परीक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशातील सरकार आणि खासगी वैद्यकीय, दंत आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशासाठी 7 जुलै रोजी एमपी पूर्ववैद्यकीय परीक्षा होणार आहे. राज्यात सहा सरकारी, सहा खासगी महाविद्यालये आहेत. दंतवैद्यकीयमध्ये सरकारी एक आणि 14 खासगी महाविद्यालये आहेत. व्हेटरिनरी महाविद्यालयांची संख्या तीन आहे.


स्पर्धा
1620 जागा
40 हजार अर्ज
कोर्स कालावधी साडेपाच वर्षे.


पात्रता
भौतिक, रसायन, जीवशास्त्रात 50 टक्के गुणांसह 12 वीची परीक्षा उत्तीर्ण. राखीव जागांच्या विद्यार्थ्यांसाठी 40 टक्के गुण आवश्यक. वयोमर्यादा : 31 डिसेंबर 2013 पर्यंत 17 वर्षांहून कमी.


निकाल : जुलै 2013


शुल्क : सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात वार्षिक शुल्क सुमारे 60 हजार रुपये असते. खासगी महाविद्यालयात 3.50 लाख रुपये असते. एम्समध्ये एमबीबीएससाठी विद्यार्थ्यांना 4, 500 शुल्क आहे. तर बनारस हिंदू विद्यापीठात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी वार्षिक सुमारे 1.5 लाख रुपये शुल्क आहे.


15 टक्के जागा राष्ट्रीय पातळीवर राखीव
राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत 15 टक्के जागा राष्ट्रीय पातळीवर भरण्यासाठी राखीव आहेत. राष्ट्रीय पात्रता चाचणीद्वारे देखील ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत एकूण 720 जागा आहेत, त्यात 560 राज्याचा कोटा आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 900 जागा असून 378 राज्याचा कोटा , 384 डिमॅट तर 138 जागा एनआरआयसाठी आहेत. तीन पशुवैद्यकीय महाविद्यालयांत एकूण 154 जागा आहेत. दंतवैद्यकीयसाठी सरकारी महाविद्यालयात एकूण 40 जागा आहेत. त्यात 31 राज्याच्या राखीव कोट्यातील आहेत.


प्रवेश प्रक्रिया
परीक्षेत एक पेपर असेल. पहिल्या भागात भौतिक, रसायन व दुस-या भागात बॉटनी, झुऑलॉजीचे प्रत्येकी शंभर बहुपर्यायी प्रश्न असतील. योग्य उत्तरासाठी एक गुण, चुकीच्या उत्तराला निगेटिव्ह गुण मात्र नाहीत.


ज्ञान
‘हिप्पोकॅ्रटिक ओथ’मध्ये अनेक वेळा दुरुस्त्या
‘हिप्पोक्रॅटिक ओथ’ ही चिकित्सक आणि आरोग्यतज्ज्ञांद्वारे घेतली जाणारी शपथ आहे. पाश्चात्त्य राष्‍ट्रांत वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणा-या हिप्पोकेट्स किंवा त्यांच्या कुण्या एका शिष्याने ही शपथ लिहिली आहे. इसवी सन पूर्व पाचव्या शतकात ग्रीक भाषेत ही शपथ लिहिली गेली. या शपथेची रचना पायथागोरसने केली, असासुद्धा काही लोकांचा समज आहे. वास्तविक, आधुनिक काळात विविध देशांत याबाबत खूप संशोधन करण्यात आले. 1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने जीनिव्हा डिक्लेरेशनअंतर्गत यात अनेक बदल केले. वास्तविक, वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी पदवी पूर्ण केल्यानंतर शपथ घेणे कायदेशीर बंधनकारक नाही. अमेरिकेत वैद्यकीय शाखेचे 98 टक्के विद्यार्थी कोणती ना कोणती शपथ घेतात, तर ब्रिटनमध्ये हा आकडा केवळ 50 टक्के इतकाच आहे. भारतात नोंदणीच्या वेळी प्रत्येक अर्जदाराला रजिस्ट्रारकडून शपथेची एक प्रत दिली जाते, जिचे पालन करणे त्यासाठी अनिवार्य असते.


रंजक
प्रौढ व्यक्तीच्या तुलनेत मुलांच्या
शरीरात हाडांची संख्या जास्त
० मुलांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या शरीरात जवळपास 350 हाडे असतात. वाढत्या वयाबरोबर जसजसा शरीराचा विकास होतो, तसतशी हाडं एकमेकांना जुटत जातात आणि पूर्णत: विकसित झाल्यानंतर मानवी शरीरात केवळ 206 हाडे राहतात.
० सर्वसाधारण मानवाच्या उंचीपेक्षा लहान आतड्याची लांबी जवळपास चारपट अधिक असते. याची लांबी 18 ते 23 फूट असते. ते घड्या-घड्यांप्रमाणे वळलेले असल्यामुळे शरीराच्या आत सामावू शकते.
० मानवी शरीरात जवळपास 60 हजार मैल लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. एका दिवसात जवळपास 2 हजार गॅलन रक्त या वाहिन्यांतून हृदयामार्फत प्रवाहित करण्यात येते.
० जन्माच्या वेळी शरीराच्या एकूण लांबीच्या एक चतुर्थांश भाग हा केवळ डोक्याने व्यापलेला असतो. तथापि, किशोरावस्थेत तो कमी होऊन जवळपास शरीराचा आठवा भाग बनतो.


इंटरेस्टिंग कोट
Medicine is not only a science; it is also
an art. It does not consist of compounding pills and plasters; it deals with the very
processes of life. -Paracelsus
वैद्यकशास्त्र हे केवळ विज्ञानच नाही, तर ती एक कलासुद्धा आहे. ते केवळ औषधी-गोळ्यांपुरतेच मर्यादित नसून, संपूर्ण आयुष्याशी ते जोडलेले आहे.


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 यावर
किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com