भारतीय वंशाची लीडिया सेबेस्टियनने इंग्लंडमधील मेन्सा बुद्ध्यांक चाचणीत(आयक्यू टेस्ट) सर्वाधिक 162 गुण मिळवले आहे. तिने जगातील प्रसिध्द वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाइन आणि स्टीफन हॉकिंग यांना मागे टाकले आहे. लीडिया ही 12 वर्षांची आहे. ती मुळात खूप हुशार आहे.6 महिन्यांची असताना तिने बोलायला सुरुवात केली होती, असे तिचे वडील अरुण सेबेस्टियन यांनी सांगितले.
ती इंग्लंडमध्ये ससेक्समध्ये राहते. अगोदर मी खूप निराश होते. पण प्रश्न सोडवताना मला काहीही अवघड वाटले नाही, असे लीडिया परीक्षेबाबात सांगत होती. परीक्षेत भाषिक कौशल्य आणि तर्कावर आधारित प्रश्न विचारली गेली होती. तिचे वडील अरुण सेबेस्टियन ब्रिटनमधील एका हॉस्पिटलमध्ये रेडिओलॉजिस्ट आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा 6 महिन्यांची असताना लीडिया बोलायला शिकली होती...