आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2.5 लाख नोकऱ्या आणेल ई-कॉमर्स उद्योग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑनलाइन खरेदीच्या वाढत्या प्रचलनामुळे विकसित झालेला ई-कॉमर्स उद्योग आता एक मजबूत करिअर बनवण्याचे ठिकाण होऊन चुकले आहे. असोचेमचे ताजे संशोधनदेखील या गोष्टीची पुष्टीच करत आहे. या अहवालानुसार, २०१६ मध्ये ई-कॉमर्स उद्योग २.५ लाख नोकऱ्या निर्माण करेल. ज्यामुळे या क्षेत्रात हायरिंग (खरेदी) ६० ते ६५ टक्के वाढेल. खरे पाहता बहुतांश ई-कॉमर्स विभागांनी आपली उलाढाल गेल्या वर्षीच वाढवली आहे आणि उद्योगाच्या वाढीसाठी उत्तम संधी निर्माण केल्या आहेत. हेच कारण आहे की रोजगार देणाऱ्या क्षेत्रात हे क्षेत्रही पुढे जात आहे.
का जोडले जावे या क्षेत्राशी?
ई मार्केटरची पाहणी सांगते आहे की, जगभरात ई-कॉमर्स विक्री २०.१ टक्के या दराने वाढते आहे. १,५०० ट्रिलियन डॉलरवर पोहोचेल. भारतातही काही असेच संकेत दिसू लागले आहेत. क्रिसिल रिसर्च रिपोर्टनुसार भारतात ई-कॉमर्स उद्योग येणाऱ्या वर्षात ५० -५५ टक्के प्रतिवर्ष या दराने वाढेल आणि २०१६ पर्यंत हे क्षेत्र ५०,००० कोटींचे होईल. टेक्नोपाक-केपीएमजी-आयएएमएआय स्टडीनुसार भारतीय ई-कॉमर्स क्षेत्र २०२१ पर्यंत भारतीय ई-कॉमर्स क्षेत्र २०२१ पर्यंत ७६ दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचेल. विविध संशोधनात वाढीचे आकडे भलेही वेगवेगळे असतील, पण सर्व संशोधने या गोष्टीवर सहमत आहेत की, ई-कॉमर्स आता एक वेगाने वाढत असलेले क्षेत्र होऊन बसले आहे. जे नोकऱ्या देण्यातही सर्वोच्च सिद्ध होत आहे. टेक्नोपाकच्या पाहणीनुसार येणाऱ्या वर्षामध्ये १.४ मिलियन कर्मचाऱ्यांची मागणी या क्षेत्रात निर्माण होईल. तज्ज्ञांच्या मतानुसार बहुतांश नोकऱ्या या टेक्नॉलॉजी, सप्लाय चेन मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, बॅक ऑफिस सपोर्ट व वेअरहाऊस मॅनेजमेंटमध्ये असतील.

स्टार्ट अप्सच्या यशाने दिली मजबुती
शेवटी असे काय कारण आहे की, तुलनात्मक पद्धतीने हा नवा उद्योग एवढ्या वेगाने आपली जागा बनवत आहे. खरे पाहता वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन व मोबाइल युजर बेस, अॅडव्हान्स शिपिंग व पेमेंट ऑप्शन आणि विक्रीतील वाढीमुळे ई-कॉमर्सला नव्या पद्धतीने परिभाषित केले आहे. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, मेक माय ट्रिप, पेपर फ्राय, मिंत्रा, इबेसह लहान- लहान आणखी नव्या स्टार्टअप्सच्या यशकथांनी या बाजारात आमूलाग्र बदल झाला आहे. गेल्या वर्षी या क्षेत्रातील कंपन्यांना मिळालेल्या मोठ्या निधी (फंडिंग)कडे पाहता या क्षेत्रातही उसळी आलेली आहे.

विद्यार्थ्यांचे आवडते क्षेत्र
असोचेमच्या नव्या पाहणीनुसार, ई-कॉमर्सद्वारे नियुक्त होणाऱ्या व्यवस्थापन आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची संख्या ६५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. निल्सन स्टडीच्या नुसार, भारताच्या टॉप बी शाळांसह एक चतुर्थांश एमबीए विद्यार्थ्यांचा कल ई-कॉमर्स क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये आहे.

प्रशिक्षित कार्यकुशलशक्तीची (मनुष्यबळाची) मागणी
कॅटेगरी मॅनेजर, लॉजिस्टिक्स मॅनेजर, डिजिटल मार्केटर, वेब डिझायनर, वेबसाईट मेंटेनन्स, इन्फर्मेशन सिक्युरिटी प्रोफेशनल, वेब अॅनाॅलिटिक्स, कॉपिरायटर आदी पदांसाठी प्रशिक्षित व्यावसायिकांची या क्षेत्राला आवश्यकता आहे. यासह काही विशेष व्हर्टिकल्ससारखे ट्रॅव्हल व टुरिझम, रिटेल व बँकिंगमध्ये उद्योग अशा व्यावसायिकांना शोधते. ज्यांना बिझनेस डोमेनची चांगली समज असते.