कोलकात्याच्या व्यावसायिक कुटूंबाशी संबंध असणारे अभिषेकने उद्यमशीलतेचा प्रवास वयाच्या 19 व्या वर्षापासून सुरु केला होता. याची सुरुवात कॉलेज जीवनापासून झाली. कोलकातेतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून वाणिज्य(ऑनर्स)मध्ये पदवी घेतली आहे. अभिषेकने नोकरीविषयक कौशल्य शिकण्यासाठी सिटीबँकमध्ये सेल्समन म्हणून नोकरी सुरु केली.
या दरम्यान एका रस्ता अपघातात पायाला मोठी इजा झाल्याने त्याला तीन महिने आराम करण्याचा सल्ला दिली गेला. या तीन महिन्यांमध्ये अभिषेकने संगणकाशी संबंधित कौशल्य आत्मसात केली. याबाबत अभिषेक म्हणतो, या तीन महिन्यांत संगणकात माझी आवड वाढत गेली आणि यासी संबंधित वस्तू शिकत गेलो. घरीच अॅनिमेशनचे प्रयोग सुरु केले. काही छोटे मोफत प्रकल्प हाती घेतले, असे तो सांगतो. यात यश मिळाल्याने अभिषेकला वाटले, की आता आयटीत पुढे जायला हवे. याच विचाराने तो एका कंपनीत नोकरीसाठी गेला. परंतु त्या कंपनीला अॅनिमेशनची नाहीतर एचटीएमएलच्या जाणकाराची आवश्यकता होती. येथून निराशेने परतल्यानंतर त्याने दुकानातून एचटीएमएलचे पुस्तक खरेदी केले. ते शिकण्यास सुरुवात केली.
अभिषेक रुंगटाची यशोगाथा वाचण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...