आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशानंतर दुस-यांचाही विचार करा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपर- 30 चे संस्थापक आनंद कुमार हे आपणास अनेक अडचणींतून मार्ग काढत यशोशिखर गाठणा-या एका विद्यार्थ्याची कथा सांगणार आहेत. हा विद्यार्थी गरीब विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्याच्या कार्यात तेवढ्याच उत्साहाने सहभागी झाला आहे.


आनंद कुमार
संस्थापक,
‘सुपर-30’, पाटणा, बिहार

हिवाळ्याचे दिवस होते. स्वच्छ सूर्यप्रकाशात घेतलेला तो वर्ग मला केवळ अमरेंद्रमुळे आजही लक्षात आहे. मी मुलांना कठिणातील कठीण प्रश्न विचारत होतो. उत्तर देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ लागली होती. यात अमरेंद्र सर्वांत पुढे होता. कोणतेही मोजमाप नाही, ना कागदावर कच्ची आकडेमोड. आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला अमरेंद्र एका प्रश्नात अडकला. संपूर्ण प्रश्न नव्हे, तर एका शब्दात - ‘कार्पेट’. मला विचारले- याचा अर्थ काय? मी सांगितले- सतरंजी. यानंतर त्याला प्रश्नाचे योग्य उत्तर मिळाले.
इंग्रजीतील एका किरकोळ शब्दामुळे त्याचे अडखळणे मला खटकले. अन्य लाखो विद्यार्थ्यांप्रमाणे इंग्रजीचे अज्ञान ही त्याची पडती बाजू होती. तो दारिद्र्यात शिकून पुढे आला होता. सरकारी शाळेत शिकलेल्या अमरेंद्रचा इयत्ता आठवीमध्ये पहिल्यांदा इंग्रजीशी संबंध आला. ना शिकवणी ना दुसरा पर्याय. घरात मार्गदर्शन करणारे कुणी नव्हते. अशाही परिस्थितीत तो 2002 मध्ये बारावी चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाला. त्या वेळी त्याने आयआयटीचे पहिल्यांदा नाव ऐकले. पाटण्यात तो मला भेटला, परंतु भोळ्याभाबड्या अमरेंद्रमधील आत्मविश्वास पहिल्याच भेटीत लक्षात आला. इंग्रजीचे पुरेसे ज्ञान नसलेल्या अमरेंद्रने सुपर-30 मध्ये प्रवेश मिळवला. एक दिवस मुंबईतील एका प्रोफेसरचा तास ठेवण्यात आला होता. यादरम्यान अमरेंद्रला एका इंग्रजी शब्दाचा अर्थ कळला नाही. प्राध्यापकाच्या ते लक्षात आले. तास संपल्यानंतर हा मुलगा आयआयटी कसा करेल? अशी शंका त्यांनी माझ्याकडे उपस्थित केली.
अखेर अमरेंद्रने शिक्षणातील लढा जिंकला. 2004 मध्ये इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना मागे टाकत तो चांगल्या ‘रँक’सह आयआयटी परीक्षा उत्तीर्ण झाला. खरगपूर आयआयटीमधील पहिल्या तासात सर्वांनी त्याचा आवाज ऐकला- माय नेम इज अमरेंद्र कुमार. संपन्न कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या अन्य विद्यार्थ्यांनी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले होते. लहानपणापासून इंग्रजीचा सहवास आणि आठवीपासूनच आयआयटी प्रवेशासाठी तयार करण्यात आलेली बळकट मानसिकता असा तो दोन्हींतील फरक होता. या सर्वांत टिकाव धरून राहण्यासाठी अमरेंद्रला खूप कष्ट घ्यावे लागले. तो इंग्रजीचे व्याकरण शिकला. हॉलीवूडचे चित्रपट पाहिले, इंग्रजी वृत्तपत्र वाचू लागला. आॅक्सफर्ड शब्दसंग्रहातील 90 टक्के संग्रहावर पकड निर्माण केली. 2008 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टाटा मोटर्समध्ये पहिली नोकरी मिळाली. दोन वर्षांत तीनदा पदोन्नती. गावात गेल्यानंतर लोकांच्या नजरा त्याला मोठा माणूस म्हणून पाहू लागल्या. आपल्या मुलांना नोकरी मिळावी यासाठी अनेक जण त्याच्याकडे येऊ लागले. मात्र, त्याला स्वत:च्या क्षमतेची पूर्ण जाणीव होती. कंपनी सुरू करण्याचा विचार त्याच्या मनात आला, परंतु त्यासाठी लागणारा पैसा व व्यवस्थापनाचे त्याला पुरेसे ज्ञान नव्हते. त्यानंतर त्याने कॅटची तयारी सुरू केली. गेल्यावर्षी आयआयएम बंगळुरूमध्ये त्याची निवड झाली आहे. आपल्या गावातील मुलांसाठी काही तरी करावे हे स्वप्न त्याने पाहिले. त्याने मिळवलेल्या यशापेक्षाही लहान वयात इतरांसाठी काही तरी करण्याचा विचार मला अधिक भावला. व्यवस्थापनातील पदवी पूर्ण केल्यानंतर तो आपले स्वप्न पूर्ण करेल. त्या वेळी तो दुस-यांच्या स्वप्नपूर्तीत स्वत:चे स्वप्न साकार करील. दुस-यांसाठी काही तरी करण्याचा विचार करणारे आज किती यशस्वी तरुण आपल्या आसपास आहेत?
ज्ञान
सर्वांत सोपी आणि अवघड भाषा
सर्वात सोप्या भाषा
जगात भाषा बोलणा-यांची संख्या
स्पॅनिश 33 कोटी

पोर्तुगीज 17.8 कोटी फ्रेंच 6.78 कोटी
इटालियन 6.17 कोटी


शिकण्यासाठी किती वेळ
24 आठवडे, 575 - 600 तासांचे वर्ग
काहीशा अवघड भाषा
जगात भाषा बोलणा-यांची संख्या
हिंदी
18.2
कोटी
रशियन
14.4
कोटी
व्हिएतनामी
6.86
कोटी
तुर्की
5.08
कोटी
शिकण्यासाठी किती वेळ
44 आठवडे, 1,110 तासांचे वर्ग
सर्वांत अवघड भाषा
88 आठवडे, 2,200 तासांचे वर्ग
अरबी
22.1 कोटी सर्वांत अवघड का : अरबीत युरोपीय भाषेसारखे अनेक शब्द आहेत. यामध्ये खूप कमी स्वर असतात, त्यामुळे ते शिकताना त्रासदायक ठरू शकते.
जपानी
1.22 कोटी अवघड का : साधारण हजार प्रकारची अक्षरे लक्षात ठेवावी लागतात. याबरोबर लेखनशैली तीन वेगवेगळ्या पद्धतींत असल्यामुळे आणखी अवघड जाते.
चिनी
120 कोटी सर्वात अवघड का : यातील एकाच
शब्दाच्या वेगवेगळ्या ढंगातील उच्चारामुळे त्याचा अर्थ बदलतो. लिखाणाची पद्धतही किचकट आहे.
(द फॉरेन सर्व्हिस इंन्स्टीट्यूट ऑफ युएस डिपार्टमेंट ऑफ स्टेट)
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 यावर
किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com