आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Admission Notice : Lakhnow University P.hd Entrance Examination

प्रवेश सूचना: लखनऊ विद्यापीठाच्या पीएचडीसाठी प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या पीएचडीसाठी प्रवेशासाठी विद्यार्थी आता ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 19 सप्टेंबर आहे. 11 ते 20 सप्टेंबरपर्यंत शुल्क भरण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल. अर्ज 12 ते 20 सप्टेंबरपर्यंत जमा करणे आवश्यक आहे.


पात्रता
कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवीमध्ये 55 टक्के गुण
शुल्क : आर्ट्स, कॉमर्स आणि एज्युकेशनमध्ये पीएचडीसाठी 3,941 रुपये शुल्क. लॉ आणि सायन्ससाठी 5941 रुपये आणि फाइन आटर््ससाठी 12,270 रुपये. पीएचडी शोधनिबंधाच्या मूल्यमापनाची एकूण फीस 11 हजार रुपये आहे. प्रवेश फीस 750 रुपये एकदाच जमा करावी लागेल. दिल्ली विद्यापीठात पीएचडीची फीस 2,122 रुपये आहे.


जागांपेक्षा जास्त विद्यार्थी आल्यास प्रवेश परीक्षा
यूजीसी किंवा सीएसआयआरच्या राष्‍ट्रीय पात्रता परीक्षेत ज्युनिअर रिसर्च फेलोशिप मिळवणा-या अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल. जेआरएफ विद्यार्थ्यांची संख्या पीएचडीच्या जागांपेक्षा जास्त असेल तर एक प्रवेश परीक्षा होईल. 23 सप्टेंबर रोजी याची तारीख जाहीर केली जाईल. परीक्षेनंतर गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल.


विषय व जागा व पीएचडीच्या 30 विषयांसाठी विद्यार्थी अर्ज करू शकतात. यातील मुख्य कोर्सेससाठीच्या जागांची संख्या- शिक्षणशास्त्र : 32, संस्कृत : 20 केमिस्ट्री : 30
मॅथ्स : 16 फिजिक्स : 36 बॉटनी : 15
अँथ्रोपोलॉजी, हिंदी, ओरिएंटल संस्कृत, सोशियॉलॉजी, कॉमर्स : 6 - 6 जागा
इंग्लिश, फिलॉसॉफी : 14-14 जागा
फिजिकल एज्युकेशन, सायकॉलॉजी : 12-12 जागा


कोर्स वर्कमुळे विद्यार्थ्यांचे संशोधनकार्य सोपे
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या विभागात एक सेमिस्टरचे कोर्स वर्क करावे लागते. याला पीएचडीची पूर्वतयारी मानली जाते. यामध्ये रिसर्च मेथडॉलॉजी शिकवले जाते, त्यात क्वांटिटेटिव्ह मेथड्स आणि कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनचा प्राथमिक अभ्यास असेल. यामुळे विद्यार्थ्यांना संशोधनकार्य सोपे जाते.


वृत्त
भारतीय विद्यापीठाच्या भागीदारीशिवाय परदेशी विद्यापीठ उघडणार
परदेशात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना राहण्यावर व खाण्यापिण्यावर खर्च करावा लागतो. रुपयाच्या घसरणीमुळे विद्यार्थ्यांचा हा खर्च वाढत आहे. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने विदेशी विद्यापीठांना भारतात शाखा सुरू करून विद्यार्थ्यांना पदवी देण्याची परवानगी दिली आहे. आतापर्यंत परदेशी संस्था भारतीय संस्थेच्या भागीदारीशिवाय कोर्स सुरू करू शकत नव्हती. सध्या 340 विदेशी विद्यापीठांनी भारतीय संस्थांसोबत संयुक्त कोर्स उपलब्ध केला आहे. साधारणत: 400 परदेशी विद्यापीठे येथे येण्याची शक्यता आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयानुसार, परदेशातील 20 विद्यापीठांनी भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.


चौथी सीबीएसई अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट नोव्हेंबरमध्ये
दहावी उत्तीर्ण विद्यार्थी विज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखेच्या निवडीवरून द्विधा मन:स्थितीत असतो. यासाठी सीबीएसईचा स्टुडंट्स ग्लोबल अ‍ॅप्टिट्यूड इंडेक्स टेस्ट नोव्हेंबरमध्ये होईल. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना ती देता येईल. परीक्षेत पुस्तकी नव्हे, तर मानसशास्त्रविषयक प्रश्न असतील. विद्यार्थ्याला कोणत्या विषयात आवड आहे, हे यातून दिसून येईल. या वर्षातील ही चौथी परीक्षा असून सर्व विद्यार्थ्यांसाठी ती ऐच्छिक आहे.


लर्निंग
इंग्रजीत समान अर्थ असणा-या म्हणी
1. नीम हकीम खतरा ए जान । : Half knowledge is dangerous.
अर्थ : अर्धवट ज्ञान घातक.
2. दुध का जला छांछ भी फुंक-फुंक कर पीता है । : Once bitten, twice shy.
अर्थ : एखाद्या गोष्टीत हात पोळल्यास, दुस-यांदा अतिसावधानता बाळगतो.
3. उंट के मुंह मे जीरा । :A drop in the ocean.
प्रचंड मोठी गरज असताना थोडे योगदान देणे.


कामचुकार आणि कोकिळेची गोष्ट
अशी बनली ही म्हण...
One Swallow does not make summer..
अतिरेकी खर्च करणा-या एका कामचुकार माणसाने त्याची सर्व बचत उधळपट्टी करून संपवली. त्याच्याकडे फक्त एक कोट शिल्लक होता. एके दिवशी त्याने कोकिळा पाहिली. त्यामुळे त्याला वाटले, की उन्हाळा आला असावा. त्याला कोणतेही काम करायची इच्छा नव्हती. त्यामुळे खर्च भागवण्यासाठी त्याने तो कोटही विकून टाकला. पण काही दिवसांतच पुन्हा थंडी परतली. तीच कोकिळा त्याला खिडकीजवळ मेलेली आढळून आली. तो गोंधळून गेला. तो कोकिळेला म्हणाला, हे तू काय केलेस? उन्हाळा येण्याआधीच येऊन तू तुझा जीव तर गमावलासच, पण माझेही नुकसान कले.
म्हणजे, फक्त एक कोकिळा दिसली म्हणजे उन्हाळा येत नाही. जशी एका कोंबड्याच्या आरवण्याने संपूर्ण देशात सकाळ होत नाही.


शब्द - लफ्ज - word
* मुर्खपणा- हूमुक - stupidity
* पेशीन गोई - भविष्‍यवाणी - Foretelling
* Curtail - घटवणे/ कमी करणे - जवाल


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com