आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅट 2015 : जमशेदपूरच्या एक्सएलआरआयमधील व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूरच्या एक्सएलआरआय (झेवियर लेबर रिसर्च इन्स्टिट्यूट)मधील व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी विद्यार्थी 22 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. 4 जानेवारी रोजी झेवियर अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (जॅट) च्या आधारे या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाईल. यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मनुष्यबळ व्यवस्थापन, व्यवसाय व्यवस्थापन, सामान्य व्यवस्थापन आणि फेलो प्रोग्राम्सला प्रवेश दिला जाईल. जीमॅटच्या व्हॅलीड स्कोअरच्या आधारावरच एक्सएलआरआयमध्ये प्रवेश दिला जातो.

स्पर्धा
500 जागा (सुमारे)
50 हजार अर्जदार (सुमारे)
2 वर्षे कालावधी

पात्रता
व्यवसाय व्यवस्थापन आणि मनुष्यबळ संसाधन व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर. यावर्षी अंतिम वर्षाची परीक्षा देत असलेले विद्यार्थीसुद्धा अर्ज करू शकतात. मात्र, त्यांची पदवी 10 जून 2015 पूर्वी पूर्ण व्हायला हवी. सामान्य व्यवस्थापन प्रोग्रामसाठी कामकाजाचा पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

शुल्क
एक्सएलआरआयमधील मनुष्यबळ संसाधन आणि व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी वार्षिक 7 लाख 85 रुपये शुल्क आहेत. ग्लोबल एमबीए अभ्यासक्रमासाठी 12 लाख 50 हजार तर सामान्य व्यवस्थापनासाठी 15 लाख रुपये शुल्क आकारले जाईल. अहमदाबादच्या आयआयएममध्ये एमबीए अभ्यासक्रमासाठी वार्षिक 12 लाख रुपये शुल्क आकारले जाते.
शंभर टक्के नोकरीची हमी, 16.25 लाख रुपयांचे वार्षिक सरासरी पॅकेज
एक्सएलआरआयच्या 2012-14 तुकडीतील सर्व विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. यासाठी शंभरपेक्षा अधिक कंपन्यांनी प्लेसमेटमध्ये भाग घेतला होता. त्यांनी 245 विद्यार्थ्यांना चार दिवसांतच ऑफर लेटर पाठवून दिले. या विद्यार्थ्यांना सरासरी 16 लाख 25 हजार रुपये पॅकेज मिळाले. जॅटचा स्कोर एक्सएलआरआयशिवाय सुमारे 120 संस्थांसाठी वैध असतो. याआधारे विद्यार्थी संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकतात.

लखनऊच्या आयआयएममधील व्यवस्थापनाच्या एक्झिक्युटिव्ह अभ्यासक्रमाला प्रवेश
लखनऊच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या इंटरनॅशनल प्रोग्राम इन मॅनेजमेंट फॉर एक्झिक्युटिव्ह (आयपीएमएक्स)मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. जीमॅटमधील वैध गुण आणि कामाच्या अनुभवाच्या आधारे प्रवेश दिला जाईल.

पात्रता
कोणत्याही शाखेच्या पदवीसह पाच वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक. सोबतच, जुलै 2011 ते ऑक्टोबर 2014 दरम्यान झालेली जीमॅट परीक्षा दिलेली असावी.

शुल्क
लखनऊच्या आयआयएममध्ये आयपीएमएक्ससाठी एकूण 19 लाख 11 हजार रुपये शुल्क आहे. इंदूरच्या आयआयएममध्ये पीजीपीएमएक्स अभ्यासक्रमासाठी एकूण 11 लाख रुपये शुल्क आकारले जाते.

वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंटच्या पीजी डिप्लोमा कोर्सला प्रवेश
पुण्याच्या वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट (वामनीकॉम)मध्ये अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंटच्या पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी 31 मार्च 2015 पर्यंत अर्ज करू शकतात. कॅट, मॅट, जॅट, एटीएमए किंवा सीमॅटमधील व्हॅलीड स्कोरच्या आधारे प्रवेश दिला जाईल.

पात्रता
कोणत्याही शाखेची पदवी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक. एससी/एसटीच्या विद्यार्थ्यांसाठी 45 टक्के गुणांची अट. सोबतच, कॅट, मॅट,जॅट, सीमॅट किंवा एटीएमए परीक्षेत व्हॅलीड स्कोअर आवश्यक.

शुल्क
वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंटच्या पीजीडीएम-एबीएम अभ्यासक्रमासाठी वार्षिक सुमारे 2 लाख 75 हजार रुपये शुल्क राहील. यात निवास आणि भोजनाचा खर्च सामील नाही.

सर्व अभ्यासक्रमांची विस्तृत माहिती मिळवण्यासाठी लॉग इन करा...
www.dainikbhaskar.com
124 महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आयआयटीचे प्राध्यापक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिकवतीलदेशातील विविध भागातील सुमारे 124 इंजिनिअरिंग महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आयआयटीचे प्राध्यापक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिकवणार आहेत. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारा सुरू करण्यात आलेल्या क्वालिटी एनहान्समेंट इन इंजिनिअरिंग एज्युकेशन (क्यूईईई)च्या माध्यमातून हे शक्य होईल. लाइव्ह लेक्चर, ट्यूटोरियल, इंटरॅक्टिव्ह ई बुक्स, व्हर्च्युअल लॅब्स आणि मॅसिव्ह ऑनलाइन ओपन कोर्सेस हे याचे पाच मॉड्युल आहेत. लाइव्ह लेक्चरवेळी विद्यार्थी थेट प्राध्यापकांशी संवाद साधू शकतील. मद्रास, मुंबई, कानपुर, दिल्ली आणि खडगपूरच्या आयआयटीमधील 20 प्राध्यापकांचा चमू या विद्यार्थ्यांना शिकवणार आहे.
इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना औद्योगिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीसोबतच अनेक खासगी कंपन्याही मदत करत आहेत.

कोलकात्याच्या आयआयएमला एएसीएसबीची मान्यता
बिझनेस स्कूलला मान्यता देणारी जागतिक संस्था एएसीएसबीकडून मान्यता मिळवण्याचा बहुमान कोलकात्याच्या आयआयएम संस्थेला मिळाला आहे. यापूर्वी हैदराबादची आयएसबी आणि मणिपालची टीएपीएमआय या दोन संस्थांनाच अशाप्रकारची मान्यता मिळाली आहे. जगभरातील सुमारे 5 टक्क्यांपेक्षाही कमी संस्थांना हा बहुमान मिळत असतो. 48 देशांतील 716 बी स्कूलला एएसीएसबीकडून ही मान्यता मिळालेली आहे.

प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com