फुटवेअर डिझाइन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्या अंडरग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थी यासाठी 19 मेपर्यंत अर्ज करू शकतात. प्रवेश परीक्षेच्या आधारावर प्रवेश मिळेल. परीक्षा 13, 14 आणि 15 जून रोजी होईल. याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिझाइनच्या यूजी आणि पीजी तसेच एमबीए कोर्सेसमध्ये प्रवेश मिळेल. याचे कॅम्पस नोयडा, चेन्नई, कोलकाता, रोहतक, फुरसतगंज, जोधपूर, गुना आणि छिंदवाडा येथे आहेत.
पात्रता
यूजी कोर्स : कोणत्याही शाखेची बारावी परीक्षा उत्तीर्ण असावी.
पीजी कोर्स : कोणत्याही शाखेची पदवी.
निवड प्रक्रिया
यूजी आणि पीजी कोर्सेससाठी वेगवेगळ्या परीक्षा असतील. यूजी कोर्ससाठी अर्ज करणारे विद्यार्थी ज्यांनी आयआयटी-जेईई, एआययईईई किंवा एसआरएम प्रवेश परीक्षेसारखी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा दिलेल्यांना प्रवेश परीक्षा देण्याची गरज नाही. या पद्धतीने कॅट, जॅट, मॅट, जीमॅटसारख्या परीक्षांचा व्हॅलिड स्कोअर ज्यांच्याकडे आहे त्या विद्यार्थ्यांना पीजी कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षेची आवश्यकता नाही.
शुल्क
नोयडा कॅम्पसमध्ये पदव्युत्तर पदवी कोर्सेसचे वार्षिक शुल्क 90 हजार रुपये आणि उर्वरित सर्व कॅम्पसमध्ये 65 हजार रुपये आहे. नोयडा कॅम्पसमध्ये अंडरग्रॅज्युएट कोर्सेसचे शुल्क 75 हजार रुपये आणि उर्वरित कॅम्पसमध्ये 55 हजार रुपये वार्षिक आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये यूजी आणि पीजी कोर्सचे वार्षिक ट्यूशन फीस जवळपास 1 लाख 10 हजार रुपये आहे.
निवड प्रक्रिया
अडीच तासांच्या परीक्षेमध्ये बहुपर्यायी 150 प्रश्न असतील. पीजी कोर्सेससाठी होणा-या परीक्षेमध्ये क्वान्टिटेटिव्ह अॅप्टिट्यूड अँड रिझनिंग आणि इंग्रजीचे 45-45 तसेच बिझनेस अॅप्टिट्यूड आणि जनरल अवेरनेसचे 30-30 प्रश्न विचारले जातील. यूजी कोर्सच्या प्रवेश परीक्षेत मॅथ्स आणि इंग्रजीचे 45-45 तसेच जनरल सायन्स आणि जनरल अवेरनेसचे 30-30 प्रश्न असतील.
निकाल : 30 जून, 2014
एनएमआयएमएसच्या आंत्रप्रेन्यॉरशिप अॅँड फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट कोर्समध्ये प्रवेश
मुंबईच्या नरसी मोनजी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीजच्या (एनएमआयएमएस) एमबीए (आंत्रेप्रेन्यॉरशिप अॅँड फॅमिली बिझनेस) कोर्समध्ये प्रवेशाची प्रक्रिया 23 जानेवारीपासून सुरू झाली आहे. विद्यार्थी 5 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. त्यासाठीची प्रवेश परीक्षा 19 एप्रिल रोजी होईल. प्रवेश परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे प्रवेश मिळेल.
पात्रता
50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी. कौटुंबिक व्यवसायाचा अनुभव असणा-यांना विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
शुल्क
एमबीए कोर्सचे वार्षिक शुल्क 3.60 लाख रुपये आहे. ईडीआय, अहमदाबादमध्ये आंत्रप्रेन्यॉरशिपच्या पीजीडीएमचे वार्षिक शुल्क 4.25 लाख रुपये आहे.
निकाल : 3 मे, 2014
यूजीसीपेक्षा वेगळे असेल नॅक आता मंत्रालयाच्या अंतर्गत
उच्च शिक्षणामध्ये संलग्नता देणारी संस्था नॅशनल असेसमेंट अॅँड अॅक्रेडिएशन कौन्सिल (नॅक) लवकरच युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या(यूजीसी) अधिकार क्षेत्रातून बाहेर जाईल. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याचे निर्देश जारी केले आहेत. आता याच्याशी संबंधित नियम-कायदे नव्या पद्धतीने तयार केले जातील. सध्याच्या स्थितीत उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात संस्थांना मान्यता देण्याची जबाबदारी नॅककडे आहे, यूजीसीचे त्याचे नियंत्रण आहे. नॅक यूजीसीच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली होते, त्यामुळे त्यात बदल करण्याची आवश्यकता पडली. आता नॅक मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत काम करेल.
एमबीए सर्वाधिक प्रसिद्ध पदव्युत्तर पदवी, फायनान्सला सर्वात जास्त पसंती
एमबीए इन्स्टिट्यूट्समध्ये रिक्त राहिल्यास किंवा कोर्स करत असणा-या विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नसल्याचे सांगितले जात असले तरी मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन देशाचा आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय मास्टर कोर्स आहे. हा देशाच्या वेगवेगळ्या शहरांतून जमा केलेल्या 2012 आणि 2013च्या आकड्यांवरून ही बाब समोर आली. या दोन वर्षांमध्ये विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त फायनान्समध्ये एमबीएबाबत माहिती सर्च केल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. या यादीमध्ये दुस-या क्रमांकावर मनुष्यबळ आणि तिस-यावर मार्केटिंग आहे. एमबीए करणा-या विद्यार्थ्यांच्या पॅकेजमध्ये वाढ होत असल्याचे सर्वेक्षणात दिसले. 2013 मध्ये कॅट स्कोअर स्वीकार करणा-या इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना सरासरी वार्षिक पॅकेज 2.79 लाख रुपये राहिले. सीमॅटच्या स्कोअरच्या आधारावर प्रवेश देणा-या इन्स्टिट्यूट वार्षिक सरासरी पॅकेज 2 लाख 20 हजार रुपये होते. 2012 च्या तुलनेत ते जास्त आहे.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com