आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर कॉर्नर : CA- CPTचे संपूर्ण अभ्‍यासक्रम आता पोर्टलवर उपलब्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउटंट्स ऑफ इंडियाने(आयसीएआय) ई-लर्निंगच्या व्यासपीठावर विद्यार्थ्‍यांसाठी शैक्षणिक आणि अभ्‍यासक्रमाचे(सिलॅबस) तपशील उपलब्ध करुन देण्‍यात आले आहे. यात विद्यार्थ्‍यांना एण्‍ट्री लेवल म्हणजे सीए-सीपीटी(कॉमन प्रोफीशिएन्सी टेस्ट), इंटरमीडिएट आणि फाइनलचे संपूर्ण अभ्‍यासक्रम अपलोड केला गेला आहे. आयसीएआय विद्यार्थ्‍यांपर्यंत पोहोचण्‍यासाठी नॉलेज पोर्टलच्या माध्‍यमातून त्यांना सर्व माहिती आणि टेक्निकल विषयाची माहिती उपलब्ध करुन देईल.
नियमित अभ्‍यासक्रमा व्यतिरिक्त ज्ञानात भर टाकणारे विषय आणि प्रशिक्षणासंबंधी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्‍यासाठी पोर्टलवर सतत अपडेटचे काम चालू आहे.
ऑनलाइन सुविधेच्या दिशेने अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता क्लाऊड कॅम्पसवरही काम चालू झाले आहे. त्यात वेबकास्टच्या माध्‍यमातून विद्यार्थी अभ्‍यास करु शकतात. याबरोबरच आयटी प्रशिक्षणासह सीए प्रॅक्टिशनरसाठी आवश्‍यक अशा पात्रतेची माहिती दिली गेली आहे. याच्या माध्‍यमातून विद्यार्थ्‍यांना शिष्‍यवृत्ती आणि शुल्कमधील सूटविषयी माहिती मिळू शकते.
पाहा संकेतस्थळ : http://icaiexam.icai.org